NAGPUR

महात्मा फुले योजनेतून राज्यातील पहिली कर्णरोपण शस्त्रक्रिया नागपुरात… दोन वर्षीय चिमुकला…

नागपूर : जन्मजात कर्णबधिर मुलांवरील कर्णरोपण (काॅक्लिअर इम्प्लांट) शस्त्रक्रियेला मागील वर्षभरापासून थांबा लागला होता. परंतु, आता या शस्त्रक्रियेचा समावेश महात्मा फुले जनआरोग्य योजनेत करण्यात आल्याने राज्यातील पहिली शस्त्रक्रिया नागपुरातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात (मेडिकल) झाली. मेडिकल आणि मेयो या दोन्ही शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयासह देशातील निवडक रुग्णालयात २०१८ पासून केंद्राच्या एडीआयपी योजनेतून कर्णरोपण शस्त्रक्रिया व्हायची. परंतु, मागील वर्षभरापासून शस्त्रक्रियेसाठी आवश्यक महागडे यंत्र मिळत नव्हते. त्यामुळे शस्त्रक्रिय थांबल्या होत्या. परंतु, राज्य शासनाने नुकतेच या शस्त्रक्रियेचा महात्मा फुले जनआरोग्य योजनेत समावेश केला. नागपुरातील मेडिकल प्रशासनाने आचारसंहितेपूर्वी या योजनेतील रुग्णांसाठी आवश्यक कर्णयंत्र खरेदीची निविदा प्रक्रिया पूर्ण केली व अखेर या योजनेतून दोन वर्षीय बालकावर शस्त्रक्रिया करण्यात आली. मेडिकलमधील कान- नाक- घसा रोगतज्ज्ञ डॉ. कांचन तडके यांनी ही शस्त्रक्रिया केली. यासाठी मेडिकलचे अधिष्ठाता डॉ. राज गजभिये, वैद्यकीय अधीक्षक डॉ. अविनाश गावंडे, कान- कान- घसा रोग विभागप्रमुख डॉ. देवेंद्र माहोरे, डॉ. विजय महोबिया, डॉ. संजीव मेडा यांचे सहकार्य मोलाचे ठरले. हेही वाचा… दोन सख्खे बंधू परस्परांच्या विरोधात, एक भाजपकडून तर दुसरा … u जन्मजात कर्णबधिर बालकांना ऐकता व बोलता यावे म्हणून कर्णरोपण शस्त्रक्रिया केली जाते. त्यासाठीचे महागडे यंत्र बालकांमध्ये आवाजाची भावना निर्माण करतात. हे यंत्र प्रत्यारोपित झाल्यावर बालकाला बोलण्याचा सरावासाठी दोन वर्षे स्पिच थेरपी दिली जाते. या थेरपीनंतर बालक सामान्यांप्रमाणे ऐकू व बोलू शकतो. हेही वाचा… यवतमाळकर स्वरकन्येच्या सत्काराला, अभिनेता सचिन येणार राज्यातील एकही शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात कर्णरोपण शस्त्रक्रिया होत नव्हती. परंतु इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या (मेयो) कान- नाक- घसा रोग विभागाचे प्रमुख डॉ. जिवन वेदी यांनी पुढाकार घेत या रोपणाबाबत विशेष प्रशिक्षण घेतले. त्यानंतर वैद्यकीय शिक्षण खात्यातील वरिष्ठ अधिकाऱ्यांशी समन्वय करून मेयोत पहिली या पद्धतीची शस्त्रक्रिया सुरू झाली. केंद्र सरकारच्या योजनेतून ही शस्त्रक्रिया होत होती. कालांतराने ही शस्त्रक्रिया नागपुरातील मेडिकलसह राज्यातील इतरही काही निवडक वैद्यकीय शिक्षण खात्याच्या रुग्णालयात होत आहे. “मेडिकल रुग्णालयात महात्मा फुले जनआरोग्य योजनेतून राज्यातील पहिली कर्णरोपण शस्त्रक्रिया यशस्वी झाली. आता या योजनेतून शस्त्रक्रिययांचा मार्ग मोकळा झाला आहे. याचा लाभ गरीब रुग्णांना होईल.” – डॉ. अविनाश गावंडे, वैद्यकीय अधीक्षक, मेडिकल. None

About Us

Get our latest news in multiple languages with just one click. We are using highly optimized algorithms to bring you hoax-free news from various sources in India.