LIFESTYLE

शुगर फ्री आहे म्हणून भरपूर मिठाई खाता? थांबा! शुगर-फ्री आणि नो ॲडेड शुगरमध्ये काय फरक? जाणून घ्या

Sugar-Free Mithai Is It Really A Healthier Choice? : सण-उत्सवांमध्ये विविध प्रकारच्या मिठाई आवर्जून खाल्ल्या जातात, परंतु मधुमेह अर्थात डायबिटीज असलेल्यांनी कितीही मागितले तरी त्यांना हे गोड पदार्थ देता येत नाहीत, त्यामुळे याला पर्याय म्हणून काय करायचं, असा प्रश्न गृहिणींना पडतो. अशावेळी अनेक जण शुगर फ्री मिठाई खातात. काही जण गोड, तिखट, मसालेदार, तेलकट पदार्थ खाणे टाळतात, तर काही जण लो कॅलरीज पदार्थ खाणे पसंत करतात. असे लोक लो कॅलरीज किंवा गोड खायचे झाल्यास शुगर फ्री पदार्थ खाण्याचा पर्याय निवडतात. परंतु, शुगर फ्री पदार्थ खरंच लो कॅलरीज असतात का? त्यात साखरेचा वापर केलेला नसतो का? शुगर फ्री मिठाई किंवा इतर पदार्थ खाणे खरंच आरोग्यासाठी फायदेशीर आहे का? असे अनेक प्रश्न आपल्या मनात येत असतील. पोषणतज्ज्ञ अमिता गद्रे यांनी यासंदर्भात सविस्तर माहिती दिली आहे. शुगर-फ्री मिठाई कशापासून बनते? नावाप्रमाणेच, शुगर-फ्री साखरेशिवाय बनते. शुगर फ्री मिठाई संपूर्णपणे कॅलरी फ्री नसतात, तसेच अशा प्रकारच्या मिठाईचे एकाच वेळी भरपूर प्रमाणात सेवन करू नये. बाजारात विकत मिळणारी शुगर फ्री मिठाई बनवताना त्यात अ‍ॅस्पार्टम किंवा सुक्रॅलोजचा वापर केला जातो. ही दोन्ही रासायनिक, आर्टिफिशियल संयुगे आहेत, जी आपल्या शरीरासाठी घातक आहेत. शुगर फ्री मिठाईमध्ये जरी कमी कॅलरीज असल्या तरीही त्यातील अपायकारक रासायनिक घटक आपल्या मूत्रपिंड आणि यकृतावर परिणाम करू शकतात. शुगर-फ्री मिठाई आरोग्यासाठी चांगली आहे का? पोषणतज्ज्ञ अमिताच्या म्हणण्यानुसार, शुगर-फ्री मिठाई कमी प्रमाणात सेवन करणे पूर्णपणे ठीक आहे, परंतु जेव्हा तुम्ही अति प्रमाणात सेवन करता तेव्हा समस्या उद्भवते. बरेच जण अतिसेवन करतात, विशेषत: सणासुदीच्या काळात तुम्ही शुगर-फ्री मिठाई, रेग्युलर मिठाई किंवा गुळाची मिठाई खात असलात तरी त्याचे प्रमाण किती असावे. शुगर-फ्री आहे याचा अर्थ असा नाही की तुम्ही एका आठवड्यात अर्धा किलोग्रॅम खाऊ शकता, कारण शुगर-फ्री मिठाईमध्ये इतर घटकदेखील असतात, ज्यामुळे अतिरिक्त कॅलरींचा वापर होऊ शकतो. हेही वाचा >> महिनाभर दात न घासल्यास शरीरावर काय परिणाम होतात? डॉक्टरांनी सांगितल्या आरोग्याच्या गंभीर समस्या शुगर-फ्री आणि नो ॲडेड शुगरमध्ये काय फरक आहे? Difference Between Sugar-Free and No Added Sugar? बाजारात केवळ शुगर-फ्री मिठाई उत्पादनेच मिळत नाहीत. ‘नो ॲडेड शुगर’ असे लेबल असलेले अनेक खाद्यपदार्थदेखील आहेत. एक ग्राहक म्हणून, कोणता निवडायचा हे ठरवणे खूप गोंधळात टाकणारे असू शकते; तर दोघांमध्ये काय फरक आहे की ते समान आहेत? जाणून घ्या. शुगर-फ्री फूड्समध्ये पूर्णपणे साखर नसते. दुसरीकडे, ‘नो ॲड शुगर’ असे लेबल असलेल्या खाद्यपदार्थांमध्ये अतिरिक्त साखर नसते. None

About Us

Get our latest news in multiple languages with just one click. We are using highly optimized algorithms to bring you hoax-free news from various sources in India.