LIFESTYLE

फ्रिजमध्ये किती दिवस भात ठेवू शकतो? फ्रिजमध्ये भात ठेवताना कसा ठेवावा? तज्ज्ञांनी केला खुलासा

How ti store rice in the fridge भात हा आपल्या रोजच्या जेवणातील महत्त्वाचा भाग आहे. अनेक लोकांचे जेवण भात खाल्ल्याशिवाय पूर्ण होत नाही. अनेक लोक रात्रीच्या जेवणातील उरलेला भात दुसर्‍या दिवशी खातात. अशावेळी भाताचा ताजेपणा आणि सुरक्षितता राखण्यासाठी तो योग्यरित्या साठवणे आवश्यक आहे. बरेच लोक उरलेला भात रेफ्रिजरेटरमध्ये ठेवतात आणि त्याचे शेल्फ लाइफ वाढवतात आणि अन्न वाया जाऊ नये याचा प्रयत्न करतात. पण, भात सुरक्षितपणे साठवण्यासाठी योग्य कालावधी समजून घेतल्यास अन्नजन्य आजार टाळता येतात आणि भात चवदार आणि पौष्टिक राहील याची खात्री करता येते. याबाबत माहिती देताना कन्सल्टंट डायटिशिअन आणि आहारतज्ज्ञ कनिक्का मल्होत्रा यांनी द इंडियन एक्स्प्रेसला सांगितले की, “भात चांगल्या परिस्थितीत चार ते सहा दिवस रेफ्रिजरेटरमध्ये सुरक्षितपणे साठवला जाऊ शकतो. पण, या कालावधीवर विविध घटक प्रभाव टाकू शकतात. ल्होत्रा यांनी सांगितले की, भात रेफ्रिजरेटरमध्ये ठेवण्यापूर्वी लवकर थंड केला पाहिजे. खोलीच्या तापमानामध्ये भात जास्त वेळ (दोन तासांपेक्षा जास्त) ठेवू नये, कारण ‘temperature danger zone’ म्हणजेच दोन तासांपेक्षा जास्त वेळ भात बाहेर राहिल्यास त्यात जीवाणू वाढू शकतात. भात साठवण्यासाठी उथळ भांडे वापरल्याने ते जलद थंड होण्यास मदत होते आणि बॅक्टेरियाच्या वाढीचा धोका कमी होतो.” हेही वाचा – भेसळयुक्त कुट्टूच्या पिठ्ठामुळे उत्तर प्रदेशात १५० हून अधिक लोकांना अन्नातून विषबाधा झाल्याचा आरोप; कशी ओळखावी भेसळ? तज्ज्ञांकडून जाणून घ्या भात साठवण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या डब्यांच्या प्रकाराबाबत द इंडियन एक्स्प्रेसला माहिती देताना मल्होत्रा ​​यांनी सांगितले की, “हवाबंद डबा वापरू शकता, ज्यामुळे आर्द्रतेचा संपर्क टाळता येतो; त्यामुळे भात जास्त काळ टिकवून ठेवण्यास मदत होते. याउलट, एका मोठ्या खोल डब्यात भात ठेवल्यास तो जास्त काळ गरम राहू शकतो, ज्यामुळे भात खराब होण्याचा धोका वाढतो. रेफ्रिजरेटरने ४०°F (4°C) किंवा त्याहून कमी तापमानदेखील राखले पाहिजे. जर रेफ्रिजरेटर पुरेसे थंड नसेल तर भात लवकर खराब होऊ शकतो. भाताची सुरुवातीची गुणवत्ता आणि तो कसा शिजवला गेला याच्या शेल्फ लाईफ म्हणजे किती काळ भात ताजा राहू शकतो यावर परिणाम होऊ शकतो. योग्य प्रकारे शिजवलेला आणि योग्यरित्या साठवलेला भात हा चुकीच्या पद्धतीने शिजवलेल्या भातापेक्षा जास्त काळ टिकतो. “अन्नामुळे संसर्ग होणाऱ्या आजारांचा (foodborne illnesses) जास्त धोका असलेल्या व्यक्तींसाठी (जसे की वृद्ध, गर्भवती स्त्रिया किंवा ज्यांची रोगप्रतिकारक शक्ती कमकुवत आहे), अतिरिक्त सुरक्षिततेसाठी दोन ते चार दिवसांत शिजवलेला भात खाण्याचा सल्ला दिला जातो,” असे मल्होत्रा ​​ठामपणे सांगतात. हेही वाचा – “नवरात्रीमध्ये खा केळ्यांचे वेफर्स, खारीक अन् काजू-बदामाची पुरी”, सेलिब्रिटी न्यूट्रिशनिस्ट रुजुता दिवेकरचा सल्ला, तज्ज्ञांचे काय आहे मत? मल्होत्रा ​​जोर देऊन सांगतात की, शिफारस केलेल्या कालावधीत म्हणजेच चार ते सहा दिवसामध्ये रेफ्रिजेटरमध्ये ठेवूनही खराब होऊ शकतो. भात खराब झाला आहे हे ओळखण्याची अनेक चिन्हे दिसतात ज्यावरून तो खाण्यासाठी सुरक्षित आहे की नाही ते समजते. भाताचा आंबट वास हे भात खराब होण्याचे प्राथमिक चिन्ह आहे, जे बॅक्टेरियाच्या वाढीस सूचित करते. याव्यतिरिक्त, जर भाताने एक पातळ पोत विकसित केला असेल, तर हे ओलावा टिकवून ठेवण्याचे आणि संभाव्य किण्वन दर्शवते, ज्यामुळे ते वापरणे असुरक्षित होते. हिरवे, निळे किंवा काळे ठिपके यांसारखी चिन्हे ही भात ताबडतोब टाकून देण्याची स्पष्ट चिन्हे आहेत. मल्होत्रा ​​सांगतात की, “जरी शिजवलेला भात सामान्य दिसत असला, तरी तो अयोग्यरित्या साठवला गेला असेल किंवा खोलीच्या तापमानात जास्त काळ ठेवला गेला असेल, तर ते बॅसिलस सेरेयससारखे हानिकारक जीवाणू निर्माण होऊ शकतात, ज्यामुळे अन्न विषबाधा होऊ शकते.” हेही वाचा – गोविंदा यांना स्वत:च्याच बंदुकीतून लागली होती गोळी; रुग्णालयातून मिळाला डिस्चार्ज! बंदुकीच्या गोळीने झालेली जखम बरी होण्यास किती कालावधी लागतो? शिजवलेल्या भाताचा ताजेपणा वाढवण्यासाठी आणि बॅक्टेरियाच्या वाढीचा धोका कमी करण्यासाठी भात थंड करण्याच्या आणि साठवण्याच्या या सर्वोत्तम पद्धतींचे पालन करा : None

About Us

Get our latest news in multiple languages with just one click. We are using highly optimized algorithms to bring you hoax-free news from various sources in India.