KRIDA

PAK vs BAN: पाकिस्तानचा घरच्या मैदानावर लाजिरवाणा पराभव, कसोटी क्रिकेटच्या इतिहासात बांगलादेशने पहिल्यांदा मिळवला विजय

Bangladesh Beat Pakistan For The First Time in History of Test: बांगलादेशच्या क्रिकेट संघाने कसोटी सामन्यात इतिहास रचला आहे. बांगलादेश आणि पाकिस्तान यांच्यात सुरू असलेल्य रावळपिंडी कसोटी सामन्यात बांगलादेशने पाकिस्तान संघाचा १० विकेट्सने पराभव केला आहे. बांगलादेशने पाकिस्तानविरुद्धच्या २ सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिल्या सामन्यात आपली पकड घट्ट केली. रावळपिंडीत पहिल्या डावात ६ बाद ४४८ धावा केल्यानंतर पाकिस्तानचा संघ दुसऱ्या डावात १४६ धावांवर बाद झाला. मोहम्मद रिझवान वगळता एकाही फलंदाजाला चांगली कामगिरी करता आली नाही. हेही वाचा – WTC Points Table: श्रीलंकेचा पराभव करत इंग्लंडची WTC गुणतालिकेत मोठी झेप, पाकिस्तानसह ‘या’ देशांना टाकलं मागे, भारत कितव्या स्थानी? बांगलादेशच्या विजयाचा हिरो ठरला तो मुशफिकर रहीम, ज्याने पहिल्या डावात १९१ धावांची खेळी केली, तर दुसऱ्या डावात मेहंदी हसन मिराज (४ विकेट) आणि शकीब अल हसन (३ विकेट) यांनी दमदार गोलंदाजी करत पाकिस्तानच्या फलंदाजांना फार काळ मैदानात टिकू दिले नाही. रावळपिंडी कसोटी सामन्यापूर्वी दोन्ही संघांमध्ये १४ सामने झाले आहेत. यादरम्यान पाकिस्तानने १२ कसोटी जिंकल्या आहेत. वादग्रस्त शाकिब अल हसनच्या शानदार गोलंदाजीच्या जोरावर बांगलादेशने इतिहास रचला आहे. शकिबवर गिरणी कामगाराच्या हत्येचा आरोप करण्यात आला आहे. पाकिस्तानविरुद्धच्या दुसऱ्या कसोटीत त्याच्या खेळण्यावर अनिश्चितता आहे. दरम्यान, त्याने ३ मोठ्या विकेट घेतल्या. बांगलादेशकडून मेहदी हसन मिराझने सर्वाधिक ४ विकेट घेतले. दुसऱ्या डावात बांगलादेशला विजयासाठी ३० धावांचे लक्ष्य होते, बांगलादेशने ते सहज गाठले आणि सामना १० गडी राखून जिंकला. हेही वाचा – Virat Kohli Shikhar Dhawan: “तुझी ट्रेडमार्क स्माईल अन् असंख्य आठवणी…” शिखर धवनच्या निवृत्तीवर विराट कोहलीची भावुक पोस्ट, पाहा काय म्हणाला? पाकिस्तानकडून पहिल्या डावात मोहम्मद रिझवानने १७१ धावांची नाबाद खेळी तर सौद शकीलने १४१ धावांची खेळी केली. या दोघांच्या खेळीच्या जोरावर पाकिस्तानने ४४८ धावा केल्या, मात्र दुसऱ्या डावात बांगलादेशच्या उत्कृष्ट गोलंदाजीसमोर पाकिस्तानची फलंदाजी पूर्णपणे गारद झाली. फक्त रिझवानने ५१ धावांची खेळी खेळली तर इतर फलंदाज पूर्णपणे अपयशी ठरले. बाबर आझमला पहिल्या डावात खातेही उघडता आले नाही तर दुसऱ्या डावातही तो २२ धावा करून बाद झाला. रिझवानने दोन्ही डावात शानदार फलंदाजी केली, पण त्याला इतर फलंदाजांची साथ मिळू शकली नाही आणि पाकिस्तानचा पराभव झाला. हेही वाचा – VIDEO: “कबुतरासारखा उड्या मारत असतो…” पाकिस्तानच्या मोहम्मद रिझवानवर भारतीय अंपायरचं मोठं विधान, सर्व विकेटकिपर्सनाही दिली सक्त ताकीद Bangladesh ? Pakistan | 1st Test | Rawalpindi Bangladesh won by 10 wickets ??? PC: PCB #BCB #Cricket #BDCricket #Bangladesh #PAKvBAN #WTC25 pic.twitter.com/yqNmaQ6rsL PAK vs BAN 1st Test: बांगलादेशच्या विजयाचा हिरो पाकिस्तानवर ऐतिहासिक विजय मिळवण्यात बांगलादेशच्या संपूर्ण संघाचे मोठे योगदान होते, परंतु या संघाच्या विजयाचा खरा हिरो मुशफिकुर रहीम होता, ज्याने पहिल्या डावात १९१ धावा करून पाकिस्तानच्या विजयाचे मनसुबे उधळले. रहीम व्यतिरिक्त पहिल्या डावात सादमान इस्लामने ९३ धावा, मोमिनुल हकने ५० धावा, लिटन दास ५६ धावा आणि मेहंदी हसन मिराजने ७७ धावांचे योगदान दिले. याशिवाय या संघासाठी दुसऱ्या डावात शाकिबने ३ तर मिराजने ४ विकेट घेत पाकिस्तानच्या फलंदाजांवर नियंत्रण ठेवले. None

About Us

Get our latest news in multiple languages with just one click. We are using highly optimized algorithms to bring you hoax-free news from various sources in India.