MARATHI

Maharashtra Breaking News LIVE: लोकसभा निवडणुकीतील पराभवानंतर अमोल कीर्तिकर आता विधानसभेच्या मैदानात...

Maharashtra Breaking News LIVE: राज्यातील ताज्या घडामोडी आणि लाइव्ह अपडेट्स जाणून घेऊया एका क्लिकवर Maharashtra Breaking News LIVE: महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीची घोषणा करण्यात आली आहे. विधानसभेची घोषणा झाल्यानंतर राज्यातील राजकीय घडामोडींना वेग आला आहे. राज्यातील ताज्या घडामोडी आणि लाइव्ह अपडेट्स जाणून घेऊया. 16 Oct 2024, 20:32 वाजता अमोल कीर्तीकर हे लोकसभेसाठी उत्तर पश्चिम लोकसभा मतदार संघातून ठाकरे गटाकडून निवडणूक लढले होते. यावेळी 48 मतांनी कीर्तीकर यांचा पराभव झाला होता. शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार रवींद्र वायकर यांनी त्यांचा पराभव केल्यानंतर आता रवींद्र वायकर यांच्या विधानसभा मतदार संघातून ते निवडणूक लढवू शकतात. याच मतदार संघात अमोल कीर्तिकर मैदानात उतरणार असलायची माहिती आहे. 16 Oct 2024, 19:34 वाजता नागपुरात श्याम मानव यांच्या कार्यक्रमात गोंधळ झाला. संविधान चौकात हा कार्यक्रम सुरु होता. यावरून "अभिव्यक्ती स्वातंत्र्य किती शिलक्क आहे? याला हा पुरावा आहे. याना संविधान मान्य नाही. व्यक्ती स्वातंत्र्य मान्य नाही आणि कोणत्याही परिस्थितीत व्याख्यान बंद पडावं असा यांचा प्रयत्न आहे." असं श्याम मानव म्हणाले. 16 Oct 2024, 18:26 वाजता थोड्या वेळात भाजपच्या केंद्रीय निवडणूक समितीची बैठक होणार आहे. बैठकीसाठी देवेंद्र फडणवीस, पियुष गोयल दाखल झाले आहेत. संध्याकाळी 7 वाजता पंतप्रधान नरेंद्र मोदीही भाजप मुख्यालयात दाखल होणार आहेत. 16 Oct 2024, 18:06 वाजता आमदार झिशान सिद्दिकी मुंबई पोलीस आयुक्तांच्या भेटीला पोहोचले आहेत. ते पोलीस आयुक्तालयात पोलीस आयुक्तांची भेट घेणार आहेत. बाबा सिद्दिकींच्या हत्येनंतर पहिल्यांदाच झीशान सिद्दिकी पोलीस आयुक्तालयात पोहोचले आहेत. 16 Oct 2024, 17:17 वाजता महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी राज्यातील सत्ताधारी भाजपने कंबर कसली असून मायक्रो मॅनेजमेंटच्या जोरावर निवडणूक जिंकण्याचा प्रयत्न भाजपाकडून केला जातोय. त्याचाच एक भाग म्हणून आज भाजपकडून विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने 60 ते 70 उमेदवारांचं नावे असलेली पहिली यादी जाहीर केली जाऊ शकते. यात अनेक महत्त्वाच्या नेत्यांचा समावेश असू शकतो अशी माहिती सूत्रांनी झी24तासला दिली आहे. मुख्यत्वे ज्या जागा निवडून येण्यासाठी कुठलीही अडचण नाही अशा सेफ आणि निवडून येण्याची गॅरंटी असलेल्या मतदार संघाच्या संदर्भात आज घोषणा केली जाईल अशी माहिती आहे. यात मुख्यत्वे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मंत्री सुधीर मुनगंटीवार रवींद्र चव्हाण गिरीश महाजन व इतर मंत्र्यांच्या मतदारसंघांचा समावेश असू शकतो. 16 Oct 2024, 16:26 वाजता काँग्रेस पक्षाची थोड्याच वेळात हिमाचल भवनमध्ये बैठक होणार आहे. या मिटिंगसाठी स्क्रिनिंग कमिटीचे अध्यक्ष मधुसूदन मिस्त्री हिमाचल भवन मध्ये दाखल झालेलले आहेत. या मिटिंगसाठी थोड्याच वेळात नाना पटोले विजय वडेट्टीवार, वर्षा गायकवाड बाळासाहेब थोरात देखील येणार आहेत. 16 Oct 2024, 15:23 वाजता देवेंद्र फडणवीस संध्याकाळी दिल्लीत पोहोचणार विधानसभा निवडणुकीच्या तारखा घोषित झाल्यानंतर हालचालींना वेग आला आहे. भाजप नेते आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज संध्याकाळी दिल्लीत जाणार आहेत. देवेंद्र फडणवीस सेंट्रल इलेक्शन कमिटी म्हणजेच CEC म्हणजेच केंद्रीय निवडणूक समितीसाठी दिल्लीत जाणार आहेत. आजच्या या बैठक नंतर भाजपची पहिली यादी जाहीर होण्याची शक्यता आहे. ही बैठक भाजप मुख्यालय मध्ये संध्याकाळी सहा वाजता होणार आहे. या महत्वपूर्ण बैठकीसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शाह आणि जेपी नड्डा ही उपस्थित असणार आहेत. 16 Oct 2024, 13:17 वाजता हिंगोलीच्या गोरेगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत जन्मदात्या बापानेच 14 वर्षीय अल्पवयीन मुलीवर लैंगीक अत्याचार केल्याची घटना समोर आली आहे. 16 Oct 2024, 13:14 वाजता विरोधकांनी विरोधी पक्षनेते पदाचा चेहरा ठरवावा, आमच्याकडे कुणालाही डोहाळे लागलेले नाहीत. पवार साहेबांना आव्हान की त्यांनी मुख्यमंत्रीपदाचा चेहरा घोषित करावा, असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. 16 Oct 2024, 12:29 वाजता ओमर अब्दुल्ला यांनी केंद्रशासित प्रदेशाचे पहिले मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली.श्रीनगर इथल्या शेर-ए-काश्मीर इंटरनॅशनल कॉन्फरन्स सेंटर मध्ये घेतली शपथ.सरकारमध्ये कॉंग्रेस सहभागी न होण्याचा निर्णय घेतला आहे None

About Us

Get our latest news in multiple languages with just one click. We are using highly optimized algorithms to bring you hoax-free news from various sources in India.