BUSINESS

Diwali Gold Silver Price : दिवाळीच्या पहिल्याच दिवशी सोन्याच्या दरात घसरण; जाणून घ्या तुमच्या शहरातील दर

Diwali 2024 Gold Silver Rate Today : दिवाळीच्या मुहूर्तावर सोने खरेदी करणाऱ्या ग्राहकांसाठी एक आनंदाची बातमी आहे. ती म्हणजे आज सोन्याच्या दरात आज किंचित घसरण झाली आहे.आदल्या दिवशीच्या तुलनेत आज सोन्याचा १० ग्रॅममागे १३० रुपयांची घसरण झाली आहे. इतकच नाही तर चांदीचा दरही ६७० रुपयांनी कमी झाला आहे. त्यामुळे दिवाळीच्या मुहूर्तावर सोने- चांदी खरेदीचा विचार करत असाल तर आज तुमच्या शहरात नेमके काय दर आहेत जाणून घ्या. दिवाळीच्या मुहूर्तावर सोने खरेदी करणाऱ्या ग्राहकांना दिलासा मिळणार आहे. कारण सोन्या चांदीच्या दरात सततत होणारी दरवाढीत आज कुठे दर काहीप्रमाणात का होईना घसरले आहेत. बुलियन मार्केट या वेबसाइटनुसार,आज देशात १० ग्रॅम २४ कॅरेट सोन्याचा दर ७९,८४० रुपये आहे, तर १ किलो चांदीचा दर ९७,३६० रुपये आहे. एकूण आठवड्याभराचा विचार केल्यास सोन्याच्या दरात जवळपास १००० ते १५०० रुपयांची वाढ झाली पण कालच्या तुलनेत हे दर घसरले आहेत, पण चांदीचा दर मात्र काहीप्रमाणात कमी जास्त होत होते. यामुळे मुंबई, पुणे, नाशिक, नागपूर या शहरांमध्येही दरात घसरण झाली आहे. (Diwali Today’s Gold Silver Rate) आदल्या दिवशीचा म्हणजे ३० ऑक्टोबर २०२४ रोजी १० ग्रॅम २४ कॅरेट सोन्याचा दर ७९, ९७० रुपये होता, तर १ किलो चांदीचा दर ९८,०३० रुपये होता.यावरुन तुमच्या लक्षात येईल की,आज सोन्या-चांदीचे दर सातत्याने कसे चढ- उतार होत आहेत. (वरील सोन्याचे दर सूचक आहेत आणि त्यात जीएसटी, टीसीएस आणि इतर करांचा समावेश नाही. अचूक दरांसाठी तुमच्या स्थानिक ज्वेलरशी संपर्क साधा.) सोनेखरेदी करताना सराफाकडून असे विचारले जाते की, तुम्हाला २२ कॅरेटचे सोने खरेदी करायचे आहे की, २४ कॅरेटचे? त्यामुळे तुम्ही देखील हे जाणून घेणे आवश्यक आहे की तुम्ही खरेदी करताय ते सोनं काय शुद्धतेचं आहे.जर तुम्हाला कॅरेटबाबत माहित असेल तर ही बाब चांगली आहे आणि जर तुम्हाला माहित नसेल तर आम्ही तुम्हाला याबाबत माहिती देत आहोत.

शहर२२ कॅरेट सोन्याचा दर२४ कॅरेट सोन्याचा दर
मुंबई२२ कॅरेट सोन्याची किंमत प्रति १० ग्रॅम ७३,०८६ रुपये आहे.२४ कॅरेट सोन्याची किंमत ७९,७२०
रुपये आहे.
पुणेप्रति १० ग्रॅम २२ कॅरेट सोन्याचा दर ७३,०८६
रुपये आहे.
२४ कॅरेट सोन्याचा दर ७९,७२० रुपये आहे.
नागपूरप्रति १० ग्रॅम २२ कॅरेट सोन्याचा दर ७३,०८६
रुपये आहे.
२४ कॅरेट सोन्याचा दर ७९,७२० रुपये आहे.
नाशिकप्रति १० ग्रॅम २२ कॅरेट सोन्याचा दर ७३,०८६ रुपये आहे.२४ कॅरेट सोन्याचा दर ७९,७२० रुपये आहे.

About Us

Get our latest news in multiple languages with just one click. We are using highly optimized algorithms to bring you hoax-free news from various sources in India.