BUSINESS

‘शारंगधर’चे जयंत अभ्यंकर यांच्यासाठी आज श्रद्धांजली सभा

पुणे : ‘शारंगधर फार्मा’चे संस्थापक आणि व्यवस्थापकीय संचालक डॉ. जयंत भालचंद्र अभ्यंकर यांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी गुरुवारी, १९ डिसेंबरला सकाळी ११ ते दुपारी १ वाजेपर्यंत वाजता पीआयसी, हिंदू जिमखाना, हॉल नंबर ए-१, सीटीएस नंबर ७६६, फ. पी. नंबर २४४, भांडारकर रोड, पुणे येथे शोकसभा आयोजित करण्यात आली आहे. अभ्यंकर यांचे १२ डिसेंबररोजी हृदयविकाराने निधन झाले. हेही वाचा : Gold Silver Rate Today : सोन्याचे दर आज पुन्हा वाढले! काय आहे आजचा २४ कॅरेट १ ग्रॅम सोन्याचा दर आयुर्वेदिक औषधे बनवणाऱ्या कंपन्यांपैकी ‘शारंगधर फार्मा’ हे प्रसिद्ध नाव असून काढे आणि चूर्णाच्या स्वरूपातील आयुर्वेदिक औषधे गोळ्यांसाठी ते लोकप्रिय आहे. पुण्यात सुरू झालेल्या या कंपनीच्या औषधांचे संपूर्ण उत्पादन कोंढव्यात होते. जयंत अभ्यंकर यांनी भौतिकशास्त्रात पदवी घेऊन पुढे इलेक्ट्रॉनिक अभियांत्रिकीचे शिक्षण घेतले होते. तसेच आयुर्वेदाचे शिक्षण घ्यायचे म्हणून पुणे विद्यापीठातून त्यांनी पुढे बीएएमएस ही पदवी प्राप्त केली. शारंगधरच्या उत्पादनांना प्रभावी विपणन आणि वितरणाची जोड देत अभ्यंकर यांनी ती पुण्याबाहेर अनेक राज्यभर आणि राज्याबाहेरील बाजारपेठेपर्यंत पोहचविले. None

About Us

Get our latest news in multiple languages with just one click. We are using highly optimized algorithms to bring you hoax-free news from various sources in India.