TRENDING

“तुम्ही एकदा पुण्यात राहिला की दुसरीकडे कुठेच मन लागत नाही…!”, Viral Video पाहून काय म्हणाले पुणेकर?

पुणे, पुणेकर आणि पुणेरी पाट्या नेहमीच चर्चेचा विषय ठरतात. आपल्या हटके शैलीमुळे आणि हटके पाट्यांमुळे पुणेकर नेहमीच सर्वांचे लक्ष वेधून घेतात. पुणेकरांचं पुण्यावर जीवापाड प्रेम आहे हे तर सर्वांना माहित आहे. पुण्याचं कौतुक करताना पुणेकर कधी थकत नाही. पुण्यात असं काय खास आहे ज्याचा पुणेकरांना इतका अभिमान वाटतो असा प्रश्न अनेकांना पडतो. या प्रश्नाचे उत्तर पुण्यात राहिलेला प्रत्येक व्यक्तीला देऊ शकतो. पुण्यावरील प्रेम व्यक्त करणारी अशीच एक पोस्ट सोशल मीडियावर चर्चेत येत आहे. इंस्टाग्रामवर pune_is_loveee नावाच्या पेजवर एक पोस्ट शेअर केली आहे. व्हायरल व्हिडीओमध्ये पुणे शहरातील सुंदर ठिकाणे दिसत आहे. “तुम्ही एकदा पुण्यात राहिला की दुसरीकडे कुठेच मन लागत नाही.” असा अशायाचा मजकूर व्हिडीओवर लिहिलेला दिसत आहे. व्हिडिओ शेअर करताना कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, बरोबर ना? तुम्ही पुण्यात कधीपासून राहात आहात? हेही वाचा – सिंगापूरच्या पंतप्रधानांचा ‘आम आदमी’ सारखा स्वस्तातला विमान प्रवास; प्रवाशांनी केलं टाळ्यांच्या गजरात स्वागत, पाहा Viral Video व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असून पुणेकरांना व्हिडीओवर कमेंट केल्या आहे. चला तर मग जाणून घेऊ या पुणेकर काय म्हणाले ते… काहींनी पुण्याशिवाय कुठे रमत नाही याबाबत सहमती दर्शवली. एकाने लिहिले की, “जन्मभूमी हीच, कर्मभूमी हीच, ती सोडून जाऊ तर जाऊ कुठे” दुसरी व्यक्ती म्हणाली की, “आमचा जन्मच इथला आणि पुणे तिथे काय उणे” तिसरा म्हणाली, “अगदी बरोबर, २२ वर्षांपूर्वी राहात होतो पुण्यात पण आजही सोडून आल्याची खंत वाटतं आहे.” चौथी व्यक्ती म्हणाली की, “आमची पिढी ना पिढी पुण्याचीच आहे जन्मात तरी कधीही स्वप्नात आपलं पुणे सोडून दुसरं शहर स्वप्नात सुद्धा येणार नाही माझं पुणे” पाचवी व्यक्ती म्हणाली, “कारण आमचं पुणे भारीच आहे तेवढं” सहावा म्हणाला, “खरचं पुणे खूप खूप भारी आहे” सातवा व्यक्ती म्हणाला, १००% आम्ही पुणेकर अभिमान आहे याचा, आमचं पुण्यावर प्रेम आहे” हेही वाचा – “ती हो म्हणाली की नाही ते महत्त्वाचं नाही पण, प्रप्रोज खूप भारी होता”; भररस्त्यात तरुणाने हटके शैलीत तरुणीला केलं प्रपोज, Viral Video एकाने पुण्याचं कौतूक करत मोठा निबंध लिहिला आहे, “पुणे हे असं शहर आहे की जिथे कपडे खरेदीसाठी लक्ष्मी रस्ता आहे, वह्या पुस्तके खरेदीसाठी आप्पा बळवंत चौक आहे, साऊंड लाईटचे साहित्य खरेदीसाठी बुधवार पेठेतील