KRIDA

Manu Bhaker : मनू भाकेर सूर्यकुमार यादवकडून शिकतेय क्रिकेट, इन्स्टा स्टोरीवर शेअर केला खास फोटो

Manu Bhaker meets Suryakumar Yadav Shared a photo : पॅरिस ऑलिम्पिक २०२४ मध्ये भारतासाठी दोन पदके जिंकून इतिहास घडवणारी नेमबाज मनू भाकेर आजकाल नवीन खेळांचे बारकावे शिकत आहे. नुकतीच तिने घोडेस्वारी, भरतनाट्यम आणि स्केटिंग शिकण्याची इच्छा व्यक्त केली होती. आता ती क्रिकेट शिकतानाही दिसत आहे. मनूने रविवारी भारताचा टी-२० कर्णधार सूर्यकुमार यादवसोबतचा एक फोटो शेअर केला. मनूने या फोटोसाठी एक अप्रतिम कॅप्शनही दिलं आहे. मनूने इन्स्टा स्टोरीवर शेअर केलेल्या फोटोच्या कॅप्शनमध्ये लिहिले, “मी भारताच्या मिस्टर ३६० सोबत नवीन खेळाचे तंत्र शिकत आहे.” फोटोमध्ये मनू बॅटिंग पोज देताना दिसत आहे. संपूर्ण मैदानातील विविध शॉट खेळण्याच्या क्षमतेमुळे सूर्यकुमार यादवला मिस्टर ३६० म्हटले जाते. दक्षिण आफ्रिकेचा माजी क्रिकेटपटू एबी डिव्हिलियर्स यांच्यामुळे हे नाव लोकप्रिय झाले होते. पॅरिसमध्ये इतिहास रचल्यानंतर मनू सध्या तीन महिन्यांच्या विश्रांतीवर आहे. आता ती भारतीय संघाच्या टी-२० कर्णधाराकडून क्रिकेटचे तंत्र शिकत आहे. मनू भाकेरने पॅरिस २०२४ ऑलिम्पिकमध्ये महिलांच्या १० मीटर एअर पिस्तूल आणि मिश्र १० मीटर एअर पिस्तूल स्पर्धेत दोन कांस्यपदके जिंकून इतिहास रचला होता. ऑलिम्पिक स्पर्धेच्या एकाच हंगामात दोन पदकावंर नाव कोरणारी ती स्वातंत्र्यानंतरची पहिली भारतीय खेळाडू ठरली. टोकियो २०२० ऑलिम्पिकमध्ये मनूला निराशेचा सामना करावा लागला, जिथे ती तिच्या तिन्ही स्पर्धांमध्ये अंतिम फेरीत पोहोचू शकली नव्हती. Learning techniques of a new sport with the Mr. 360 of India! @surya_14kumar ? pic.twitter.com/nWVrwxWYqy हेही वाचा – Suryakumar Yadav : IPL 2025 च्या मेगा ऑक्शनपूर्वी KKR चा मास्टरस्ट्रोक, सूर्याला दिली कर्णधारपदाची ऑफर? हा फोटो पाहून चाहते खूप खुश झाले आहेत. एका यूजरने लिहिले, ‘भारताचे दोन सुपरस्टार. आजच्या दिवसातील सुंदर आणि आयकॉनिक फोटो. देव तुम्हा दोघांचे कल्याण करो. तर दुसऱ्या युजरने लिहिले, ‘एका फ्रेममध्ये दोन चॅम्प्स.’ याआधी मनूला एका कार्यक्रमादरम्यान नीरज चोप्राबद्दल लग्नासंबंधी प्रश्न विचारण्यात आला होता. हेही वाचा – KL Rahul : ‘…अशी शिक्षा मला शाळेतही कधी मिळाली नाही’, Koffee With Karan शोच्या वादावर केएल राहुलचे पाच वर्षांनंतर मोठे वक्तव्य ती स्पष्ट शब्दात म्हणाली की, ‘सोशल मीडियावर ज्या पद्धतीची चर्चा सुरू आहे, तसं माझ्यात आणि नीरजमध्ये काहीही नाही. तो मला सीनिअर आहे.’ याआधी मनूचे वडील राम किशन यांनी निवेदन दिले होते. ते म्हणाले होते की, ‘मनू अजून खूप लहान आहे. तिचे वयही लग्नाचे नाही. त्यामुळे याबद्दल आम्ही सध्या विचार करत नाही.’ None

About Us

Get our latest news in multiple languages with just one click. We are using highly optimized algorithms to bring you hoax-free news from various sources in India.