TRENDING

VIDEO: संभाजीनगरमध्ये उद्योजकाला जिममध्येच मृत्यूनं गाठलं; अचानक कोसळला अन् ५ सेकंदात गेला जीव, पाहा नेमकं काय घडलं?

Sambhaji Nagar Heart Attack At Gym: संभाजीनगरमध्ये जिम करत असताना एका व्यावसायिकाचा मृत्यू झाल्याने खळबळ उडाली आहे. जिममध्ये व्यायाम करताना हृदयविकाराचा झटका येणे, जी सावरण्याची संधीही देत ​​नाही आणि लोकांचे प्राण घेत आहे. यापूर्वी कॉमेडियन राजू श्रीवास्तव, सुप्रसिद्ध कन्नड चित्रपट अभिनेता पुनीत राजकुमार आणि अभिनेता सिद्धार्थ शुक्ला यांचाही व्यायामादरम्यान हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला होता. व्यायाम करताना हृदयविकाराचा झटका येऊन मृत्यू पावलेल्या अशा लोकांची यादी खूप मोठी आहे. दरम्यान, अशीच एक घटना समोर आली आहे. संभाजीनगरमध्ये जीममध्ये व्यायाम करत असताना एका व्यावसायिकाला हृदयविकाराचा झटका आला. या घटनेचा हृदय पिळवटून टाकणारा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असून, जीममध्ये व्यायाम करताना तुम्हीही ही चूक करत नाही ना हे जरूर पाहा. हा मृत्यूचा सगळा थरार जिममध्ये असलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. या घटनेचा व्हिडीओ समोर आल्यानंतर माणसाच्या जीवाचा खरंच काही भरोसा नाही, हेच वाक्य प्रत्येकाच्या तोंडातून बाहेर निघेल. नेमकं काय घडलं? सिमरन मोटरचे मालक कवलजीत सिंग बग्गा आपल्या सहकाऱ्यांसोबत नेहमीप्रमाणे व्यायाम करण्यासाठी जिममध्ये आले होते. व्यायाम करत असतानाच ते अचानक खाली कोसळले आणि काही क्षणामध्येच त्यांचा मृत्यू झाला. कवलजीत सिंग बग्गा यांच्या मृत्यूचा थरार सीसीटीव्ही कॅमेरामध्ये कैद झाला आहे. या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, कवलजीत सिंग बग्गा जिममध्ये सहकाऱ्यांसोबत व्यायाम करताना दिसत आहेत. व्यायाम सुरू असतानाच कवलजीत सिंग अचानक बाजूच्या भींतीवर धडकले आणि मग अवघ्या ५ सेंकदात ते खाली कोसळले. यानंतर जिममधले सहकारी कवलजीत सिंग यांची मदत करण्यासाठी धावतानाही दिसत आहेत. दरम्यान, त्यानंतर कवलजीत सिंग यांना जवळच्या रुग्णालयात नेण्यात आलं, पण डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलं. पाहा व्हिडीओ A post shared by INDIA IN RECENT 24 HR (@indiainrecent24hr) हेही वाचा >> मुंबईत चाललंय तरी काय? महिलेला पाहून तरुणाने काढली पँट अन्…; जुहूमधील संतापजनक VIDEO व्हायरल बदललेल्या आणि धकाधकीच्या जीवनशैलीमुळे तणाव वाढत चालला आहे. त्यामुळे अनेकांना विविध आजारांचा आणि शारीरिक समस्यांचा सामना करावा लागतो. संभाजीनगरमध्ये जिम करत असताना व्यावसायिकाचा अशाप्रकारे मृत्यू झाल्याने खळबळ उडाली आहे. व्यायाम सर्वांसाठी जरूरीचा आहे, पण व्यायामाच्या पद्धती योग्य असाव्यात. व्यायाम करणे चांगले असले, तरी जास्त व्यायाम हृदयासाठी धोकादायक आहे. अति व्यायामामुळे हृदयाची गती वाढून त्या व्यक्तीला ‘सडन कार्डिॲक अरेस्ट’ येण्याची शक्यता असते. त्याला अचानक आलेला हृदयविकाराचा झटका असेही म्हटले जाते. None

About Us

Get our latest news in multiple languages with just one click. We are using highly optimized algorithms to bring you hoax-free news from various sources in India.