MARATHI

Maharashtra Breaking News LIVE : दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी, ब्रेकिंग न्यूज एका क्लिकवर

Maharashtra Breaking News Today : LIVE Updates on October 17 महत्त्वाच्या ब्रेकिंग न्यूज मराठीमध्ये, महाराष्ट्रातील सर्व घडामोडी पाहा (Maharashtra LIVE News) एका क्लिकवर, मुंबई, पुण्यासह (Mumbai-Pune News) राज्यातील महत्त्वाची शहरं आणि गावांतील ताज्या बातम्या, राजकीय बातम्यांचे LIVE अपडे्स (Political News) सामाजिक, आर्थिक, आरोग्य, शैक्षणिक आणि क्रीडा (Sports) तसेच इतर अपडेट्स वाचा एक क्लिकवर. 17 Oct 2024, 09:53 वाजता Worli BDD Chawl : मुंबईतल्या वरळी इथल्या बीडीडी चाळ रहिवाशांनी विधानसभा निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतलाय. बी.डी.डी. चाळ क्रमांक १ ते ७ मधल्या रहिवाश्यांनी महाराष्ट्र शासन आणि म्हाडाच्या घरकुल वितरणावर नाराजी व्यक्त करत निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला. रहिवाश्यानी ठिकठिकाणी विधानसभा निवडणुकीवर बहिष्कार असे बॅनर लावलेत इतकंच नाही तर कोणत्याही राजकीय पक्षाला मतं मागण्यासाठी इमारतीत येऊ नये, असा कडक इशारा दिलाय... बातमीचा व्हिडीओ पाहा - 17 Oct 2024, 09:37 वाजता Sujay Vikhe : अहिल्यानगरच्या संगमनेर मतदारसंघातून माजी खासदार सुजय विखे पाटील यांना भाजपकडून उमेदवारी नाकारण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिलीये.. सुजय विखे पाटील यांनी संगमनेर मतदारसंघातून निवडणूक लढण्याची तयारी दाखवली होती.. मात्र एकाच घरत दोघांना उमेदवारी नको असं सांगत भाजपनं त्यांना तिकीट नाकारल्याची माहिती सूत्रांनी दिलीये. महायुतीमध्ये संगमनेरची जागा ही शिवसेनेकडे आहे.. त्यामुळे या जागेवर कोणता उमेदवार असणार याबाबत चर्चा रंगलीये.. दरम्यान सुजय विखे पाटलांना उमेदवारी नाकारल्यानं बाळासाहेब थोरात आणि सुयज विखेमधील बिग फाईट टळण्याची शक्यता आहे. बातमीचा व्हिडीओ पाहा - 17 Oct 2024, 09:30 वाजता Latur Murder : लातूरमध्ये पॅरोलवर सुटलेल्या गुन्हेगाराने घरी येताच आपल्या पत्नीची गोळ्या झाडून हत्या केलीये...उदगीर शहरातील अमित नाटकरे हा आरोपी 2 खूनाच्या गुन्ह्यात जेलमध्ये होता..यातील एका खून प्रकरणात त्याला जन्मठेपेची शिक्षा झाली होती.... पॅरोलवर सुट्टी घेवून तो उदगीरला आला होता....2 केसमध्ये कोर्टात अपील करण्यासाठी पैसे नसल्याने त्याने पत्नीला माहेरहून पैसे घेवून ये म्हणत तीला मारहाण केली...या वादातून आरोपीने पत्नीवर गोळ्या झाडल्या. त्यात तीचा जागीच मृत्यू झाला. बातमीचा व्हिडीओ पाहा - 17 Oct 2024, 09:11 वाजता SSC & HSC Exam Time Table : मार्च २०२५ मध्ये होणाऱ्या दहावी- बारावीच्या परीक्षांचं अंतिम वेळापत्रक अद्याप जाहीर करण्यात आलं नाहीए. असं स्पष्टीकरण राज्य शिक्षण मंडळाने केलंय. त्यामुळे दहावी, बारावीच्या परीक्षांची समाजमाध्यमांवर प्रसिद्ध झालेली वेळापत्रकं ग्राह्य धरू नयेत असं आवाहनही करण्यात आलंय. राज्य मंडळाचे बोधचिन्ह, नावाचा वापर करून परीक्षेबाबत चुकीची माहिती प्रसारित करून पालक, शिक्षक, विद्यार्थ्यांमध्ये