KRIDA

Rohit Sharma: ‘गार्डनमध्ये’ सराव करतोय रोहित शर्मा, कसोटी मालिकेसाठी अभिषेक नायरबरोबर हिटमॅनची जोरदार तयारी, VIDEO व्हायरल

Rohit Sharma Training in Park with Abhishek Nayar Video Viral: भारतीय क्रिकेट संघ सध्या मोठ्या विश्रांतीवर असून थेट पुढील महिन्यापासून कसोटी मालिका खेळण्यासाठी उतरणार आहे. बांगलादेशविरूद्ध घरच्या मैदानावरील दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेसाठी टीम इंडिया पुन्हा अ‍ॅक्शनमध्ये दिसेल. विश्रांतीवर असून खेळाडू कुटुंबाबरोबर वेळ घालवत आहेत. पण तरीही सराव मात्र सुरूच आहे. यादरम्यानच रोहित शर्मा पार्कमध्ये सराव करत असल्याचे व्हीडिओ व्हायरल झाले आहेत. ज्यामध्ये तो नवे सहाय्यक प्रशिक्षक अभिषेक नायरच्या मार्गदर्शनाखाली सराव करत आहे. हेही वाचा – VIDEO: “कबुतरासारखा उड्या मारत असतो…” पाकिस्तानच्या मोहम्मद रिझवानवर भारतीय अंपायरचं मोठं विधान, सर्व विकेटकिपर्सनाही दिली सक्त ताकीद श्रीलंकेत खेळल्या गेलेल्या एकदिवसीय मालिकेनंतर विश्रांती घेतल्यानंतर भारतीय कर्णधार रोहित शर्मा आता मैदानात परतला आहे. सध्या तो पुढील महिन्यापासून बांगलादेशविरुद्धच्या कसोटी मालिकेच्या तयारीत व्यस्त आहे. भारतीय संघ १९ सप्टेंबरपासून मायदेशात बांगलादेशविरुद्ध दोन सामन्यांची कसोटी मालिका खेळणार आहे. यानंतर तीन सामन्यांची टी-२० मालिकाही होणार आहे. देशासाठी आयसीसी ट्रॉफी जिंकण्याचे भारतीय कर्णधाराचे ध्येय आहे. टी-२० विश्वचषक जिंकल्यानंतर आता त्यांचे लक्ष्य चॅम्पियन्स ट्रॉफी आणि वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनल आहे. हेही वाचा – ENG vs SL: इंग्लंडच्या कसोटी संघात भारताच्या माजी खेळाडूचा लेक, अचानक कशी मिळाली संधी? रोहित शर्माचा भारतीय संघाचे सहाय्यक प्रशिक्षक अभिषेक नायरबरोबर सराव करतानाचे काही व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. रोहित शर्मा अभिषेक नायरच्या मार्गदर्शनाखाली सराव करत होता आणि पार्कमध्ये कार्डिओही करताना दिसला. या व्हीडिओमध्ये रोहित शर्मा आणि अभिषेक नायरसह इतरही सहकारी दिसले. अभिषेक नायरने नवे प्रशिक्षक गौतम गंभीर यांच्या नियुक्तीनंतर सहाय्यक प्रशिक्षक म्हणून रूजू झाले. बांगलादेशविरुद्ध मायदेशात खेळल्या जाणाऱ्या कसोटी मालिकेसाठी रोहित तयारी करत असल्याचे दिसत आहे. भारतीय कर्णधाराने मार्च २०२४ मध्ये शेवटचा कसोटी सामना खेळला होता, जो इंग्लंडविरुद्धच्या पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेनंतरचा शेवटचा सामना होता. तेव्हापासून हिटमॅन फक्त वनडे आणि टी-२० क्रिकेट खेळला आहे. त्यामुळे रोहित शर्मा आता कसोटी क्रिकेटसाठी स्वत:ला तयार करत आहे. हेही वाचा – KL Rahul: “त्या मुलाखतीमुळे खूप घाबरलो, संघातून सस्पेंड केलं… “, कॉफी विथ करण वादावर केएल राहुलचे धक्कादायक वक्तव्य Captain Rohit Sharma was seen training in the park.!!! Hitman getting ready for test season?? pic.twitter.com/uqcnHs4R9o Captain Rohit Sharma clicked with Abhishek Nayar after training session.!!! The captain is working hard before the test season.?? pic.twitter.com/wi28o0WgUa बांगलादेशनंतर भारतीय संघ घरच्या मैदानावर न्यूझीलंडविरुद्ध तीन सामन्यांची कसोटी मालिका खेळणार असून त्यानंतर ऑस्ट्रेलियाविरुद्ध त्यांच्याच भूमीवर पाच सामन्यांची बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी खेळली जाणार आहे. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपची अंतिम फेरी गाठण्यासाठी टीम इंडियासाठी या सर्व कसोटी मालिका खूप महत्त्वाच्या असतील. None

About Us

Get our latest news in multiple languages with just one click. We are using highly optimized algorithms to bring you hoax-free news from various sources in India.