MARATHI

पराभव झाला त्याच मतदार संघातून अमोल कीर्तिकर पुन्हा निवडणूक लढणार

Maharashtra assembly Elections 2024 : महाराष्ट्रा विधानसभा निवडणुकांचा रणसंग्राम सुरु झाला आहे. 20 नोव्हेंबरला महाराष्ट्रात मतदान पार पडेल तर 23 नोव्हेंबर रोजी विधानसभा निवडणुकीचा महानिकाल लागणार आहे. निवडणुका जाहीर होताच महाराष्ट्रात राजकीय घडामोडींना वेग आला आहे. लोकसभा निवडणुकीतील पराभवानंतर अमोल कीर्तिकर आता विधानसभेच्या मैदानात उतरणार आहेत. पराभव झाला त्याच मतदार संघातून अमोल कीर्तिकर पुन्हा निवडणूक लढणार आहेत. उत्तर पश्चिम मुंबईत या मतदारसंघात ठाकरे गटाचे अमोल कीर्तिकर आणि शिंदे गटाचे रवींद्र वायकर अशी लढत झाली. या हायव्होल्टेज लढतीमध्ये अमोल कीर्तिकर यांचा 48 मतांनी पराभव झाला होता. हीच मुंबई उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघातली निवडणूक वादाच्या भोव-यात सापडली होती. या निकालाच्या मतमोजणी दरम्यान गैरप्रकार झाल्याचा आरोप शिवसेना ठाकरे पक्षाचे पराभूत उमेदवार अमोल कीर्तिकरांनी केला होता. निवडणूक आयोगाने पुर्नमतमोजणी करायला हवी होती अशी मागणी किर्तीकर यांनी केली होती. अमोल कीर्तिकर यांनी हायकोर्टात याचिका दाखल केली आहे. लोकसभा निवडणुकीतील पराभवानंतर अमोल कीर्तिकर आता विधानसभेच्या मैदानात असणार असल्याचं समजतंय. जोगेश्वरीकरांच्या मनातील आमदार अशी अमोल कीर्तिकरांचे बॅनर ठाकरे गटाच्या पदाधिका-यांकडून झळकवण्यात आले आहेत. अमोल कीर्तीकर मुंबईत उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघाचे ठाकरे पक्षाचे उमेदवार होते. त्यांचा अवघ्या 48 मतांनी पराभव झाला होता. शिवसेना शिंदे पक्षाचे उमेदवार रवींद्र वायकर यांनी त्यांचा निसटता पराभव केला होता. त्यानंतर आता रवींद्र वायकर यांच्या विधानसभा मतदारसंघातून अमोल कीर्तिकर निवडणूक लढवणार असल्याची सूत्रांची माहिती आहे.

PAK
366
(123.3 ov)
VS
ENG
239/6
(53.0 ov)
Full Scorecard →

About Us

Get our latest news in multiple languages with just one click. We are using highly optimized algorithms to bring you hoax-free news from various sources in India.