KRIDA

PAK vs BAN : बांगलादेशविरुद्धच्या पराभवानंतर पाकिस्तानचा संघ तुफान ट्रोल, सोशल मीडियावर मीम्सचा पाऊस

Bangladesh Beat Pakistan by 10 Wickets memes reactions viral on social media : पाकिस्तान आणि बांगलादेश यांच्यात खेळल्या जात असलेल्या कसोटी मालिकेतील पहिल्या सामन्यात बांगलादेश संघाने पाकिस्तानचा दारुण पराभव केला. बांगलादेश संघाने हा सामना १० गडी राखून जिंकला. हा बांगलादेशचा कसोटी इतिहासातील पाकिस्तानविरुद्धचा पहिला विजय आहे. दरम्यान, पाकिस्तानला सर्व बाजूंनी ट्रोलिंगचा सामना करावा लागला. चाहते सोशल मीडियावर अनेक मीम्स शेअर करत आहेत. पाकिस्तान विरुद्ध बांगलादेश सामना संपताच पाकिस्तानी संघाचे खेळाडू सोशल मीडियावर ट्रेंड करू लागले. पाकिस्तानी चाहत्यांसोबतच भारतीय चाहतेही त्यांना सोशल मीडियावर ट्रोल करत आहेत. Indian fans watching Pakistan lose to Bangladesh at home ground after declaring the 1st innings #PAKvsBAN pic.twitter.com/3D7Ei66Lzf Pakistan Cricket team…?? #PAKvsBAN pic.twitter.com/ejy5lwPs0c – Pace is Pace Yaar – Babar is lumber 1 – Best Pace trio – PSL is the best – 150+ bowlers Result : Pakistan lost to Bangladesh at home #PAKvsBAN #PAKvBAN pic.twitter.com/B6wnNB8GrR बांगलादेशने केली ऐतिहासिक विजयाची नोंद – #PAKvsBAN pic.twitter.com/vYN7QPCBWq सामन्याच्या सुरुवातीला बांगलादेशने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. पाकिस्तान संघाने पहिल्या डावात ६ गडी गमावून ४४८ धावा करून डाव घोषित केला. या डावात पाकिस्तानच्या फलंदाजांनी चमकदार कामगिरी केली, पण बांगलादेशच्या गोलंदाजांनीही त्यांना आपल्या मेहनतीने अधिक धावा करण्यापासून रोखले. यानंतर बांगलादेश संघाने फलंदाजी करत ५६५ धावांची मोठी धावसंख्या उभारली. या खेळीदरम्यान बांगलादेशच्या फलंदाजांनी आरामात खेळ करत पाकिस्तानच्या गोलंदाजांचा कडवा सामना करत ११७ धावांची आघाडी मिळवली. Pakistan Cricket. #PAKvsBAN pic.twitter.com/BCtNNOQTCN हेही वाचा – PAK vs BAN : पाकिस्तानची बांगलादेशविरुद्धच्या लाजिरवाण्या पराभवानंतर क्रिकेट विश्वात फजिती! डब्ल्यूटीसी गुणतालिकेतही घसरण पाकिस्तानच्या दुसऱ्या डावात बांगलादेशच्या गोलंदाजांनी अप्रतिम गोलंदाजी करत त्यांना १४६ धावांत गुंडाळले. बांगलादेशला विजयासाठी ३० धावांचे सोपे लक्ष्य मिळाले होते, जे त्यांनी एकही विकेट न गमावता केवळ ६.३ षटकांत पूर्ण केले. या विजयासह बांगलादेशने केवळ सामना जिंकला नाही तर मालिकेतील आपली पकड मजबूत केली. हा विजय बांगलादेश क्रिकेट संघासाठी एक मोठे यश आहे, ज्यामध्ये त्यांनी गोलंदाजी, फलंदाजी आणि क्षेत्ररक्षण या तिन्ही क्षेत्रांमध्ये चमकदार कामगिरी केली. None

About Us

Get our latest news in multiple languages with just one click. We are using highly optimized algorithms to bring you hoax-free news from various sources in India.