MARATHI

मोठी बातमी! न्यायदेवतेच्या डोळ्यांवरील काळी पट्टी काढली, हातात तलवारीऐवजी भारतीय संविधान

Lady of Justice : भारतात आता अंधा कानून नसणार आहे. भारतीय न्यायव्यवस्थेची प्रतीक मानल्या जाणाऱ्या न्यायदेवतेच्या मूर्तीत मोठा बदल करण्यात आला आहे. न्यायदेवतेच्या डोळ्यांवर वर्षोनुवर्ष बांधण्यात आलेली काळी पट्टी आता हटवण्यात आली आहे. सुप्रीम कोर्टाच्या (Supreme Court) लायब्ररीमध्ये न्यायदेवतेची ही नवी मूर्ती बसवण्यात आली आहे. तसंच या आधी न्यायदेवतेच्या (Lady of Justice) एका हातात तराजू तर दुसऱ्या हातात तलावर होती. आता तलवारीच्या जागी भारतीय संविधान देण्यात आलं आहे. सुप्रीम कोर्टाचे सरन्यायाधीश डीवाय चंद्रचूड (CJI DY Chandrachud) यांच्या सूचनेनुसार ही मूर्ती सुप्रीम कोर्टाच्या लायब्ररीत बसवण्यात आली आहे. कायदा आंधळा असतो हे आपण अनेकदा ऐकलं आहे. न्याय देवतेच्या डोळ्यांवर पट्टी बांधलेली असते हे आपण अनेकदा चित्रपटांमध्येही पाहिलं असेल. न्यायदेवतेच्या एका हातात तलवार आणि दुसऱ्या हातात तराजू आहे. मात्र, आता ही मूर्ती बदलली आहे. न्यायदेवतेच्या या नव्या मूर्तीच्या डोळ्यांवरु आता पट्टी काढून टाकण्यात आली असून तिच्या एका हातात तलवारीची जागा संविधानाने घेतली आहे. यावरून देशातील कायदा आंधळा नाही किंवा शिक्षेचे प्रतीकही नाही, असा संदेश देण्यात आला आहे. याआधीची डोळ्यावंर पट्टी बांधलेली न्यायदेवतेची मूर्ती ही कायद्याची समानता दाखवणारी आहे. म्हणजे न्यायालयात आलेला कोणत्याही व्यक्तीची संपत्ती, सत्ता किंवा दर्जा पाहिला जात नाही नि:पक्षपातीपणे न्याय देईल तर तलवारीचा अर्थ अन्यायाला शिक्षा देण्याचं प्रतीक होतं. पण आता न्यायदेवतेच्या नव्या मूर्तीत डोळ्यांवरील पट्टी काढून टाकण्यात आली आहे. नवी मूर्ती म्हणजे समाजातील समतोल प्रतिबिंबित करणारी आहे, कोणत्याही निष्कर्षापर्यंत पोहचण्याआधी न्यायालय दोन्ही बाजूंची तथ्य आणि युक्तीवादांचं समान विचार करणारी असावी असं सरन्यायाधीशांचं मत आहे. कायदा कधीच आंधळा नसतो. तो सर्वांना समानतेने पाहतो. तर देवीच्या एका हातात तलवार नसावी, तर संविधान असावे जेणेकरून ती राज्यघटनेनुसार न्याय देते असा संदेश समाजात जाईल. डीवाय चंद्रचूड यांची सूचना सरन्यायाधीश डीवाय चंद्रचूड यांच्या सूचनेनुसार ही नवी मूर्ती बसवण्यात आला आहे. वसाहतवादी वारसा मागे टाकण्याचा प्रयत्न म्हणूनही याकडे पाहिले जात आहे. भारतीय दंड संहितेसारख्या वसाहतवादी कायद्यांची जागा भारतीय न्यायिक संहितेने घेतली आहे, असं सरन्यायाधीशांचं म्हणणं आहे. न्यायाची देवी ही एक प्राचीन ग्रीक देवी आहे, जी न्यायाचे प्रतीक असल्याचे मानलं जातं. तिचे नाव जस्टीया आहे. तिच्या नावावरून न्याय हा शब्द तयार झाला.

PAK
366
(123.3 ov)
VS
ENG
239/6
(53.0 ov)
Full Scorecard →

About Us

Get our latest news in multiple languages with just one click. We are using highly optimized algorithms to bring you hoax-free news from various sources in India.