LIFESTYLE

Durga Ashtami 2024 Wishes: दुर्गाष्टमीनिमित्त प्रियजनांना whatsapp Facebook वर खास मराठीतून पाठवा शुभेच्छा; ही घ्या शुभेच्छांची लिस्ट

Durga Ashtami 2024 Wishes Messages: भारतातील अनेक राज्यांमध्ये नवरात्रीचा सण मोठ्या उत्साहात साजरा होत आहे. नवरात्रीचा आठवा दिवस हा अष्टमी किंवा दुर्गा अष्टमी म्हणून ओळखला जातो. शारदीय नवरात्रीमध्ये अष्टमी तिथीला विशेष महत्व आहे. या दिवशी देवी दुर्गेने शुभ-अशुभचा नाश करून भक्तांचे रक्षण केले असे माले जाते. महाष्टमीचा दिवस हा महागौरी मातेला समर्पित आहे, या दिवशी तिची मनोभावे पूजाअर्चा करतात. दुर्गाष्टमीला आज म्हणजेच १० ऑक्टोबर रोजी दुपारी १२.३१ वाजता सुरुवात झाली असून ती ११ ऑक्टोबर २०२४ ला रात्री १२.०६ पर्यंत चालेल. यानिमित्ताने लोक एकमेकांना दुर्गाष्टमीच्या शुभेच्छा पाठवतात. त्यामुळे आम्ही तुमच्यासाठी खास मराठी शुभेच्छा संदेश घेऊन आलो आहोत. ज्या तुम्ही तुमच्या मित्रपरिवाराला आणि प्रियजनांना पाठवू शकता. Durga Ashtami and Navami 2024 : ११ की १२ ऑक्टोबर; अष्टमी व नवमी नेमकी कोणत्या दिवशी? जाणून घ्या योग्य तारीख आणि महत्त्व १) सर्व मंगल मांगल्ये, शिवे सर्वार्थ साधिके, शरण्ये त्र्यम्बके गौरि नारायणी नमोस्तुते, आपणा सर्वांना दुर्गाष्टमीच्या हार्दिक शुभेच्छा. २) नवरात्रीच्या देवीचे नऊ रूप तुम्हाला कीर्ती, प्रसिद्धी, आरोग्य देवो. धन, शिक्षण, सुख, समृद्धी, भक्ती आणि शक्ती मिळो. दुर्गाष्टमीच्या शुभेच्छा. ३) सरस्वतीचा हात असो, आई गौरीची साथ असो, गणेशाचा निवास असो, आई दु्र्गेच्या आशीर्वादाने तुमचे जीवन प्रकाशमान होवो. ४) या देवी सर्वभूतेषु शक्ति रूपेण संस्थिता… नमस्तस्यै नमस्तयै नमस्तस्यै नमो नमः दुर्गाष्टमीच्या हार्दिक शुभेच्छा… ५) सर्वात आधी पूजा तुझी मग बाकी काम करू आला आहे शुभ दिन तुझा तुझ्या चरणी नमन करू दुर्गाष्टमीच्या हार्दिक शुभेच्छा ६) देवी आई वरदान दे फक्त थोडं प्रेम दे तुझ्या चरणी आहे सर्वकाही फक्त तुझा आशीर्वाद दे दुर्गाष्टमीच्या शुभेच्छा! Dasara 2024 Wishes : दसऱ्यानिमित्त नातेवाईक प्रियजनांना WhatsApp, Instagram, Facebook वर खास मराठीतून पाठवा शुभेच्छा; पाहा लिस्ट ७) उपवास करून मन करा पवित्र आईच्या भक्तीत बदलून जाईल सर्व श्रद्धेचं फूल वाहण्याचं हे आहे पर्व जय अंबे जय दुर्गा ८) ती आहे जननी, ती आहे कालिका. जिच्या दरबारात कोणीही नाही उपेक्षित, ती आहे आई दुर्गा. दुर्गाष्टमीच्या खूप खूप शुभेच्छा. ९) लाल रंगाच्या दुपट्टयाने सजला मातेचा दरबार, सुखी झालं मन, हर्षित झाला संसार, सुवर्ण पावलांनी आई आली तुमच्या द्वारी, दुर्गाष्टमीच्या शुभेच्छा. १०) ॐ जयंती मंगला काली भद्रकाली कपालिनी। दुर्गा क्षमा शिवा धात्री स्वाहा स्वधा नमोऽस्तुते। दुर्गाष्टमीच्या हार्दिक शुभेच्छा. None

About Us

Get our latest news in multiple languages with just one click. We are using highly optimized algorithms to bring you hoax-free news from various sources in India.