TRENDING

“लॉरेन्स बिश्नोई गँग उदध्वस्त करेन” खासदार पप्पू यादव आव्हान देत ढसाढसा रडले? Video नेमका कधीचा? वाचा सत्य

Baba Siddique Murder Case Fact Check : मुंबईतील राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते बाबा सिद्दीकीच्या हत्येची जबाबदारी लॉरेन्स बिश्नोई गँगने स्वीकारल्यानंतर बिहारच्या पूर्णियाचे खासदार पप्पू यादव यांनी या गँगला खुले आव्हान दिले आहे. लॉरेन्स बिश्नोई हा कुख्यात गुन्हेगार असून कायद्याने परवानगी दिल्यास २४ तासांत संपूर्ण गँग उदध्वस्त करू, असा दावाही त्यांनी केला. या विधानानंतर पप्पू यादव यांचा आणखी एक व्हिडीओ व्हायरल झाला, ज्यामध्ये ते रडताना दिसत आहेत. पण, पप्पू यादव यांचा व्हिडीओ खरा आहे का याविषयी आम्ही तपास सुरू केला तेव्हा एक वेगळं सत्य समोर आलं; ते काय जाणून घ्या… एक्स युजर चंदन शर्माने त्याच्या X हँडलवर भ्रामक दाव्यासह व्हिडीओ शेअर केला आहे. पप्पू यादव आज शाम में लॉरेंस बिश्नोई को ठिकाने लगा रहे थे, पता ना किसी ने रास्ते में इन्हें कूट दिया जोर-जोर से रो रहे हैं। ? #BabaSiddiqueShotDead pic.twitter.com/PlIc78um0q इतर युजरदेखील अशाच प्रकारच्या दाव्यांसह व्हिडीओ शेअर करत आहेत. सरकार आदेश दे तो लॉरेंस का गैंग मिटा दूंगा : पप्पू पर डरपोक 'पप्पू यादव' तो एक ही "थप्पड़" में भों-भों 'रोने' लगा था? डरपोक “पप्पू यादव” सोशल मीडिया पर बड़ी-बड़ी बातें करता है,, खुद को बहुत बड़ा तीरंदाज गुंडा समझता है, जबकि जनता द्वारा पड़े एक थप्पड़ पर रोने लगा था। वीडियो… pic.twitter.com/mvn8FXOgQ1 पप्पू यादव आज शाम में लॉरेंस बिश्नोई को ठिकाने लगा रहे थे, पता ना किसी ने रास्ते में इन्हें कूट दिया जोर-जोर से रो रहे हैं। ? #BabaSiddiqueShotDead pic.twitter.com/owV0wTXyTd ये है पप्पू यादव कल लॉरेंस विश्नोई को 24 घण्टे में ठिकाने लगा रहे थे और जब होश आया तो कैसे छोटे बच्चों की तरह रो रहे है ।।।।।।। pic.twitter.com/8lD17ocruF लॉरेंस विश्नोई को 24 घंटे में ख़त्म करने की बात करने वाले पप्पू यादव एक छोटे से हमले से रोने लग गए @JaikyYadav16 क्या कहेंगे pic.twitter.com/KHCscegfhN आम्ही InVid टूलमध्ये व्हिडीओ अपलोड करून तपास सुरू केला आणि त्यानंतर त्यापासून मिळवलेल्या कीफ्रेमवर रिव्हर्स इमेज सर्च करून तसाप सुरू केला. यावेळी आम्हाला कोणतेही उपयुक्त परिणाम सापडले नाहीत आणि म्हणून आम्ही YouTube वर कीवर्डचा शोध घेतला आणि संबंधित फिल्टर लागू केले. यावेळी आम्हाला एबीपी न्यूजच्या यूट्यूब चॅनेलवर एक व्हिडीओ मिळाला. हा व्हिडीओ सहा वर्षांपूर्वी अपलोड करण्यात आला होता आणि त्याचे शीर्षक होते, खासदार पप्पू यादव म्हणतात, “मला हल्लेखोराने माझ्या जातीबद्दल विचारले” | एबीपी न्यूज या व्हिडीओतील व्हिज्युअल हे व्हायरल झालेल्या व्हिडीओसारखेच होते. त्यानंतर आम्ही Google वर कीवर्ड शोध घेतला आणि २०१८ च्या अनेक बातम्या सापडल्या, जेव्हा बिहारचे खासदार पप्पू यादव यांच्यावर मुझफ्फरपूरमध्ये भारत बंददरम्यान हल्ला झाला होता. 5133531.html बातमीत नमूद केले होते की: हल्ल्यानंतर यादव मीडियासमोर भावूक झाले आणि म्हणाले, “मी कधीही कोणाची जात विचारली नाही, कधीही जातीचे राजकारण केले नाही; पण हल्लेखोरांनी आधी माझी जात विचारली आणि नंतर हल्ला केला.” हेही वाचा – ‘बदला पुरा!’, बाबा सिद्दीकींच्या हत्येनंतर मुंबईत झळकले देवेंद्र फडणवीसांचे पोस्टर्स? Viral Photo खरा की खोटा; वाचा…. आम्हाला इतर अनेक YouTube चॅनेलद्वारे अपलोड केलेला समान व्हिडीओदेखील आढळला. भारत बंददरम्यान मुझफ्फरपूरमध्ये हल्ला झाल्यानंतर प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना बिहारचे खासदार पप्पू यादव यांचा २०१८ चा जुना व्हिडीओ आताचा असल्याचा दावा करत शेअर केला जात आहे. बाबा सिद्दीकीच्या मृत्यूची जबाबदारी स्वीकारल्यानंतर यादवने लॉरेन्स बिश्नोई टोळीला आव्हान दिल्यानंतर हा व्हिडीओ पुन्हा समोर आला आहे. व्हायरल दावा दिशाभूल करणारा आहे. None

About Us

Get our latest news in multiple languages with just one click. We are using highly optimized algorithms to bring you hoax-free news from various sources in India.