KRIDA

KL Rahul : ‘…अशी शिक्षा मला शाळेतही कधी मिळाली नाही’, Koffee With Karan शोच्या वादावर केएल राहुलचे पाच वर्षांनंतर मोठे वक्तव्य

KL Rahul says never got suspended punished in school but Koffee with Karan controversy interview : भारतीय क्रिकटक केएल राहुलने ५ वर्षे जुन्या मुद्द्यावर मौन तोडले आहे. सुमारे ५ वर्षांपूर्वी केएल राहुल आणि अष्टपैलू खेळाडू हार्दिक पंड्या प्रसिद्ध बॉलिवूड दिग्दर्शक करण जोहरच्या ‘कॉफी विथ करण’ शोमध्ये दिसले होते. या शोमध्ये राहुल आणि हार्दिकने महिलांबद्दल जे वक्तव्य केले होते, ते लोकांना अजिबात आवडले नव्हते. या शोनंतर राहुल आणि हार्दिकला अनेक अडचणींचा सामना करावा लागला होता, ज्यावर आता केएल राहुलने एका मुलाखतीत खुलासा केला आहे. तो म्हणाला या शोमधील मुलाखतीनंतर मला अशी शिक्षा मिळाली, जी कधी मला शाळेतही मिळाली नव्हती. केएल राहुल नुकताच निखिल कामतच्या पॉडकास्ट शोमध्ये पोहोचला होता. जिथे त्याने माागील पाच वर्षांपूर्वी झालेल्या या वादावर प्रतिक्रिया दिली. यावेळी केएल राहुल म्हणाला की, या घटनेनंतर त्याला अशी शिक्षा मिळाली जी त्याला शाळेतही कधी मिळाली नव्हती. वास्तविक, राहुल आणि हार्दिक ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर होते, जेव्हा हा एपिसोड रिलीज झाला तेव्हा त्यांना मोठ्या टीकेला सामोरे जावे लागले. या एपिसोडमधील त्यांच्या वक्तव्यांचा इतका खोल परिणाम झाला की दोघांना हा दौरा अर्ध्यात सोडून भारतात परतावे लागले. ऑस्ट्रेलियाच्या वनडे मालिकेतून या दोन्ही खेळाडूंना निलंबित केले होते. Rahul said "Koffee with Karan interview scarred me massively – getting suspended from the team – I have never been suspended in school or punished – I don't know how to handle it – I did mischief in school but nothing to get me expelled or called my parents". [Nikhil Kamath YT] pic.twitter.com/DYUXXZgO2M केएल राहुल म्हणाला, “मी त्यावेळी ट्रोलिंगकडे फारसं लक्ष द्यायचो नाही, मला वाटायचं याने काही फरक पडत नाही. मी त्या शोममध्ये गेलो होतो, तेव्हा मी नुकतीच देशाकडून खेळायला सुरूवात केली होती. त्या शोनंतर मला खूप ट्रोलिंगचा सामना कराला लागला. मी बसलो तरी ट्रोल, उभा राहिलो तरी ट्रोल व्हायचो. ही मुलाखत एक वेगळीच दुनिया होती. ज्यामुळे मी पूर्णपणे बदललो. मी लहानपणापासूनच खूप लाजाळू आणि मृदुभाषी होतो. त्यानंतर भारताकडून खेळताना माझा आत्मविश्वास वाढला. जर एका खोलीत १०० लोक असतील तर प्रत्येकजण मला ओळखेल कारण मी सर्वांशी संवाद साधतो.” हेही वाचा – Suryakumar Yadav : IPL 2025 च्या मेगा ऑक्शनपूर्वी KKR चा मास्टरस्ट्रोक, सूर्याला दिली कर्णधारपदाची ऑफर? यानंतर केएल राहुलने पुढे त्याच्यात झालेल्या बदलांबद्दल सांगताना म्हणाला, “पण मी आता जास्त बोलत नाही, कारण त्या मुलाखतीने मला चांगलीच अद्दल घडवली आणि त्यावेळी मी खूप घाबरलो होतो. कारण मला संघातून निलंबित व्हावे लागले. विशेष म्हणजेमला शाळेतूनही कधी निलंबित केले गेले नव्हते. तसेच मला शाळेत कधी शिक्षाही झाली नाही. शाळेत मी छोट्या-छोट्या खोड्या केल्या आहेत, पण मला शाळेतून काढून टाकले जाईल किंवा माझ्या पालकांना यावे लागेल असे काही केले नाही. हे सर्व माझ्या बाबतीत कधीच घडले नाही. त्यामुळे मला या सर्व गोष्टींना कसे सामोरे जायटे हे माहित नव्हते.” None

About Us

Get our latest news in multiple languages with just one click. We are using highly optimized algorithms to bring you hoax-free news from various sources in India.