TRENDING

“बाई, काय हा प्रकार! बुक्कीत टेंगूळ!”, बोबड्या बोलीत चिमुकलीने म्हटला निक्की अन् सुरजचा डायलॉग; पाहा Viral Video

बिग बॉस मराठी हा छोट्या पडद्यावरील वादग्रस्त शो म्हणून आजपर्यंत ओळखला जाणारा शो आहे. नुकताच बिगबॉस मराठीचा पाचवा सिझन पार पडला आणि सुरज चव्हाण या सिझनचा विजेता ठरला. सर्व स्पर्धकांनी हा सिझन चांगलाच गाजवला. कधी आपल्या भांडणामुळे तर कधी आपल्या डायलॉगमुळे हे कलाकार नेहमीच चर्चेत होते. विशेष म्हणजे सुरज चव्हाण आणि निक्की तांबळी यांचे डायलॉग इतके गाजले की त्यावर गाणंही तयार करण्यात आले. अनेक जण हे डायलॉग बोलून आपले व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट करताना दिसत आहे. सुरज आणि निक्कीच्या डायलॉग बोलणाऱ्या एका गोंडस चिमुकलीचा व्हिडिओ व्हायरल आहे. व्हायरल व्हिडीओमध्ये एक चिमुकली आपल्या गोंडस आवाजात बिगबॉसमधील सुरज चव्हाण आणि निक्की तांबोळी यांचे डायलॉग म्हणत आहे. व्हिडीओमध्ये पाहू शकता की ही चिमुकली बोबड्या आवाजात निक्की तांबोळीचा “बाई, काय हा प्रकार, पागल झालाय का? आणि सुरजचा,गुलीगत धोका, बुक्कीत टेंगूळ हे गाजलेले डायलॉग म्हणत आहे. डायलॉग म्हणताना चिमुकलीच्या चेहऱ्यावरील हावभाव पाहून तुमच्या चेहऱ्यावर नक्कीच हसू येईल. हेही वाचा – “बघ, कसं गूरू गूरू गूरू फिरतंय…”; वॉशिंग मशिन पाहून आजी काय म्हणाली? पाहा, आजीबाईंचा Viral Video A post shared by Ps Photographe (@psgejage8181_lavangkar) हेही वाचा – संतापजनक! भरवर्गात झोपली होती शिक्षिका, विद्यार्थी दाबत होते पाय, धक्कादायक घटनेचा Video Viral इंस्टाग्रामवर psgejage8181_lavangkar नावच्या पेजवर हा व्हिडीओ शेअर केला आहे. हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. . चिमुकलीचं कौतुक करत व्हिडीओवर कमेंट करताना एकाने लिहिले,”गोड बाळ” दुसरा म्हणाला,”किती गोड”, तिसऱ्याने लिहिले की,”हा व्हिडिओ निक्कीपर्यंत पोहचवा”, चौथ्याने लिहिले, “किती गोड बाईईई” हेही वाचा – संतापजनक! भरवर्गात झोपली होती शिक्षिका, विद्यार्थी दाबत होते पाय, धक्कादायक घटनेचा Video Viral अनेक लोक चिमुकलीचं कौतुक करत आहे तर काही लोक बिगबॉसचे डायलॉग शिकवल्याबद्दल चिमुकलीच्या आई-वडीलांवर टिका करत आहे. एकाने लिहिले, “हे सगळं शिकवण्यापेक्षा ह्यांना काही तरी अध्यात्मिक शिकवा. आपली संस्कृती जपा” दुसऱ्याने लिहिले की, “खुप गोंडस आहे बाळ पण, तुझ्या पालकांना सांग मला आसा शिक्षण देण्यापेक्षा आपला सांस्कृतिक गोष्टी शिकवा” तुम्हाला हा व्हिडीओ कस वाटला? None

About Us

Get our latest news in multiple languages with just one click. We are using highly optimized algorithms to bring you hoax-free news from various sources in India.