NAGPUR

वर्धा : ‘माझी लढत देवेंद्र फडणवीस यांच्याशीच’ या खासदारांच्या वक्तव्याने…

वर्धा : विधानसभा निवडणुकीसाठी अर्ज परत घेण्याची प्रक्रिया आटोपली आहे. आरोप प्रत्यारोप तसेच खुलासे सूरू झाले आहेत. सर्वाधिक लक्षवेधी चर्चा आजवर आर्वी मतदारसंघात भाजप उमेदवारीवरून झाली. आता काँग्रेस गोटात आरोप फेटाळून लावणे सूरू झाले आहे. खासदार अमर काळे यांनी पत्नी मयुरा काळे यांच्यासाठी राष्ट्रवादी शरद पवार पक्षाची उमेदवारी खेचून आणली. त्यावर त्यांना आरोपाच्या पिंजऱ्यात उभे केल्या जात आहे. त्यावर खासदार अमर काळे यांनी एका स्थानिक वृत्तवहिनी सोबत बोलतांना खुलासा केल्याचे दिसून आले आहे. ते म्हणतात उमेदवार पत्नी मयुरा काळे यांनी कुठेच अर्ज केला नव्हता. पक्षानेच स्पष्ट केले की तुम्हालाच उभे रहावे लागेल. म्हणून माझा नाईलाज झाला. आमची लढत सुमित वानखेडे किंवा दादाराव केचे यांच्याशी नाही. लढत देवेंद्र फडणवीस यांच्याशी आहे. नॉट रिचेबल हा आरोप खोटा आहे. मी उपलब्ध असतोच. मात्र या निवडणुकीनंतर भेटीगाठी साठी दिवस ठरवू. तसे नियोजन करू, असा खुलासा त्यांनी केला. हेही वाचा… दर्यापुरात ‘युवा स्‍वाभिमान’ च्‍या, पोस्‍टरवर भाजप जिल्‍हाध्‍यक्षाची छबी…! घराणेशाहीच्या आरोपवर ते विचारतात की मग मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबाबत काय म्हणाल? एक खरं की खासदार काळे हे आरोप फेटाळून लावतात. मात्र फडणवीस यांचे ओएसडी असा उल्लेख करीत ते थेट देवेंद्र फडणवीस यांच्याशी सामना असल्याचे दाखवून प्रसंग बाका असल्याचे दाखवून देत आहे. तसेच आम्ही कुणाशी लढलो, हे एक वाट मोकळी ठेवत असल्याचे आर्वीचे सुजाण सांगतात. कारण वानखेडे यांना फडणवीस यांच्या प्रभावातून आर्वी, कारंजा व आष्टी या मतदारसंघातील तीनही तालुक्यात अनेक कामे मार्गी लावण्यात यश आले. तो त्यांचा यूएसपी असल्याचे भाजप नेते म्हणतात आणि लोकांची कामे होत असेल तर चूकीचे काय, असे विचारतात. विद्यमान आमदार केचे यांना पुढील भवितव्याची हमी देत वानखेडे पक्के झाले. त्यामुळे खासदार काळे लढत फडणवीस यांच्याशीच असे म्हणत आहे. पण तिकीट आणतांना सासुरवाडीचा प्रभाव कामात आणणारे काळे सत्ताधारी प्रभावातून आलेल्या उमेदवारीवर टीका करू शकतात कां, असा प्रश्न चर्चेत आहे. हेही वाचा… फडणवीस, बावनकुळे, केदार, देशमुखांसह ७१७ रिंगणात काळे यांचे गणगोत राजकीय प्रभाव राखून असल्याचे त्यांच्या लोकसभा निवडणूक काळात चांगलेच चर्चेत आले होते. खुद्द शरद पवार हे त्यांच्या अर्ज रॅलीत सहभागी झाल्याने ही बाब खरी ठरल्याचे म्हटल्या गेले. म्हणून फडणवीस विरुद्ध पवार असाही पैलू मांडल्या जातो. None

About Us

Get our latest news in multiple languages with just one click. We are using highly optimized algorithms to bring you hoax-free news from various sources in India.