TRENDING

Snake Bite in Bihar : जगातील सर्वांत विषारी साप चावला, तरीही घाबरला नाही; ‘या’ माणसाच्या कृतीमुळे सगळेच अवाक्

Snake Bite in Bihar : सर्पदंश झाल्यानंतर वेळेत उपचार न मिळाल्यान अनेकांचा जीव गेला आहे. तसंच, कोणत्या सापाने दंश केल्याचं हे न कळल्यामुळेही उपचारांअभावी जीव गेल्याच्या अनेक घटना सातत्याने घडत असतात. असाच प्रकार बिहारमध्ये घडला आहे. बिहारमधील भागलपूरमध्ये एका व्यक्तीला साप चावल्यानंतर त्याने जे केलं ते पाहून सर्वांनाच धक्का बसला. जगातील सर्वांत विषारी सापांपैकी एक असलेल्या रसेल वाइपरने बिहारमधील भागलपूरमध्ये एका माणसाचा चावा घेतला. सर्पदंश झाल्याचं कळताच प्रकाश मंडल या माणसाने विषारी सापाला पकडले आणि गळ्यात टांगून रुग्णालयात घेऊन आला. रुग्णालयात आल्यानंर प्रकाश मंडल याच्यावर आपत्कालीन विभागात तातडीने उपचार करण्यात आले. त्याच्यावर उपचार सुरू असतानाही त्याच्या मानेभोवत तो साप होताच. बिहार के रहने वाले प्रकाश मंडल को जहरीले सांप रसेल वाइपर ने काट लिया। प्रकाश ने हिम्मत दिखाकर खुद को डंसने वाले सांप का मुंह दबोचकर उसे पकड़ लिया। फिर उसे गले में डालकर लूंगी-गंजी पहने ही सीधे अस्पताल पहुंच गया। गजब हिम्मत किये हो भैया। pic.twitter.com/3VsVi1Yc3y तो सरपटणारा प्राणी त्याच्या गळ्यातून निसटला तर तो रुग्णलयातील इतर रुग्णांचा चावा घेईल यामुळे काही लोक त्यांच्यापासून दूर होते. प्रकाश मंडळ याने मानेभोवत साप लटकवून एका हाताने सापाचं तोंड दाबलं होतं. त्यामुळे या व्यक्तीला एका निर्जन स्थळी घेऊन जाणं गरजेचं होतं. त्यामुळे त्याला एका ठिकाणी नेण्यात आलं. तिथे गेल्यानंतर त्या व्यक्तीने मानेभोवती गुंडाळलेला साप हातात पकडला आणि त्याच्याबरोबरच फरशीवर झोपला. हेही वाचा >> ट्रेनमधील स्टंट आला अंगाशी, VIDEO पाहून उडेल थरकाप; पाहा नेमकं काय झालं? सापाला पकडून ठेवल्यास उपचार करण्यास अवघड जाईल, असं त्याला सांगितल्यानंतर त्याने सापाला सोडले. हा साप अत्यंत विषारी वर्गातील होता. भारतापासून तैवान आणि जावापर्यंतच्या खुल्या देशात तो आढळतो. मानवी संपर्क कमी असलेल्या शेतजमिनींमध्ये हे साप आढळतात. None

About Us

Get our latest news in multiple languages with just one click. We are using highly optimized algorithms to bring you hoax-free news from various sources in India.