KRIDA

WI vs SA: पुन्हा जिंकता जिंकता हरली दक्षिण आफ्रिका, अखेरच्या ५ षटकांत वेस्ट इंडिजने पालटला सामना, २० धावांत ७ विकेट…

WI vs SA 2nd T20I Highlights: वेस्ट इंडिज आणि दक्षिण आफ्रिका संघांमध्ये तीन सामन्यांची टी-२० मालिका खेळवली जात आहे. या मालिकेत वेस्ट इंडिजने पहिले दोन्ही सामने जिंकून मालिका आपल्या नावे केली आहे. ब्रायन लारा क्रिकेट अकादमीमध्ये येथे खेळवल्या गेलेल्या दुसऱ्या टी-२० सामन्यात १७९ धावांचे लक्ष्य राखून वेस्ट इंडिजने दक्षिण आफ्रिकेविरुद्धची सलग तिसरी मालिका जिंकली. रीझा हेंड्रिक्सच्या २४४.४४च्या स्ट्राईक रेटने १८ चेंडूत केलेल्या ४४ धावांच्या खेळीच्या जोरावर दक्षिण आफ्रिकेचा संघ मजबूत स्थितीत होता. त्यांनी १४व्या षटकापर्यंत ३ गडी बाद १२९ धावा केल्या होत्या, परंतु ३५ चेंडूत २० धावांत ७ विकेट गमावल्याने संघ १९.४ षटकात १४९ धावा करत ऑल आऊट झाला आणि ३० धावांनी पराभवाला सामोरे जावे लागले. हेही वाचा – PAK vs BAN: शकिब अल हसनने रागाच्या भरात मोहम्मद रिझवानला फेकून मारला चेंडू, पंचांनीही घेतला आक्षेप; पाहा VIDEO दुसऱ्या टी-२० सामन्यात प्रथम फलंदाजी करताना वेस्ट इंडिजने २० षटकांत ६ गडी गमावून २७९ धावा केल्या. शाई होपने संघाकडून सर्वाधिक धावा केल्या. त्याने ४१ धावांचे योगदान दिले. तर कर्णधार रोवमन पॉवेलने ३५ धावा केल्या. सरफेन रदरफोर्डने १८ चेंडूंत ३ चौकार आणि दोन षटकारांसह २९ धावा केल्या. या खेळाडूंमुळेच वेस्ट इंडिज संघाला सन्मानजनक धावसंख्या उभारता आली. ट्रिस्टन स्टब्स आणि डोनोव्हन फरेरा यांना बाद करून अकेल होसेन आणि गुडाकेश मोतीने वेस्ट इंडिजला महत्त्वपूर्ण विकेट मिळवून दिल्या. यानंतर रोमॅरियो शेफर्ड आणि शामर जोसेफ यांनी दक्षिण आफ्रिकेला सर्वबाद केले. शेफर्डने चार षटकांत १५ धावांत ३ विकेट घेतले आणि जोसेफने ३१ धावांत ३ विकेट घेतले. या दोघांनी मिळून मालिकेत बरोबरी साधण्याच्या दक्षिण आफ्रिकेच्या आशा धुळीस मिळवल्या. हेही वाचा – PAK vs BAN: पाकिस्तानचा घरच्या मैदानावर लाजिरवाणा पराभव, कसोटी क्रिकेटच्या इतिहासात बांगलादेशने पहिल्यांदा मिळवला विजय An emphatic series win for the #MenInMaroon taking it with precision bowling in the clutch ???? #WIvSA #T20Fest pic.twitter.com/VeOmZgd92x वेस्ट इंडिजची फलंदाजी वेस्ट इंडिजने या मैदानावर दोन दिवसांपूर्वी १७५ धावांचा सर्वात यशस्वी लक्ष्य पाठलाग केला होता. दक्षिण आफ्रिकेची सुरुवात वेगवान झाली. त्यांनी दहा षटकांत १०० धावा केल्या, परंतु वेस्ट इंडिजने १०व्या आणि १४व्या षटकांमध्ये फक्त एक चौकार मारण्याची संधी दिली. अशा स्थितीत दक्षिण आफ्रिकेने दडपणाखाली येऊन सामना गमावला. दक्षिण आफ्रिकेच्या खालच्या फळीने अत्यंत खराब कामगिरी केली. शेवटच्या सहा फलंदाजांना दुहेरी आकडा गाठता आला नाही. हेही वाचा – Rohit Sharma Shikhar Dhawan: “तू नेहमीच माझ्यासाठी…” रोहित शर्माची ‘अल्टीमेट जाट’साठी खास पोस्ट, धवनबरोबरचे जुने फोटो केले शेअर वेस्ट इंडिजच्या फलंदाजीबद्दल बोलायचे तर शाई होपने २२ चेंडूत ४१ धावा केल्या आणि कर्णधार रोव्हमन पॉवेलने २२ चेंडूत ३५ धावा केल्या. शेरफेन रदरफोर्डने १८ चेंडूत २९ आणि अलिक अथनाजेने २१ चेंडूत २८ धावा केल्या. दक्षिण आफ्रिकेकडून लिझार्ड विल्यम्सने ३६ धावांत ३ विकेट घेतले. पॅट्रिक क्रुगरने २ विकेट घेतले. ओटेनिल बार्टमनने १ विकेट घेतली. None

About Us

Get our latest news in multiple languages with just one click. We are using highly optimized algorithms to bring you hoax-free news from various sources in India.