BUSINESS

बाजारपेठेत कोलाहल! Sensex च्या गटांगळ्या, १२०० अंकांनी घसरला; Share Market मध्ये नेमकं काय घडलं?

Sensex Today in BSE: गेल्या काही दिवसांपासून मुंबई शेअर बाजारात दिवसेंदिवस होणारी पडझड गुंतवणूकदारांसाठी चिंतेची बाब ठरली आहे. दररोज काही शेकड्यांनी खाली येणारा Senex गुरुवारी तब्बल १२०० अंकांनी कोसळला. त्यामुळे गुंतवणूकदार हवालदील झाल्याचं पाहायला मिळालं. त्यापाठोपाठ Nifty50 नंही सेन्सेक्सच्याच पावलावर पाऊल ठेवत गेल्या काही दिवसांची पडझड कायम ठेवली. त्यामुळे लोकसभा निवडणुकांचे निकाल लागल्यापासून शेअर बाजारात दिसलेली उदासीनता अद्याप उभारी घेऊ शकली नसल्याचं बोललं जात आहे. यामागच्या कारणांचा आता शोध घेतला जाऊ लागला आहे. संसदेचं हिवाळी अधिवेशन, वन नेशन वन इलेक्शन विधेयक, महाराष्ट्राचं हिवाळी अधिवेशन, नव्या सरकारची स्थापना या सर्व स्थिर राजकीय स्थितीचे पडसाद शेअर मार्केटमध्ये उमटू शकतात अशी चर्चा सुरू झाली होती. मात्र, शेअर मार्केटमध्ये तशी कोणतीही चिन्हं दिसत नसल्याने गुंतवणूकदार चिंतेत पडले आहेत. गुरुवारी सकाळच्या सत्रात गुंतवणूकदारांना असणाऱ्या आशा जसजसे व्यवहार होऊ लागले, तसतशा फोल ठरू लागल्या. कालच्या ८०,१८२.२० अंकांवर बंद झालेला Sensex आज सकाळी सुरूच ११६२ अंकांच्या पडझडीने झाला. त्यामुळे सकाळच्या सत्रात सेन्सेक्स ७९,०२९.०३ अंकांवर आल्याचं पाहायला मिळालं. दरम्यान, दरवेळी सेन्सेक्सचाच कित्ता गिरवणाऱ्या निफ्टीनं याहीवेळी आपलं धोरण कायम ठेवत घसरण नोंदवली. कालच्या २४,१९८.८५ अंकांवर बंद झालेला निफ्टी आज २३,८७७.१५ अंकांवर उघडला. त्यामुळे निफ्टीनंही जवळपास ३३० अंकांची घसरण नोंदवली. सकाळच्या पहिल्या सत्रात झालेली घसरण दुपारी १ च्या सुमारास काहीशी सावरल्याचं पाहायला मिळालं. यावेळी सेन्सेक्स ७९,२९१ अंकांवर तर निफ्टी २३,९६८ अंकांवर होता. शेअर बाजारातील आजच्या पडझडीमुळे गुंतवणूकदारांचे तब्बल ६ लाख कोटी पाण्यात गेल्याचा अंदाज आहे. BSE अर्थात मुंबई शेअर बाजारातील लिस्टेड कंपन्यांचं एकूण मूल्य कालच्या ४५२.६ लाख कोटींवरून ४४६.५ लाख कोटींपर्यंत खाली आलं. अवघ्या काही मिनिटांत तब्बल ६ लाख कोटींचा चुराडा झाल्यामुळे गुंतवणूकदारांमध्ये चिंतेचं वातावारण पाहायला मिळालं. फक्त गेल्या चार दिवसांत गुंतवणूकदारांना या पडझडीच्या परिणामस्वरूप तब्बल १३ लाख कोटींहून जास्त पैशांवर पाणी सोडावं लागलं आहे. दरम्यान, हवालदील गुंतवणूकदार आता एवढ्या पडझडीची कारणं काय याचा विचार करू लागले आहेत. यात सर्वात पहिलं कारण हे अमेरिकेतील केंद्रीय बँकेनं ४.५० टक्के व्याजदर थेट ०.२५ बेसिस पॉइंट्सनं कमी करून ४.२५ टक्क्यांवर आणल्याचं दिलं जात आहे. याचा फटका जगभरातल्या शेअर बाजारात कमी-अधिक प्रमाणात दिसून येत असल्याचं जाणकारांचं मत आहे. याव्यतिरिक्त विदेशातील गुंतवणूकदारांकडून (FII) भारतातील इक्विटीची केली जाणारी विक्री हेदेखील या पडझडीमागील कारण सांगितलं जात आहे. गेल्या तीन सत्रांत मिळून ही विक्री तब्बल ८ हजार कोटींच्या घरात गेली आहे. Sensex: शेअर बाजारात १००० अंशांची घसरण का? याव्यतिरिक्त रुपयाचं दिवसेंदिवस होणारं अवमूल्यन हादेखील शेअर बाजारातील पडझडीतील महत्त्वाचा घटक मानला जात आहे. गुरुवारी रुपयानं ८५.२ प्रतिडॉलर इतका ऐतिहासिक नीचांक गाठल्यानं भारतीय शेअर मार्केटला मोठा धक्का बसला. None

About Us

Get our latest news in multiple languages with just one click. We are using highly optimized algorithms to bring you hoax-free news from various sources in India.