संभ्रम निर्माण केल्यास फौजदारी गुन्हा दाखल करण्याचा इशाराही देण्यात आलाय. बातमीचा व्हिडीओ पाहा - 17 Oct 2024, 08:56 वाजता IMD Rain Alert : एकीकडे तापमान वाढलेलं असताना दुसरीकडे ठाणे, रायगड, रत्नागिरी जिल्ह्यांसाठी रविवारपर्यंत तसंच पालघर जिल्ह्यात आज आणि शनिवारी, रविवारी यलो अलर्ट देण्यात आलाय... अहिल्यानगर, पुणे, सातारा, सोलापूर इथे रविवारपर्यंत, सांगली, कोल्हापूर, बीड, हिंगोली, नांदेड, लातूर, संभाजीनगर इथे शनिवारपर्यंत यलो अलर्ट जाहीर केलाय.. विदर्भात चंद्रपूर, गडचिरोली, यवतमाळमध्ये शुक्रवार आणि शनिवार या दोन दिवस यलो अलर्ट देण्यात आलाय.. मेघगर्जनेसह विजा तसेच पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. बातमीचा व्हिडीओ पाहा - 17 Oct 2024, 08:21 वाजता Baba Siddique Murder Update : राष्ट्रवादीचे नेते बाबा सिद्दीकी यांच्या हत्येत तीन पिस्तुलांचा वापर करण्यात आला होता अशी माहिती पोलिसांनी दिलीये. आरोपींनी एक ऑस्ट्रेलियन बनावटीची ग्लॉक पिस्तूलही वापरली होती.. तसंच तुर्की पिस्तुल आणि एक देशी बनावटीची पिस्तुलाचाही वापर केला होता.. पोलिसांनी ही तीनही शस्त्रे जप्त केली आहेत..12 ऑक्टोबर रोजी निर्मल नगर येथील जीशान सिद्दीकी कार्यालयाबाहेर गोळ्या झाडून त्यांची हत्या करण्यात आली होती. बातमीचा व्हिडीओ पाहा - 17 Oct 2024, 07:43 वाजता Pune Water : पुणे शहर आणि उपनगरात आज पाणीपुरवठा बंद असणार आहे.. जलशुद्धीकरण केंद्रातील देखभाल दुरुस्तीच्या कामांसाठी हा पाणीपुरवठा बंद केला जाणार आहे. शिवाय शुक्रवारीही उशिरा आणि कमी दाबाने पाणीपुरवठा होण्याची शक्यता आहे. 17 Oct 2024, 07:38 वाजता Vidhansabha Election 2024 : मविआमध्ये अद्याप काही जागांचा तिढा कायम असल्याचं समजतंय त्यामुळे आजही महाविकास आघाडीची मुंबईत बैठक होणार आहे. आजच्या बैठकीत जागावाटपाबाबत अंतिम चर्चा होणार असल्याचंही समजतंय दरम्यान, मुंबईतील जागावाटपाचं सूत्रही ठरल्याची विश्वसनीय सूत्रांकडून माहिती मिळालीये...ठाकरे पक्षाला मुंबईमध्ये सर्वाधिक 18 जागा मिळणार, काँग्रेसला 14, शरद पवार पक्षाला 2, समाजवादी पक्षाला 1 अशा पद्धतीने जागावाटपाचा फॉर्म्युला ठरल्याची माहिती सूत्रांकडून मिळतेय. मात्र आजच्या अंतिम बैठकीत काय निर्णय होतोय. जागावाटप जाही करणार का याकडे आता लक्ष लागलंय. बातमीचा व्हिडीओ पाहा - 17 Oct 2024, 06:54 वाजता आज भाजपची पहिली यादी जाहीर होण्याची शक्यता. विधानसभा उमेदवारांची पहिली यादी जाहीर होण्याची शक्यता आहे. पहिल्या यादीत दिग्गज नेत्यांचा समावेश असण्याची शक्यता. पुढील काही तासात भाजपच्या उमेदवारांची पहिली यादी जाहीर होण्याची शक्यता. हरियाणाचे मुख्यमंत्र्यांचा चंदीगडमध्ये शपथविधी पार पडणार आहे या शपथविधी सोहळ्यानंत अमित शाहांसोबत शिंदे, फडणवीस आणि अजित पवारांसोबत अमित शाहांची बैठक पार पडणार आहे. या बैठकीत जागावाटपावर चर्चा होणार आहे. None

About Us

Get our latest news in multiple languages with just one click. We are using highly optimized algorithms to bring you hoax-free news from various sources in India.