LIFESTYLE

Belly Fat Loss Yoga Video : पोटाची चरबी कमी करण्यासाठी फक्त ३० सेकंद करा हे योगासने, पाहा VIDEO

Belly Fat Loss Yoga Video : दररोजच्या धकाधकीच्या आयुष्यात आपण आरोग्याकडे लक्ष देत नाही. त्यामुळे दिवसेंदिवस आरोग्याच्या समस्या वाढताना दिसत आहे. बैठी जीवनशैलीमुळे वजन वाढ, वाढता पोटाचा इत्यादी आरोग्याच्या समस्येला सामोरे जावे लागते. पोट कमी करण्यासाठी किंवा वजन कमी करण्यासाठी अनेक जण वाट्टेल ते प्रयत्न करतात पण काहीही फायदा होत नाही. अनेकदा वजन कमी सुद्धा होते पण पोटावरची चरबी कमी होत नाही. तुम्ही सुद्धा या समस्येचा सामना करत आहात का? जर हो तर टेन्शन घेऊ नका, कारण आज आपण पोटाची चरबी कशी कमी करायची, यासाठी खास योगासने जाणून घेणार आहोत. (How to lose belly fat Do these yogas for just 30 seconds) हेही वाचा : Ratan Tata First Job : रतन टाटांना स्वत:च्याच कंपनीत नोकरीसाठी द्यावा लागला होता बायोडाटा; नेमकं घडलं काय होतं? जाणून घ्या रंजक किस्सा हेल्थ आणि लाइफस्टाइल कोच साक्षी देसाई यांनी त्यांच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरून एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये त्या पोटाची चरबी कमी करण्यासाठी काही योगासने सांगतात. व्हिडीओमध्ये साक्षी देसाई सांगतात, “सगळं करून झालं पण पोटाची चरबी तशीच आहे? मी तुम्हाला मदत करेन. व्हिडीओत दाखवलेले रुटीन फॉलो करा आणि व्हिडीओ शेवटपर्यंत बघा.” त्यानंतर त्या खालील योगासने करून दाखवतात. व्हिडीओच्या शेवटी त्या म्हणतात, “आता जर एवढं सारं केले तर थोडे खाण्यावर कंट्रोल करा. नाही तर याचा काहीही उपयोग होणार नाही. धन्यवाद.” A post shared by Sakshi Desai | Health & Lifestyle Coach (@_the_wellness_wave) _the_wellness_wave या त्यांच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरून त्यांनी हा व्हिडीओ शेअर केला असून या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिलेय, “पोटाची चरबी कमी करण्यासाठी रोज हे योगासने करा आणि योग्य आहार घ्या. ही आसने रोज ३० सेकंदसाठी होल्ड करा आणि ३ ते ४ वेळा करा. हेही वाचा : Ratan Tata Death: “घड्याळाची टिकटीक थांबली…” हर्ष गोयंका यांची मन हेलावणारी पोस्ट; पिचाई म्हणाले, ‘भारताला…’ या व्हिडीओवर अनेक युजर्सनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने लिहिलेय, “धन्यवाद. डाएट टीप्स पण सांगत जा” तर एका युजरने लिहिलेय, “अगदी खरे, अतिशय स्तुत्य उपाय! माझा स्वानुभव आहे!” आणखी एका युजरने लिहिलेय, “योगा कठीण आहे पण आरोग्यासाठी उत्तम आहे.” None

About Us

Get our latest news in multiple languages with just one click. We are using highly optimized algorithms to bring you hoax-free news from various sources in India.