MARATHI

लक्झरी कारसमोर नारळ फोडला, कारला लींबू-मिर्ची बांधली.. जर्मन राजदूताला भारतीय संस्कृतीची भूरळ... Video

German Ambassador Viral Video : भारतात कोणत्याही व्यक्तीने नवी गाडी घेतली किंवा नवं घर खेरदी केलं की सर्वात आधी पूजा-पाठ केला जातो. पूजा केल्यानंतर गाडीच्या समोर नारळ फोडतात आणि कोणाची वाईट नजर लागू नये यासाठी गाडीला लिंबू मिर्ची बांधली जाते. यामुळे वाईट शक्ती दूर राहातात असं भारतीयांचं म्हणणं आहे. पण केवळ भारतातच नाही तर भारतीय संस्कृतीची भूरळ परदेशातही आहे. भारतातील जर्मनीच राजदूत फिलिप एकरमॅन (Dr Philipp Ackermann) यांनी नवी लक्झरी इलेक्ट्रिक कार खरेदी केली. त्यांनी कारला आपल्या देशाचा झेंडा लावला आणि यानंतर त्यांनी जे केलं ते पाहून युजर्स आश्चर्यचकीत झाले. लींबू मिर्ची आणि नारळ जर्मनीचे राजदूत एकरमॅन यांनी भारतीय संस्कृतीनुसार (Indian Culture) आपल्या लक्झरी कारची झलक दाखवल्यानंतर कारला लिंबू-मिर्ची टांगली (Ties Nimbu Mirchi). त्यानंतर कारसमोर एक नारळही फोडला. त्यानंतर दूतावासातील कर्मचाऱ्यांनी एकरमॅन यांना फुलांचा गुच्छ देत त्यांचं स्वागत केलं. भारतीय संस्कृतीत कोणत्याही कार्याआधी नारळ फोडणं शूभ मानलं जातं. नारळाचं पाणी हे एकदम शुद्ध असतं. त्यामुळे नारळ फोडल्यानंतर त्यातील पाणी चारही बाजूला शिंपडलं जातं. यामुळे आपल्या आसपासचं वातावरण शुद्ध होतं, अस् मानलं जातं. #WATCH | Delhi: German Ambassador to India, Philipp Ackermann switches to EV (electric vehicle); ties 'nimbu-mirchi' to his car and smashes a coconut on the occasion. pic.twitter.com/OojZh4Nvx3 — ANI (@ANI) October 15, 2024 व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल जर्मनचे राजदूत एकरमॅन यांचा कारला लींबू-मिर्ची लटकण्याचा आणि कारसमोर नारळ फोडण्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. या व्हिडिओने भारतीयांची मनं जिंकली आहेत. या व्हिडिओवर अनेक भारतीयांनी प्रतिक्रिया देत एकरमॅन यांना शुभेच्छा दिल्यात.

PAK
366
(123.3 ov)
VS
ENG
239/6
(53.0 ov)
Full Scorecard →

About Us

Get our latest news in multiple languages with just one click. We are using highly optimized algorithms to bring you hoax-free news from various sources in India.