मुंबई: बहुविध व्यवसायांत कार्यरत आयटीसी लिमिटेडने तिचा हॉटेल व्यवसाय विलग करून, ‘आयटीसी हॉटेल्स लिमिटेड’ ही स्वतंत्र कंपनी भांडवली बाजारात सूचिबद्ध करण्याच्या पूर्वघोषित योजनेला प्रत्यक्ष रूप देण्याचे वेळापत्रक बुधवारी जाहीर केले आहे. नव्याने प्रस्तावित आयटीसी हॉटेल्सचे समभाग मिळविण्यास आयटीसीच्या भागधारकांची पात्रता निर्धारित करणारी ६ जानेवारी २०२५ ही रेकॉर्ड तारीख निश्चित करण्यात आली आहे. म्हणजेच या तारखेला किंवा त्याआधीपासून आयटीसीचे भागधारक म्हणून पुस्तकी नोंद असलेल्यांना नवीन कंपनीचे समभाग मिळविता येतील. उभय कंपन्यांच्या संचालक मंडळाने या रेकॉर्ड तारखेला नियमानुसार मंजुरी दिल्याचे बुधवारी भांडवली बाजाराला सूचित केले. आयटीसीच्या भागधारकांना त्यांच्याकडे असलेल्या प्रत्येक १० समभागांमागे आयटीसी हॉटेल्सचा एक समभाग मिळेल. हेही वाचा : Gold Silver Rate Today : सोन्याचे दर आज पुन्हा वाढले! काय आहे आजचा २४ कॅरेट १ ग्रॅम सोन्याचा दर आयटीसीच्या भागधारकांनी जून २०२४ मध्ये झालेल्या मतदानांत, आयटीसीच्या हॉटेल व्यवसायाच्या विलगीकरणाला ९९.६ टक्के अशी बहुमताने मंजुरी दिली आहे. हे विलगीकरण अधिकृतपणे १ जानेवारी २०२५ पासून लागू होईल. आयटीसी समूहाकडून विविध सहा नाममुद्रांखाली देशभरात १३ हजारांहून अधिक खोल्या असलेल्या १४० हॉटेल मालमत्ता सध्या चालविल्या जात असून, त्या सर्व नवीन कंपनीच्या आधिपत्याखाली येतील. पुढील ४ ते ५ वर्षांत खोल्यांची संख्या १८ हजारांवर आणि एकूण मालमत्ता २०० वर नेण्याचे कंपनीचे नियोजन आहे. None
Popular Tags:
Share This Post:
होंडा, निस्सानचे ऐतिहासिक महाविलीनीकरण; ऑगस्ट २०२६ पर्यंत तडीस नेण्याचा निर्धार
December 23, 2024घरगुती बचतीचे वळण म्युच्युअल फंडांकडे, तरी ‘एफडीं’चा वरचष्मा कायम : स्टेट बँकेचा अहवाल
December 23, 2024What’s New
Spotlight
Today’s Hot
-
- December 22, 2024
-
- December 22, 2024
-
- December 20, 2024
Featured News
‘फेड’सावधतेने विक्रीचा रेटा; ‘सेन्सेक्स’ ९६४ अंशांनी गर्भगळित
- By Sarkai Info
- December 20, 2024
‘शारंगधर’चे जयंत अभ्यंकर यांच्यासाठी आज श्रद्धांजली सभा
- By Sarkai Info
- December 19, 2024
Latest From This Week
‘पातकी वस्तूंवर ३५ टक्के दराने जीएसटी लादणे अविचारच’, स्वदेशी जागरण मंचाचा केंद्राला घरचा अहेर
BUSINESS
- by Sarkai Info
- December 18, 2024
प्रत्यक्ष कर संकलनातून केंद्राच्या तिजोरीत १५.८२ लाख कोटींचा महसूल
BUSINESS
- by Sarkai Info
- December 18, 2024
परदेशी गुंतवणूकदारांच्या विक्रीने ‘सेन्सेक्स’ला पाच शतकी झळ
BUSINESS
- by Sarkai Info
- December 18, 2024
Subscribe To Our Newsletter
No spam, notifications only about new products, updates.