MARATHI

लाडकी बहिण योजनेबाबत राज ठाकरे यांचा खळबळजनक दावा

Maharashtra Assembly Elections 2024 : विधानसभा निवडणुकीची घोषणा होताच राज्यातील राजकीय वातावरण तापण्यास सुरुवात झालीय. सत्ताधारी आणि विरोधक एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करताना दिसतायेत. विशेषत: लाडकी बहिण योजनेवरून मविआचे नेते महायुतीवर टीका करत असतानाच मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनीही महायुतीवर निशाणा साधला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणजे पुष्पा अशी खिल्ली राज ठाकरेंनी भर सभेत उडवली होती.. मात्र आता राज ठाकरेंनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा महत्त्वांकाक्षी योजना असलेल्या लाडकी बहिण योजनेबाबत खळबळजनक दावा केलाय.. लोकांना मोफत पैसे वाटल्यास राज्य कंगाल होईल असं भाकीत राज ठाकरेंनी वर्तवलंय. लाडकी बहीण योजनेला टच केलात तर लाडक्या बहिणी करेक्ट कार्यक्रम करतील असा इशारा मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी दिलाय... तर लाडकी बहीण योजना बंद होऊ देणार नसल्याचं आश्वासन उपमुख्यमंत्री अजित पवारांनी दिलंय. राज ठाकरेंप्रमाणेच विरोधकांनीही महायुती सरकारला लाडकी बहीण योजनेवरुन लक्ष्य केलंय. मात्र राज्यातील दीड कोटी पेक्षा जास्त महिलांना लाडक्या बहीण योजनेचा लाभ मिळतोय. या योजनेला महिला आणि मुलींचा भरघोस प्रतिसाद देखील मिळताना दिसतोय. तेव्हा हाच प्रतिसाद महायुतीला मतांच्या रुपाने मिळेल का? ते पाहणं आता महत्त्वाचं ठरणार आहे. विधानसभा निवडणुका स्वबळावर लढवण्याचा ठाम निर्धार मनसेनं केलाय. विधानसभा निवडणूक आम्ही जिंकू आणि सत्ता आणू असा विश्वास मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी व्यक्त केलाय. लवकरच महाराष्ट्रभर दौरे सुर होणार असल्याचंही राज ठाकरेंनी सांगितलंय.

PAK
366
(123.3 ov)
VS
ENG
239/6
(53.0 ov)
Full Scorecard →

About Us

Get our latest news in multiple languages with just one click. We are using highly optimized algorithms to bring you hoax-free news from various sources in India.