KRIDA

BCCI Secretary: कोण होणार बीसीसीआय सचिव? दिवंगत भाजपा नेत्याच्या मुलाची चर्चा

Who Will became BCCI Secretary After Jay Shah: भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (BCCI) चे सचिव जय शाह हे आयसीसीचे अध्यक्ष होणार असल्याची जोरदार चर्चा आहे. पण जर जय शाह आयसीसीचे अध्यक्ष झाले तर बीसीसीआयचे सचिव कोण होणार अशी चर्चा सध्या सुरू आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, जय शाह यांना आयसीसीच्या १६ पैकी १५ सदस्यांचा पाठिंबा आहे. मात्र बीसीसीआय सचिवपदाचा त्यांचा कार्यकाळ अद्याप बाकी आहे. यादरम्यान आता बीसीसीआयच्या सचिवपदी अरूण जेटली यांच्या मुलाची नियुक्ती होणार असल्याचे म्हटले जात आहे. हेही वाचा – VIDEO: सचिन तेंडुलकर आणि ‘बाकरवडी-चहा’, नवी जाहिरात का करतेय प्रेक्षकांना भावुक? जय शाह आयसीसीचे अध्यक्ष बनले तर त्यांच्या जागी बीसीसीआयचे सचिव कोण होणार याबाबत अनेक तर्कवितर्क लावले जात आहेत. आता एका अहवालात असा दावा करण्यात आला आहे की डीडीसीएचे रोहन जेटली हे बीसीसीआय सचिवपदी जय शाह यांच्या जागी निवड होण्याच्या शर्यतीत आघाडीवर आहेत. दैनिक भास्करच्या वृत्तानुसार, जय शाह यांनी पुढील आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या (ICC) अध्यक्षपदासाठी अर्ज भरल्यास, रोहन जेटली त्यांची जागा बीसीसीआयचे पुढील सचिव म्हणून घेतील. बीसीसीआयचे विद्यमान सचिव जय शाह हे आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेचे (आयसीसी) अध्यक्ष होणार हे जवळपास निश्चित झाले आहे. २६ ऑगस्टच्या सायंकाळपर्यंत ते उमेदवारी अर्ज भरू शकतात. अशा स्थितीत शाह यांना भारतीय क्रिकेट बोर्डाचे पद सोडावे लागणार आहे. आयसीसीचे विद्यमान अध्यक्ष ग्रेग बार्कले यांचा कार्यकाळ ३० नोव्हेंबर रोजी संपणार आहे. हेही वाचा – PAK vs BAN: बांगलादेशकडून पराभूत झाल्यानंतरही पाकिस्तान WTC फायनलमध्ये पोहोचू शकतो? काय आहे समीकरण? जय शाह यांचा कार्यकाळ सप्टेंबर २०२५ मध्ये संपत असून ते ICC चेअरमन झाले तर त्यांना BCCI सचिव पदाचा राजीनामा द्यावा लागेल. यानंतर बीसीसीआयमध्ये पुन्हा पद मिळविण्यासाठी त्यांना साडेतीन वर्षांच्या कूलिंग ऑफ कालावधीतून जावे लागेल. अशा परिस्थितीत जय शाह नोव्हेंबरमध्ये होणाऱ्या आयसीसी अध्यक्षपदाची निवडणूक लढवणार की नाही हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. या निवडणुकीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख २७ ऑगस्ट आहे. आतापर्यंत ४ भारतीयांनी आयसीसी प्रमुखपद भूषवले आहे. जगमोहन दालमिया १९९७ ते २००० पर्यंत आयसीसीचे अध्यक्ष होते. शरद पवार २०१० ते २०१२ पर्यंत ICC चे अध्यक्ष होते. एन श्रीनिवासन हे २०१४ ते २०१५ मध्ये आणि शशांक मनोहर २०१५-२०२० मध्ये ICC चे अध्यक्ष होते. २०१५ पूर्वी आयसीसी प्रमुखांना चीफ प्रेसिडेंट म्हटले जायचे. यानंतर त्यांना अध्यक्ष म्हणून संबोधले जाऊ लागले. None

About Us

Get our latest news in multiple languages with just one click. We are using highly optimized algorithms to bring you hoax-free news from various sources in India.