KRIDA

PAK vs BAN: शकिब अल हसनने रागाच्या भरात मोहम्मद रिझवानला फेकून मारला चेंडू, पंचांनीही घेतला आक्षेप; पाहा VIDEO

PAK vs BAN Shakib Al Hasan Threw Ball on Mohammed Rizwan: पाकिस्तानविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात बांगलादेशने १० विकेट्सने विजय मिळवला. या विजयासह कसोटी क्रिकेटमध्ये पहिल्यांदा बांगलादेशने पाकिस्तानचा पराभव केला आहे. पहिला कसोटी सामना बांगलादेशने जिंकत कसोटी मालिकेत आघाडी मिळवली. या सामन्यातील दुसऱ्या डावात पाकिस्तानकडून मोहम्मद रिझवानने ५० धावा केल्या. पण त्याच्या या खेळीदरम्यान शकिब अल हसनने रिझवानवर चेंडू फेकून मारला. हेही वाचा – PAK vs BAN: पाकिस्तानचा घरच्या मैदानावर लाजिरवाणा पराभव, कसोटी क्रिकेटच्या इतिहासात बांगलादेशने पहिल्यांदा मिळवला विजय रावळपिंडी कसोटी सामन्याच्या दुसऱ्या डावात एक घटना घडली. या सामन्याच्या शेवटच्या म्हणजेच ५व्या दिवशी अनेक तणावपूर्ण आणि नाट्यमय क्षण पाहायला मिळाले. खेळाच्या शेवटच्या दिवशी लंचच्या आधी, बांगलादेशचा अनुभवी अष्टपैलू खेळाडू शकीब अल हसनने असं काही केलं की पंचांना मध्यस्थी करावी लागली. शकीबने फलंदाजी करत असलेल्या मोहम्मद रिझवानच्या दिशेने चेंडू टाकला, जो कदाचित त्याला लागला, परंतु नशीबाने त्याला दुखापत झाली नाही. हेही वाचा – Rohit Sharma Shikhar Dhawan: “तू नेहमीच माझ्यासाठी…” रोहित शर्माची ‘अल्टीमेट जाट’साठी खास पोस्ट, धवनबरोबरचे जुने फोटो केले शेअर PAK vs BAN: शकीबने रिझवानला फेकून मारला चेंडू या सामन्याच्या दुसऱ्या डावातील ३३व्या षटकात शकीब अल हसनकडे चेंडू होता. तो गोलंदाजी करण्यासाठी सज्ज होता, मात्र अखेरच्या क्षणी फलंदाजी करत असलेल्या मोहम्मद रिझवानने माघार घेतली. पण शकीब थांबला नाही आणि अनपेक्षितपणे त्याने चेंडू सरळ त्याच्या दिशेने टाकला. शकीबने तो चेंडू यष्टीरक्षक लिटन दासच्या दिशेने फेकला, जो रिझवानच्या डोक्याला लागला. रिझवान फलंदाजीसाठी तयार नव्हता आणि तो मागे बघत होता. त्याला शाकिब अल हसनच्या कृतीचा राग आला होता. हेही वाचा – Virat Kohli Shikhar Dhawan: “तुझी ट्रेडमार्क स्माईल अन् असंख्य आठवणी…” शिखर धवनच्या निवृत्तीवर विराट कोहलीची भावुक पोस्ट, पाहा काय म्हणाला? शाकिब अल हसनच्या या कृतीनंतर अंपायरिंग करणारे पंच रिचर्ड केटलबरो यांनी यावर आक्षेप घेतला आणि शकिब अल हसनला सक्त ताकीद दिली. मैदानावर असे वर्तन खपवून घेतले जाणार नाही, असे त्यांनी स्पष्ट केले. मात्र, पंचांनी घेतलेल्या आक्षेपानंतर, शकिबही काहीतरी बोलताना दिसला आणि पंचही त्याला काहीतरी निक्षून सांगत असल्याचे दिसत होते. दुसऱ्या डावात शाकिब अल हसनने कठीण परिस्थितीत संघासाठी अर्धशतक झळकावले आणि त्याने ८० चेंडूत ६ चौकारांच्या मदतीने ५१ धावा केल्या. तर गोलंदाजीतही ३ विकेट घेत बांगलादेशच्या ऐतिहासिक विजयात मोठी भूमिका बजावली. हेही वाचा: WTC Points Table: श्रीलंकेचा पराभव करत इंग्लंडची WTC गुणतालिकेत मोठी झेप, पाकिस्तानसह ‘या’ देशांना टाकलं मागे, भारत कितव्या स्थानी? A post shared by Pakistan Cricket (@therealpcb) None

About Us

Get our latest news in multiple languages with just one click. We are using highly optimized algorithms to bring you hoax-free news from various sources in India.