MARATHI

महायुती, मविआला बंडोबाची धास्ती, निवडणुकीनंतर बंडखोर ठरणार किंगमेकर?

Maharashtra Politics : निवडणूक आयोगाच्या घोषणेनंतर महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीचा महासंग्राम सुरू झालाय. यंदाच्या निवडणुकीत महायुती (Mahayuti) आणि मविआसोबतच (Mahavikas Aghadi) इतर पक्षही निवडणुकीच्या आखाड्यात आहेत. पुढील काही दिवसात कोणता पक्ष किती जागा लढवणार हे स्पष्ट झाल्यानंतर इच्छुकांची संख्या वाढू शकते. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीत महायुती आणि मविआसमोर बंडोबाचं मोठं आव्हान असणार आहे. अपक्ष आमदारांची संख्या जास्त असणार? महाराष्ट्राच्या पंधराव्या विधानसभेत अपक्ष आमदारांची संख्या मोठी असेल असा अंदाज वर्तवण्यात येतोय. 1995प्रमाणं आगामी विधानसभेत (Maharashtra Assembly Election) अपक्ष आमदार (Independent MLA) किंगमेकर (Kingmaker) ठरण्याची शक्यता आहे. महाराष्ट्रात आघाड्यांचं राजकारण सुरु असताना विधानसभा निवडणुकीच्या निकाल कसा लागेल याबाबत उत्सुकता निर्माण झालीय. यावेळी महायुती, महाविकास आघाडी आणि परिवर्तन महाशक्ती आघाडी अशा तीन आघाड्या आहेत. या आघाड्यांमध्ये एकापेक्षा जास्त पक्ष आहेत. प्रत्येक पक्षात एक इच्छुक पकडला तरी आघाड्यांमध्ये इच्छुकांची भाऊगर्दी आहे. एवढं इच्छुक म्हटल्यावर बंडखोरी होणारच.. बंडखोरांची संख्या अटोक्यात ठेवण्याची रणनिती आतापासूनच आखली जाऊ लागलीय. 1995 मध्ये बडंखोर ठरले होते किंगमेकर 1995च्या विधानसभा निवडणुकीत निवडून आलेल्या अपक्ष आणि बंडखोरांची संख्या मोठी होती. -1995 च्या निवडणुकीत छोटे पक्ष, इतर अपक्ष मिळून 59 आमदार निवडून आले होते -59 आमदारांपैकी 45 आमदार अपक्ष होते - काँग्रेस, शिवसेना-भाजपानंतर सर्वाधिक आकडा अपक्षांचा होता - अपक्ष आमदारांमधील बहुतेकांनी शिवसेना-भाजप युतीला पाठिंबा दिला - अपक्ष आमदारांच्या पाठिंब्यामुळे युती सरकार स्थापन झालं -काही अपक्ष आमदारांना मंत्रिपदही देण्यात आलं यावेळी देखील बंडखोरांची संख्या वाढण्याची शक्यता आहे. महायुती आणि मविआ आपापल्या पक्षातील संभाव्य बंडोबांचा थंडोबा कसं करतात यावर अपक्षांची संख्या कमी असेल की जास्त हे अवलंबून असणार आहे. असं असलं तरी जरांगेसमर्थक, ओबीसी समर्थक आमदार निवडून येतात का यावर अपक्षांची संख्या ठरणार आहे.

PAK
366
(123.3 ov)
VS
ENG
239/6
(53.0 ov)
Full Scorecard →

About Us

Get our latest news in multiple languages with just one click. We are using highly optimized algorithms to bring you hoax-free news from various sources in India.