इलेक्ट्रिक मार्केट आहे, पुरुषांच्या कपड्यांसाठी टिळक रोड आहे, लग्नाचा बस्ता बांधायचा असेल तर होलसेल साडी खरेदीसाठी रविवार पेठ आहे, महिलांच्या खरेदासाठी प्रसिद्ध तुळशीबाग आहे, नॅानव्हेज हॅाटेल्ससाठी डीपी रोड आहे आणि खानावळींसाठी कुमठेकर रोड आहे. औषधांसाठी सदाशिव पेठ आहे, फर्निचरसाठी लागणारे साहीत्य खरेदीसाठी टिंबर मार्केट आहे, गाड्यांच्या बाबतीत काही काम असेलतर नाना पेठ आहे, माश्यांसाठी प्रसिद्ध गणेश पेठ आहे, किराणा सामानाच्या खरेदीसाठी मार्केटयार्ड आहे. पत्रिका छपाईसाठी आप्पा बळवंत चौकाच्या डाव्या बाजुची गल्ली आहे, गणपती/ वाढदिवस सजावटीच्या सामानासाठी भोवरी आळी आहे, भाजीपाला खरेदीसाठी खास मंडई / मार्केट यार्ड आहे, मडके किंवा मातीचे साहीत्यााठी कुंभारवाडा आहे, जुन्या वस्तू खरेदीसाठी मंगळवार पेठेत जुना बाजार आहे, हार्डवेअर मटेरियल्स व ताडपत्री खरेदीसाठी रविवार पेठ आहे, बोअरवेल/ विहिरीच्या मोटर खरेदीसाठी शुक्रवार पेठतील अकरा मारुती कोपरा, स्पर्धा परिक्षेची तयार करणाऱ्यांसाठी खास नवी पेठ, सदाशिव पेठ आहे, चष्म्यांचे व्होलसेल खरेदीसाठी जोगेश्वरी मंदिराची गल्ली प्रसिद्ध आहे, बुधवार पेठेत प्रसिद्ध ढोल ताश्यांचे व्यापारी आहेत, सांड्याच्या खरेदीसाठी कुमठेकर रोड आहे, रात्री १.३० वाजेपर्यंत जेवण करायचं असेल तर सारसबागची खाऊ गल्ली आहे.”सुक्या मासळीसाठी बोंबील मार्केट प्रसिद्ध आहे, सोन्याच्या खरेदीसाठी रविवार पेठेतीलखार सोन्या मारुती चौक प्रसिद्ध आहे, मुलींच्या कपड्यांच्या खरेदीसाठी एक सी रोड, फॅशन स्ट्रीट आहे. अश्या या आमच्या पुण्यात का नाही मन रमणार नक्कीच रमणार..” हेही वाचा – “ती हो म्हणाली की नाही ते महत्त्वाचं नाही पण, प्रप्रोज खूप भारी होता”; भररस्त्यात तरुणाने हटके शैलीत तरुणीला केलं प्रपोज, Viral Video A post shared by Punekar , विषय संपला..✋️ (@pune_is_loveee) हेही वाचा – “बघ, कसं गूरू गूरू गूरू फिरतंय…”; वॉशिंग मशिन पाहून आजी काय म्हणाली? पाहा, आजीबाईंचा Viral Video काही पुणेकरांनी बाहेरून येणाऱ्या लोकांमुळे पुण्यात गर्दी वाढली आहे याबाबत खंत व्यक्त केली. एक व्यक्ती म्हणाली,”आमचं पुणे खूपच सुंदर आणि टुमदार होते, बाहेरून आलेल्या लोंढ्यांनी पुण्याची लया गेली. जुन्या पुण्याची खूप आठवण येते” दुसऱ्याने लिहिले की, पुण्यामध्ये बाहेरून आलेल्या युपी, बिहार राज्यातील लोकांनी पुण्याची वाट लावली आहे” None

About Us

Get our latest news in multiple languages with just one click. We are using highly optimized algorithms to bring you hoax-free news from various sources in India.