LIFESTYLE

हिरव्या पपईची पाने बोटॉक्सपेक्षा अनेक पटीने फायदेशीर आहेत? तज्ज्ञ काय सांगतात वाचा..

Green papaya leaves: अनेक जण हल्ली सोशल मीडियावरील व्हिडीओ पाहून किंवा माहिती वाचून आरोग्यासाठी घरगुती उपचार घेतात. हे उपाय कमी खर्चिक असतात, शिवाय यामुळे कोणतेही दुष्परिणाम होत नाहीत. मात्र, तज्ज्ञांनी या उपाचारांपासून सावधगिरी बाळगण्याचे आवाहन केले आहे; कारण घरगुती उपाय प्रत्येकास अनुकूल नसतात. आम्हाला योगा ट्रेनर मानसी गुलाटी यांची एक इन्स्टग्राम पोस्ट मिळाली, ज्यात त्यांनी “हिरव्या पपईची पाने बोटॉक्सपेक्षा दशलक्ष पटीने अधिक मजबूत आहेत,” हे सांगितले आहे. याचे सत्य जाणून घेण्यासाठी आम्ही तज्ज्ञांचे मत जाणून घेतले. ट्रेनर मानसी गुलाटीच्या या सोशल मीडियावरील पोस्टमध्ये, “हिरव्या पपईची पाने सुरकुत्या आणि बारीक रेषा त्वरित काढून टाकते, मुरुम, त्वचेचा टोन आणि रंग यांसाठी सर्वोत्तम उपायांपैकी एक आहे. यासाठी पपईची पाने १५ मिनिटे पाण्यात बुडवून नंतर ते बारीक करून त्यात दही आणि चिमूटभर हळद घालून हे मिश्रण चेहऱ्यावर लावा”, असे सांगितले आहे. कॉस्मेटिक स्किन अँड होमिओ क्लिनिक राजौरी गार्डन, नवी दिल्ली येथील सौंदर्यशास्त्रीय चिकित्सक आणि सौंदर्यशास्त्रज्ज्ञ डॉ. करुणा मल्होत्रा ​​यांनी सांगितले की, हिरव्या पपईची बोटॉक्सशी तुलना करणे हे एक “ओव्हरसिम्पलीफिकेशन” आहे, कारण ते अतिशय वेगळ्या पद्धतीने कार्य करते. A post shared by Mansi Gulati (@mansifaceyoga) बोटॉक्स (बोट्युलिनम टॉक्सिन) स्नायूंना तात्पुरते अर्धांगवायू करून कार्य करते. “सर्वसाधारणपणे कॉस्मेटिक त्वचाविज्ञानामध्ये याचा वापर चेहऱ्यावरील बारीक रेषा आणि सुरकुत्या कमी करण्यासाठी केला जातो, ज्यामुळे स्नायूंचे आकुंचन रोखले जाते,” असे डॉ. मल्होत्रा ​​म्हणाल्या. बोटॉक्स त्वरित, तात्पुरते परिणाम प्रदान करते, सामान्यतः ३-६ महिने टिकते, डायनॅमिक सुरकुत्यांमध्ये लक्षणीय घट होते. ही एक इंजेक्शनद्वारे उपचार केली जाणारी प्रक्रिया आहे. हेही वाचा: सणासुदीच्या दिवसात मिठाईचे सेवन करण्याची योग्य वेळ कोणती? तज्ज्ञांचे मत जाणून घ्या.. हिरवी पपई हे पपेन, अँटिऑक्सिडंट्स आणि व्हिटॅमिन ए, सी आणि ई सारख्या पोषक तत्वांनी समृद्ध आहे. हे मृत त्वचेच्या पेशी नष्ट करतात, त्वचेच्या नूतनीकरणास प्रोत्साहन देतात. हे व्हिटॅमिन-सी आणि इतर अँटिऑक्सिडंट्स त्वचेच्या वृद्धत्वात योगदान देणाऱ्या मुक्त रॅडिकल्सचा सामना करतात. त्यातील पोषक घटक त्वचेचा पोत, हायड्रेशन आणि चमक सुधारण्यास मदत करतात. हिरव्या पपईची पाने त्यांच्या “नैसर्गिक एक्सफोलिएटिंग आणि अँटीऑक्सिडंट गुणधर्मांमुळे निरोगी त्वचा राखण्यासाठी उत्कृष्ट आहेत.” ते बोटॉक्ससारखे काम करत नाहीत आणि वैद्यकीय प्रक्रियेसाठी पर्याय नाहीत. “बोटॉक्स स्नायूंच्या हालचालीशी संबंधित सुरकुत्या लक्ष्य करते, तर हिरवी पपई त्वचेचे संपूर्ण आरोग्य सुधारण्यास मदत करते,” असे डॉ. मल्होत्रा ​​म्हणाल्या. None

About Us

Get our latest news in multiple languages with just one click. We are using highly optimized algorithms to bring you hoax-free news from various sources in India.