मुंबई : किराणा विक्री दालन साखळी ‘डिमार्ट’चे सर्वेसर्वा राधाकिशन दमानी यांनी ‘टॉप २०० सेल्फ-मेड आंत्रप्रीन्योर ऑफ द मिलेनिया २०२४’ अर्थात स्व-निर्मित उद्योजकांमध्ये अव्वल ठरले आहेत. आयडीएफसी फर्स्ट बँक प्रायव्हेट बँकिंग आणि हुरून इंडियाने संयुक्तपणे बुधवारी प्रसिद्ध केलेल्या यादीतून हे स्पष्ट झाले. डिमार्टच्या व्यवसायात सरलेल्या वर्षभरात ४४ टक्क्यांची वाढ झाली असून कंपनीचे (ॲव्हेन्यू सुपरमार्ट्स लिमिटेड) बाजार भांडवल ३.४ लाख कोटी रुपयांवर पोहोचले आहे. तर घरोघरी खाद्यपदार्थाचा बटवडा करणारे व्यासपीठ असलेल्या झोमॅटोचे संस्थापक दीपंदर गोयल दुसऱ्या स्थानावर आणि स्विगीचे संस्थापक श्रीहर्ष मजेटी आणि नंदन रेड्डी यांनी तिसरे स्थान पटकावले आहे. हेही वाचा : ‘आयटीसी’च्या भागधारकांना लवकरच नवीन हॉटेल कंपनीच्या समभागांचा नजराणा बेंगळूरु शहरामध्ये ९८ कंपन्यांचे मुख्यालय असून व्यवसायाचे माहेरघर म्हणून ते पुढे आले आहे. त्यापाठोपाठ ३६ कंपन्यांचे मुख्यालय मुंबईत, तर ३१ कंपन्यांचे गुरुग्राम, दिल्ली येथे आहे. एकत्रितपणे या तीनही शहरांचे नवव्यवसायांना चालनांबाबत ५७ टक्के योगदान आहे. आपल्या नवकल्पना आणि कौशल्याच्या जोरावर तंत्रज्ञानाच्या मदतीने वैशिष्ट्यीकृत कंपन्यांपैकी एक तृतीयांश कंपन्यांनी जागतिक पातळीवर छाप सोडली आहे. ओयो रूम्सचे रितेश अग्रवाल यांनी स्थानिक व्यवसायाचे रूपांतर जागतिक (लोकल टू ग्लोबल) पातळीवर केले आहे. अग्रवाल यांची कंपनी सध्या ८० देशांमध्ये कार्यरत आहे, असे आयडीएफसी फर्स्ट बँक प्रायव्हेट बँकिंगचे मालमत्ता व्यवस्थापन प्रमुख विकास शर्मा म्हणाले. यादीतील १३ कंपन्या या २०२० मध्ये अस्तित्वातदेखील नव्हत्या. मात्र अवघ्या चार वर्षांत या १३ कंपन्यांचे मूल्यांकन १,४३,६०० कोटींहून अधिक झाले आहे. अव्वल दहा कंपन्यांमध्ये ६.८२ लाख लोक कार्यरत आहेत. तर आघाडीच्या २०० कंपन्यांमध्ये एकूण ११ लाख कर्मचाऱ्यांना रोजगार उपलब्ध केला आहे. विशेष म्हणजे यातील ९७ कंपन्या या कार्यान्वित होऊन अवघी दहा वर्षे झाली आहेत. केवळ ३२ टक्के कंपन्या भांडवली बाजारात सूचिबद्ध असून उर्वरित कंपन्यांना बाजारातून निधी उभारणीचा पर्याय उपलब्ध आहे. २०० कंपन्यांचे एकत्रित मूल्यांकन ३६ लाख कोटी रुपये (४३१ अब्ज डॉलर) आहे, जे गेल्या वर्षीच्या तुलनेत २० टक्क्यांनी वाढले आहे. हा आकडा महाराष्ट्राच्या जीडीपीपेक्षा (५१० अब्ज डॉलर) थोडाच कमी आहे, असे निरीक्षण हुरून इंडियाचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य संशोधक अनास रहमान जुनैद यांनी नोंदवले. हेही वाचा : Gold Silver Rate Today : सोन्याचे दर आज पुन्हा वाढले! काय आहे आजचा २४ कॅरेट १ ग्रॅम सोन्याचा दर आघाडीच्या २०० कंपन्यांमध्ये १९ कंपन्यांचे प्रतिनिधित्व महिला करतात. यामध्ये ‘नायका’च्या फाल्गुनी नायर आघाडीवर आहेत. त्यांच्या संपत्तीत सरलेल्या एका वर्षात ३० टक्क्यांची वाढ झाली आहे. तर त्यांच्या कंपनीचे बाजार भांडवल ५६,६०० कोटींवर पोहोचले आहे. मामाअर्थच्या गझल अलग ही या सूचीतील सर्वात तरुण महिला उद्योजक ठरली, तिच्या कंपनीचे मूल्यांकन ५५ टक्क्यांनी वाढून १५,५०० कोटींवर पोहोचले आहे. आघाडीच्या २०० कंपन्यांमधील संस्थापकांचे सरासरी वय ४५ वर्षे आहे. यंदाच्या यादीत झेप्टोचे सह-संस्थापक कैवल्य व्होरा अवघ्या २१ वर्षांचे सर्वात तरुण उद्योजक असून, त्यांच्या कंपनीने मूल्यांकनात २५९ टक्क्यांची आश्चर्यकारक वाढ नोंदवली आहे. जिचे मूल्यांकन सध्या ४१,८०० कोटींच्या घरात आहेत. झेप्टोचे सह-संस्थापक अदित पालीचा यांचेदेखील वय अवघे २२ वर्षे आहे. त्यापाठोपाठ भारतपेचे शाश्वत नाकरानी (२६ वर्षे), झुपीचे दिलशेर माल्ही (२८ वर्षे), ओयो रूम्सचे रितेश अग्रवाल (३० वर्षे) असा क्रम लागतो. None
Popular Tags:
Share This Post:
होंडा, निस्सानचे ऐतिहासिक महाविलीनीकरण; ऑगस्ट २०२६ पर्यंत तडीस नेण्याचा निर्धार
December 23, 2024घरगुती बचतीचे वळण म्युच्युअल फंडांकडे, तरी ‘एफडीं’चा वरचष्मा कायम : स्टेट बँकेचा अहवाल
December 23, 2024What’s New
Spotlight
Today’s Hot
-
- December 22, 2024
-
- December 22, 2024
-
- December 20, 2024
Featured News
‘फेड’सावधतेने विक्रीचा रेटा; ‘सेन्सेक्स’ ९६४ अंशांनी गर्भगळित
- By Sarkai Info
- December 20, 2024
‘शारंगधर’चे जयंत अभ्यंकर यांच्यासाठी आज श्रद्धांजली सभा
- By Sarkai Info
- December 19, 2024
Latest From This Week
‘पातकी वस्तूंवर ३५ टक्के दराने जीएसटी लादणे अविचारच’, स्वदेशी जागरण मंचाचा केंद्राला घरचा अहेर
BUSINESS
- by Sarkai Info
- December 18, 2024
प्रत्यक्ष कर संकलनातून केंद्राच्या तिजोरीत १५.८२ लाख कोटींचा महसूल
BUSINESS
- by Sarkai Info
- December 18, 2024
परदेशी गुंतवणूकदारांच्या विक्रीने ‘सेन्सेक्स’ला पाच शतकी झळ
BUSINESS
- by Sarkai Info
- December 18, 2024
Subscribe To Our Newsletter
No spam, notifications only about new products, updates.