LIFESTYLE

Chia Seeds Disadvantages : तुम्ही वजन कमी करण्यासाठी चिया सीड्सचे सेवन करता का? मग तोटे आणि किती सेवन करावे हे जाणून घ्या

Chia Seeds Disadvantages In Marathi : पोषक तत्वांनी भरपूर चिया सीड्सचे सेवन केल्याने वजन कमी होण्यास मदत होते. चिया सीड्समध्ये भरपूर फायबर, जीवनसत्त्वे असतात. या बियांचे सेवन आरोग्यासाठी चांगले मानले जाते, पण शरीराला अधिक फायदे मिळतील हे डोक्यात ठेवून काही जण दररोज चिया सीड्सचे पाणी पिण्यास सुरुवात करतात, असे दीर्घकाळ केल्याने फायद्याऐवजी नुकसानसुद्धा (Chia Seeds Disadvantages ) होऊ शकते; त्यामुळे कोणी चिया सीड्सचे सेवन करू नये? चिया सीड्सचे दुष्परिणाम काय आहेत हे आम्ही सांगणार आहोत. चिया सीड्समध्ये भरपूर फायबर, भरपूर प्रथिने, पोटॅशियम, ओमेगा-३ फॅटी ॲसिड, मॅग्नेशियम, कॅल्शियम यांसारखी अनेक जीवनसत्त्वे, खनिजे असतात; जे शाकाहारी आहाराचे सेवन करतात ते चिया सीड्स खाऊ शकतात. चिया सीड्स प्रथिनांचा चांगला स्रोत मानला जातो, त्यामुळे ते पाण्यात घालून दही, स्मूदी, पुडिंग, सॅलेडमध्ये वापरू शकता. वजन कमी करण्यासाठी, सकाळी रिकाम्या पोटी तुम्ही पाणी, लिंबाच्या रसामध्ये भिजवलेले चिया सीड्स घालून जेव्हा पिता, तेव्हा शरीर हे नैसर्गिकरित्या डिटॉक्स करते. हेही वाचा… Chopping Board : तुम्हीसुद्धा भाज्या कापण्यासाठी चॉपिंग बोर्ड वापरता का? मग डॉक्टरांनी सांगितलेल्या ‘या’ गोष्टी नक्की लक्षात ठेवा आता चिया सीड्सचे जास्त सेवन (Chia Seeds Disadvantages ) करणे तुमच्यासाठी किती हानिकारक असू शकते याबद्दल बोलूया… गॅस ॲसिडिटी : अनेक वेळा चिया सीड्सचे जास्त सेवन केल्यानंतर गॅस-ब्लोटिंगसारख्या समस्या उद्भवू लागतात. चिया बियांमध्ये फायबरचे प्रमाण जास्त असते, जे वजन नियंत्रित ठेवण्यास मदत करते. पण, जास्त प्रमाणात चिया बिया खाल्ल्याने पोटात गॅस-ब्लोटिंगसारख्या समस्या उद्भवतात. जर तुम्ही ते पाण्याबरोबर खाल्ले नाही तर काही वेळा अन्ननलिकेमध्ये अडथळा निर्माण होऊ शकतो. पचनावर परिणाम : चिया सीड्स जास्त प्रमाणात खाल्ल्याने इरिटेबल बाऊल सिंड्रोम, कोलायटिस, क्रोहन रोग होऊ शकतो. उच्च फायबर असणाऱ्या आहारामुळे पचनशक्तीवर ताण येऊ शकतो, ज्यामुळे काही लोकांना अस्वस्थता, पोटदुखी किंवा इतर समस्यांचा अनुभव येऊ शकतो; त्यामुळे चियासीड्सचे सेवन करताना काळजी घेणे महत्त्वाचे आहे. रक्तदाबाचा धोका : ज्या लोकांना बीपीची समस्या आहे त्यांनी चिया सीड्सचे सेवन टाळावे. चिया बियांमध्ये आढळणारे ओमेगा-३ फॅटी ॲसिड रक्त पातळ करते आणि त्यामुळे रक्तदाबाचा धोका वाढतो. उलट्या आणि मळमळ : काही जणांना चिया सीड्सची ॲलर्जी असू शकते. काही लोकांना ते खाल्ल्यानंतर उलट्या, मळमळ, जुलाब, जिभेवर किंवा ओठांवर खाज सुटण्याचा अनुभव येऊ शकतो, अशा लोकांनी चिया बिया खाणे टाळावे. चिया बिया खाल्ल्यानंतर असे वाटत असेल तर वेळीच त्याचे सेवन थांबवा. जर तुम्ही वजन कमी करण्यासाठी चिया सीड्स खात असाल तर त्याचे प्रमाण ठरवा. कारण जास्त चिया बिया खाल्ल्याने हानीदेखील होऊ शकते. म्हणून दिवसभर फक्त एक ते दोन चमचे चिया सीड्सचे सेवन करा, यामुळे भूक लागत नाही आणि वजन नियंत्रित करणे सोपे जाईल. None

About Us

Get our latest news in multiple languages with just one click. We are using highly optimized algorithms to bring you hoax-free news from various sources in India.