MARATHI

पर्यटकांसाठी Good News! मुहूर्त हुकला, पण आता अखेर 'या' तारखेला रुळावर धावणार 'माथेरानची राणी'

Matheran Mini Train Timetable : पर्यटकांची लाडकी माथेरानची राणी येत्या 1 नोव्हेंबरपासून पुन्हा धावण्यास सज्ज होणार आहे. रेल्वे प्रशासनानेच तशी माहिती दिली आहे. पावसाळ्याच्या दिवसांत तब्बल चार महिने माथेरानची मिनिट्रेन बंद असते. आता पावसाचा जोर काही प्रमाणात कमी झाला आहे. त्यामुळं आता पुन्हा एकदा मिनि ट्रेन सुरू होणार आहे. त्यामुळं पर्यटकांना मोठा दिलासा मिळाला आहे. दरवर्षी पावसाळ्याच्या चार महिन्यात घाटरस्ता आणि अतिवृष्टीमुळं दरडी कोसळण्याची भिती असते. त्यामुळं माथेरानची मिनिट्रेन बंद ठेवण्यात येते. 15 ऑक्टोबरपर्यंत ही सेवा पुन्हा पूर्ववत करण्यात येते. मात्र, यंदा काही तांत्रिक बाबींमुळं सेवा सुरू होण्यास उशीर होणार आहे. रेल्वे प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, 1 नोव्हेंबरपासून मिनिट्रेन रुळांवर धावणार आहे. तसंच, पर्यटनाचा हंगामही नोव्हेंबर ते फेब्रुवारीपर्यंत जास्त असल्याने रेल्वे प्रशासनाच्या महसूलातही वाढ होतो. दरम्यान, 15 ऑक्टोबरची तारीख उलटून गेल्यानंतरही माथेरानची राणी रुळांवर न आल्याने पर्यटकांसह व्यावसायिकांनाही फटका बसला आहे. माथेरानमध्ये जाण्यासाठी वाहने प्रतिबंधित करण्यात येतात. तिथपर्यंत जाण्यासाठी शटल सेवा आहे. अमनलॉज ते माथेरान या रेल्वे स्थानकादरम्यान मिनि ट्रेनची शटल सेवा सुरू आहे. सध्या या गाडीच्या दररोज आठ फेऱ्या आहेत. या गाडीची खास बात म्हणजे या ट्रेनमधून माथेरानचं निसर्गसौंदर्य अनुभवायला मिळते. पर्यटन खासकरुन या ट्रेनची सफर करण्यासाठीच येतात. मात्र फेऱ्या मर्यादित असल्याने अनेकदा पर्यटकांचा हिरमोड होतो. नेरळ माथेरान मिनी ट्रेन 100 वर्षांहून अधिक जुनी आहे. नेरळ-माथेरान रेल्वे मार्ग 1907 मध्ये सुरू झाला. पर्यटकांना माथेरानला घेऊन जाणार्‍या वाहतुकीचं एकमेव साधन म्हणजे मिनी ट्रेन आहे. येथे मोटार वाहनांना परवानगी नाही. पर्यटकांना नेरळ ते माथेरान जाण्यासाठी ही मिनीट्रेन अतिशय सोयीची आहे. त्यामुळे ती बंद राहिल्यास पर्यटकांना माथेरानला जाण्यासाठी मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतो. तसंच, या मार्गावर फेऱ्या वाढवल्यास पर्यटनात आणखी वाढ होऊ शकते, अशी व्यावसायिकांचे म्हणणे आहे.

IND
0/0
(0.0 ov)
VS
NZ
Full Scorecard →

About Us

Get our latest news in multiple languages with just one click. We are using highly optimized algorithms to bring you hoax-free news from various sources in India.