MARATHI

'या' अभिनेत्रीच्या प्रेमात वेडा होता दाऊद इब्राहिम, निर्मात्याची केली होती हत्या

Anita Ayoob : दाउद इब्राहिम आणि बॉलिवूडमध्ये एकेकाळी जवळचे नाते होते. सेलेब्सची अंडरवर्ल्डशी मैत्री आहे. त्यामुळे त्यांना अनेक अडचणींचा देखील सामना करावा लागला होता. दाउद इब्राहिमसोबतची मैत्री अनेक कलाकारांना महागात देखील पडली आहे. एका अभिनेत्रीला दाउद इब्राहिमसोबतची मैत्री खूप महागात पडली होती. त्यामुळे निर्मात्यांनी तिला एका चित्रपटामध्ये कास्ट करण्यास नकार दिला होता. ज्यामुळे त्या निर्मात्याला आपला जीव गमवावा लागला होता. अनिता अयुब असं त्या अभिनेत्रीचं नाव आहे. ही अभिनेत्री पाकिस्तानची आहे. दाऊद इब्राहिमसोबत अफेरबद्दलच्या बातम्या पाकिस्तानमधील अनिता अयुब हिने पाकिस्तानमध्ये शिक्षण घेतल्यानंतर ती मॉडेलिंग करण्यासाठी भारतात आली होती. भारतात आल्यानंतर अनेक जाहिराती करून आणि मॉडेलिंग करून अनिताने बॉलिवूडमध्ये एन्ट्री घेतली होती. देव आनंद यांच्या 'प्यार का तराना' या चित्रपटातून तिने बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं होतं. त्यानंतर तिने अनेक चित्रपटांमध्ये काम केलं. त्याचबरोबर अनिताने देव आनंदसोबत गँगस्टरमध्ये देखील काम केलं होतं. याचवेळी अभिनेत्री अनिता अयुब हिच्या दाऊद इब्राहिमसोबतच्या अफेरबद्दलच्या बातम्या व्हायरल झाल्या होत्या. मात्र, अभिनेत्रीने दाऊद इब्राहिमसोबतचे नाते कधीच स्वीकारले नाही. ती सतत नकार देयची. यानंतर अनिताचे बॉलिवूड करिअर काही खास नव्हते. रिपोर्टवर विश्वास ठेवला तर, निर्माता जावेद सिद्दीकी यांनी अनिताला त्यांच्या चित्रपटात कास्त करण्यास नकार दिला होता. त्यानंतर दाऊद इब्राहिमने त्या निर्मात्याची हत्या केली होती. अभिनेत्रीवर बॉलिवूडमधून बहिष्कार अनिता अयुब तिच्या चित्रपटांपेक्षा जास्त चर्चेत आहे. तिच्यावर पाकिस्तानसाठी भारतात हेरगिरी केल्याचा देखील आरोप केला होता. पाकिस्तानमधील एका मासिकात या सर्व गोष्टीचा उल्लेख केला आहे. ज्यामध्ये असं म्हटलं आहे की, लोकांना वाटते की अनिता पाकिस्तानची गुप्तहेर आहे. त्यामुळे अभिनेत्रीवर बॉलिवूडमधून बहिष्कार देखील टाकण्यात आला होता. बहिष्कार टाकल्यानंतर अभिनेत्रीने देश सोडून जाण्याचा निर्णय घेतला.

PAK
366
(123.3 ov)
VS
ENG
88/1
(17.0 ov)
Full Scorecard →

About Us

Get our latest news in multiple languages with just one click. We are using highly optimized algorithms to bring you hoax-free news from various sources in India.