TRENDING

“आमच्याकडे रॉकेट उडवून मिळतील”, काकांची दिवाळीआधीच जय्यत तयारी, VIDEO एकदा पाहाच

दिवाळीचा सण अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपलाय. भारतभर दिवाळी मोठ्या जल्लोषात साजरी केली जाते. दिवाळी येण्याअगोदरच घराघरांत साफसफाई केली जाते. नवीन वस्तू विकत घेतल्या जातात. सगळीकडे उत्साहाचं वातावरण पाहायला मिळतं. घरोघरी फराळ बनवले जातात आणि लहानग्यांपासून मोठ्यांपर्यंत फटाके फोडून सगळेच हा सण उत्साहात साजरा करतात. यावेळी सर्वत्र दिवाळीचा झगमगाट पाहायला मिळतो. काही जण दिवे लावून, तर काही फटाके फोडून हा सण साजरा करतात. दरवर्षी दिवाळीत फटाक्यांचा दणदणाट आणि लखलखाट सुरू असतो. दिवाळीदरम्यान सोशल मीडियावर त्याचे अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात. पण, दिवाळीआधीच सध्या एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय; ज्याची चर्चा सर्वत्र सुरू आहे. या व्हिडीओत एक माणूस दिवाळीआधीच एकावर एक असे रॉकेट उडविताना दिसत आहे. हेही वाचा… बापरे! दोघे आले अन् त्याला…, पेट्रोल पंपावर झालं असं काही की VIDEO पाहून बसेल धक्का व्हायरल झालेल्या या व्हिडीओत आपण पाहू शकतो की, एका माणसाने दिवाळीची दणक्यात तयारी सुरू केली आहे. या व्हिडीओत दोन माणसं दिवळीचे फटाके फोडताना दिसतायत; पण हे फटाके म्हणजे सुतळी बॉम्ब किंवा रशी बॉम्ब नाही, तर ते एक चक्क रॉकेट आहे. रस्त्याच्या मधोमध एक माणूस चक्क स्वत:च्या हाताने रॉकेट उडवताना दिसतोय. एक माणूस यात त्याला मदत करताना दिसतोय. अगदी सेकंदाच्या आत तो माणूस एकापेक्षा अनेक रॉकेट उडविताना दिसतोय. A post shared by Viral In Maharashtra | 2M (@viralinmaharashtra) हा व्हिडीओ @viralinmaharashtra या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. या व्हिडीओला तीन लाखांपेक्षा जास्त व्ह्युज आले आहेत. हेही वाचा… “जरा तरी लाज…”, मंदिरात बसलेल्या महिलेच्या गळ्यात खिडकीतून टाकला हात अन्…, VIDEO पाहून बसेल धक्का व्हायरल व्हिडीओ पाहून अनेकांनी आपापल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने कमेंट करीत लिहिलं, “फटाके फोडून मिळतील. फटाके फोडण्यासाठी आजच संपर्क करा.” तर, दुसऱ्याने, “कृपया असे कोणतेही फटाक वाजवू नका; जे कोणाच्या घरात जातील,” असे म्हटले आहे. एक जण, “माणूस फ्री आहे का? आम्हाला नाही चालवता येणार ते रॉकेट,” असे कमेंट करीत म्हणाला. “आमच्याकडे रॉकेट उडवून मिळतील,” अशी कमेंट एकाने केली. हेही वाचा… भररस्त्यात कपलने काय केलं पाहा! गाड्या थांबल्या तरी भान नाही, पाहा VIDEO दरम्यान, दरवर्षी दिवाळीमध्ये अशा प्रकारचे व्हिडीओ व्हायरल होत असतात. याधीही फटाके वाजवताना अनेकदा अपघात झाल्याचे व्हिडीओ व्हायरल झाले आहेत. None

About Us

Get our latest news in multiple languages with just one click. We are using highly optimized algorithms to bring you hoax-free news from various sources in India.