TRENDING

VIDEO : लाडक्या लेकीसाठी बनले नेल आर्टिस्ट! नेलपेंट लावण्याआधी केला अभ्यास, पाहा Mark Zuckerberg चे स्किल्स

Video Shows Mark Zuckerberg Turns Nail Artist For Daughter : जगप्रसिद्ध सोशल मीडिया प्लॅटफॉर्म मेटा या कंपनीचे सीईओ व संस्थापक मार्क झुकरबर्ग यांच्यामुळे आपण घरबसल्या एकेमकांशी जोडले गेलो आहोत. व्हॉट्सअ‍ॅप, फेसबुक, इन्स्टाग्राम आदी ॲप्सवर इतरांबरोबर संवाद साधत आहोत. पण, आपल्याला टेक्नॉलॉजीने जोडलेल्या मार्क झुकरबर्ग (Mark Zuckerberg) त्यांच्या कुटुंबातील सदस्यांबरोबर वेळ कसा घालवत असतील असा प्रश्न तुमच्याही मनात आला असेल ना? तर आज सोशल मीडियावर असाच एक व्हिडीओ व्हायरल होत आहे, यामध्ये मार्क झुकरबर्ग लेकीसाठी नेलं आर्टिस्ट बनले आहेत. व्हायरल व्हिडीओत मार्क झुकरबर्ग (Mark Zuckerberg) हेडसेट Quest 3S डोळ्यांवर लावतात. नेलपेंट कशी लावयची असं त्या हेडसेटला विचारतात. त्यानंतर मग Quest 3S छोट्या-छोट्या स्क्रीसह नेलपेंट कशी लावायची याची एकेक पायरी दाखवली जाते. मग ते लेकीला टेबलावर बसवून नेल आर्ट करण्यास सुरुवात करतात. वेगवेगळ्या रंगांच्या नेलपेंटच्या बॉटलमधून निळा-लाल रंग निवडतात. लेकीच्या नखांवर लावतात. नेलआर्ट पूर्ण करण्यासाठी चमकीचा स्पर्श देखील जोडतात. लेकीसाठी नेल आर्टिस्ट बनलेल्या मार्क झुकरबर्गचा व्हायरल व्हिडीओ तुम्हीसुद्धा नक्की बघा… हेही वाचा… ‘अश्रू तेव्हाचं येतात जेव्हा प्रेम…’ आजीला हॉस्पिटलमध्ये पाहून आजोबांना अश्रू अनावर, VIRAL VIDEO पाहून पाणवतील डोळे व्हिडीओ नक्की बघा… A post shared by Mark Zuckerberg (@zuck) टेक्नॉलॉजी, बोर्डरूम मीटिंग्जच्या पलीकडे, मार्क झुकरबर्ग देखील एका प्रेमळ लेकीच्या वडील आहेत. पण, तंत्रज्ञानाचा वापर करून मार्क झुकरबर्ग (Mark Zuckerberg ) यांनी त्याच्या मुलीची हौस पूर्ण केली आहे आणि तिच्यासाठी खास नेल आर्टिस्ट बनले आहेत.मेटाचा हेडसेट Quest 3S ची मदत घेऊन आधी त्यांनी नेलआर्ट कसं करायचा याचा अभ्यास केला आणि मग अगदी खास पद्धतीत लेकीच्या बोटांवर नेलपेंट लावली. तसेच त्यांनी या क्षणाचा एक खास व्हिडीओ बनवून पोस्ट देखील केला आहे. सोशल मीडियावर हा @zuck या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. तसेच ‘Quest 3S च्या मदतीने वडीलांचे स्किल्स सुधारण्यासाठी अनेक स्क्रीन वापरणे म्हणजे एक नवीन अनुभव आहे’ ; अशी कॅप्शन मार्क झुकरबर्ग यांनी दिली आहे. नेटकरी हा व्हिडीओ पाहून फादर ऑफ द इयर, नेलं आर्टिस्ट असं मार्क झुकरबर्गला म्हणताना कमेंटमध्ये दिसत आहेत. याआधी सुद्धा मार्क झुकरबर्ग यांनी टेक्नॉलॉजीचा वापर करून लेकीच्या केसांची वेणी बांधली होती, तर एकदा रोड ट्रिपला फोटो देखील पोस्ट केला होता. None

About Us

Get our latest news in multiple languages with just one click. We are using highly optimized algorithms to bring you hoax-free news from various sources in India.