MARATHI

'माझ्या 4 मुलींचं निधन झालं'; सनी लियोनीचा धक्कादायक खुलासा

Sunny Leone Lost her 4 Daughters : बॉलिवूड अभिनेत्री सनी लियोनी ही नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असते. सनी लियोनीचं कुटुंब हे देखील चर्चेत असतं त्याचं कारण म्हणजे तिची तीन मुलं. तिनं एका मुलीला दत्तक घेतलं आहे. तर, तिला दोन जुळी मुलं आहेत आणि ही मुलं तिला सरोगसीच्या माध्यमातून झाली आहेत. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत सनीनं सरोगसी, एग्स फ्रीजिंग आणि आई होण्याच्या तिच्या प्रवासाविषयी सांगितलं आहे. सनीनं ही मुलाखत 'बॉलिवूड बबल'ला दिली आहे. या मुलाखतीत सनी म्हणाली, 'मी आणि डॅनियलनं सरोगसी करण्याचं ठरवलं होतं. आम्ही जवळपास 6 एग्स फ्रीज केले होते. 4 मुलींसाठी आणि 2 मुलांसाठी. अमेरिकेत आम्ही एग्स फ्रीज केले होते. कारण तिथे बाळाचं लिंग कोणतं असणार आहे ते आधीच सांगतात. जेनेटिक टेस्टिंगच्या मदतीनं आम्हाला याविषयी कळलं होतं. आम्ही सगळ्यात आधी मुलींना घेऊन सेरोगसीविषयी विचार केला. चार मुली होत्या, आम्ही चारही मुलींना गमावलं. त्या या जगात येऊ शकल्या नाही. आमच्या दोघांसाठी ही खूप दु:खत गोष्ट होती. आमल्या खूप वाईट वाटतं. कारण आम्हाला दोन्ही ही मुलीच हव्या होत्या. आम्ही खूप खचलो होतो. याविषयी विचार करुन आम्ही शांत राहायचो.' पुढे सनी म्हणाली, 'आम्ही मुंबईत एका ठिकाणी गेले होतो, जिथे छोट्या-छोट्या मुली होत्या. मी लगेच म्हटलं की आपण एका मुलीला दत्तक का नाही घेत. त्यानं काय फरक पडणार आहे. जेनेटिकली आम्ही कनेक्टेड राहणार नाही, पण मनानं तर राहू ना.' हेही वाचा : 14 वर्ष मोठ्या सुपरस्टारसोबत हॉटेलच्या रुममध्ये दिसली होती अभिनेत्री; बदनामी होत असल्याचं पाहून पत्नीनं... दरम्यान, सनी लियोनचा काही दिवसांपूर्वी एक व्हिडीओ व्हायरल झाला होता. या व्हिडीओत सनी लियोनीनं ग्लॅमरल आणि डिझायनर लेहेंगा परिधान केला आहे. तर या व्हिडीओत सनी लियोनीला हा लेहेंगा सांभाळताना नाके-नऊ येत असल्याचे पाहायाला मिळते. तर ती कसं तरी इतरांची मदत घेत हा लेहेंगा सांभाळते. खरंतर सगळ्या महिलांना आवडत असलेला हा लेहेंगा सांभाळणं किती कठीण आहे हे सगळ्यांना माहित आहे. व्हिडीओत टीमची मदत घेणारी सनी लियोनी ही स्वत: ला कसं सांभाळते आणि व्हिडीओ पोस्ट शेअर करत तिनं कॅप्शन दिलं होतं की 'मला अजूनही मदतीची गरज आहे. LOL'

PAK
255/5
(89.0 ov)
VS
ENG
Full Scorecard →

About Us

Get our latest news in multiple languages with just one click. We are using highly optimized algorithms to bring you hoax-free news from various sources in India.