MARATHI

पाकिटबंद दूध उकळावं की नाही? तज्ज्ञांचं मत ऐकून व्हाल हैराण...

Interesting Facts : दैनंदिन जीवनात आहार अतिशय महत्त्वाची भूमिका बजावतो. निरोगी आणि सुदृढ जीवनासाठी पोषक आणि संतुलित आहाराचं मोठं योगदान असतं. अशा या आहारातील महत्त्वाचा घटक म्हणजे, दूध. मागील काही दिवसांमध्ये घराघरात बाटलीबंद दुधाची जागा पाकिटबंद दुधानं घेतली आहे. पण, घरात येणारं हे प्लास्टिकच्या पिशवीतील दूध उकळणं योग्य आहे की अयोग्य? हे तुम्हाला ठाऊक आहे का? मुळातच दूध उकळण्याची प्रक्रिया समजून घेणं अतिशय महत्त्वाचं. दूध उकळल्यामुळं त्याची चव आणि गुणविशेषही बदलतात. इतकच नव्हे, तर धोकाही टळतो. पण, नेमका कोणता धोका? तज्ज्ञ दूध उकळण्याविषयी काय सांगतात? पुण्यातील मणिपाल रुग्णालयात इंटरनल मेडिसिन कंसल्टंट डॉ. विचार निगम यांच्या माहितीनुसार दूध जेव्हा 100 अंश सेल्सिअसपेक्षाही अधिक तापमानावर तापवलं जातं तेव्हा त्यातील बॅक्टेरिया आणि मायक्रोऑरगॅनिझम नष्ट होतात. या प्रक्रियेमुळं दूध सेवनास अधिक पोषक ठरतं. उकळण्याच्या प्रक्रियेमुळं दुधातील प्रोटीन डिनॅचर होऊन ते पचण्यास आणखी हलकं होतं. याशिवाय दुधातील स्निग्ध घटक शरीरात सहजपणे शोषून घेण्यास मदत होते. दूध उकळल्यानं त्याची शेल्फ लाईफ वाढून ते काहीसं गोड आणि दाटसर होतं, ज्यामुळं ते लवकर खराबही होत नाही. तज्ज्ञांच्या मते पाकिटबंद दूध पाश्चराईज्ड नसल्यास ते उकळावं, कारण त्यामध्ये पॅकेजिंगआधीच काही जीव आणि बॅक्टेरिया असू शकतात. आहारतज्ज्ञ डॉ. अर्चना बत्रा यांच्या माहितीनुसार सीलबंद पाकिट किंवा डब्यातून येणारं दूध हे सहसा पाश्चराईज्ड असतं. थोडक्यात ते आपल्यापर्यंत येण्याआधीच उकळण्याच्या प्रक्रियेतूनच पुढे आलेलं असतं, ज्यामुळं त्यातील बॅक्टेरिया नष्ट होतात. परिणामी ते न उकळल्यासही चालतं. तरीही बहुतांश तज्ज्ञांच्या मते दूध कायम उकळवूनच वापरावं. (वरील माहिती तज्ज्ञांच्या मतं आणि निरीक्षणांवर आधारित असून, झी 24 तास त्याची खातरजमा करत नाही.)

PAK
138/2
(47.5 ov)
VS
ENG
Full Scorecard →

About Us

Get our latest news in multiple languages with just one click. We are using highly optimized algorithms to bring you hoax-free news from various sources in India.