MARATHI

'वडिलांच्या पहिल्या पत्नीच्या निधनानंतर...', अमिताभ यांनी पहिल्यांदाच सौडलं मौन

Amitabh Bachchan's Father Harivanshrai Bachchan First Wife : बॉलिवूड अभिनेते अमिताभ बच्चन हे 'कौन बनेगा करोडपति' चं सुत्रसंचालन करत आहे. ते हॉटसीटवर बसलेल्या लोकांसोबत त्यांच्या आठवणी शेअर करताना दिसतात. यावेळी अमिताभ यांनी त्यांच्या वडिलांची अर्थात हरिवंशराय बच्चन यांच्या पहिल्या पत्नीविषयी सांगितलं आहे. इतकंच नाही तर अमिताभ यांनी हे देखील सांगितलं की त्यांचे वडील आणि आई तेजी बच्चनची भेट कशी आणि कधी झाली होती. अमिताभ यांनी सांगितलं की 'माझ्या वडिलांच्या पहिल्या पत्नीचं निधन झालं आहे. त्यांच्या निधनानंतर त्यांची फार वाईट अवस्था झाली होती, ते खूप उदास झाले होते. त्यावेळी त्यांनी जितक्या कविता लिहिल्या त्या सगळ्यांमध्ये दु:ख होतं. काही वर्षांनंतर त्यांनी कवि सम्मेलनात जाणं सुरु केलं जेणेकरून ते काही पैसे कमावू शकतील.' अमिताभ यांनी पुढे सांगितलं की 'बरेलीमध्ये त्यांचे एक मित्र होते, ज्यांनी वडिलांना त्यांच्याजवळ बोलावून घेतलं होतं. आता मित्रानं बोलवल्यानं माझे वडील त्यांना भेटायला तिथे गेले. जेव्हा दोघं एकत्र बसून रात्रीचं जेवण करत होते तेव्हा त्यांनी वडिलांना त्यांना एक कविता ऐकव असं हट्ट केला, पण वडील कविता सांगतील त्याआधीच त्यांच्या मित्रानं त्यांच्या पत्नीला आई (तेजी बच्चन) ला देखील तिथे बोलावण्यास सांगितलं.' अमिताभ यांनी त्यांच्या आई-वडिलांच्या भेटीची गोष्ट सांगत म्हटलं की 'तिथेच माझ्या वडिलांची माझ्या आईशी पहिली भेट झाली होती. माझी आई आल्यानंतर वडिलांनी ‘क्या करूं संवेदना लेकर तुम्हारी’ ही कविता सादर केली. आई रडू लागली. अशात वडिलांच्या मित्रानं आई आणि वडिलांना एकटं सोडलं. थोड्या वेळानंतर, ते माळं घेऊन बाहेर आले आणि ते वडिलांशी बोलले आणि त्याच दिवशी वडिलांनी हे ठरवलं की ते आईसोबत आता त्यांना नव्या आयुष्याची सुरुवात करायची आहे.' हेही वाचा : 'मी तुझी...', रणबीर कपूरशी लग्न करण्याआधी नीतू सिंग आलियाच्या कानात काय पुटपुटल्या? दरम्यान, अमिताभ यांच्या 82 व्या वाढदिवसाच्या स्पेशल 'कौन बनेगा करोडपति' एपिसोडमध्ये खुलासा केला की ज्या दिवशी अमिताभ बच्चन यांचा जन्म झाला होता. हरिवंशराय बच्चन यांनी तेजी यांना सांगितलं होतं की त्यांच्या घरी मुलाचा जन्म होणार आहे आणि हा त्यांचे वडील प्रताप नारायण श्रीवास्तव यांचा पुनर्जन्म असणार आहे. प्रोमोमध्ये आमिर खान अमिताभ यांना विचारतात की तुम्हाला ते दिवस आठवतो का जेव्हा तुमचा जन्म झाला होता? हे ऐकून अमिताभ आधी तर थोडे आश्चर्य चकीत झाले आणि मग आमिर त्यांना म्हणाले अमित जींच्या वडिलांनी त्यांच्या वाढदिवसाच्या दिवशी झालेल्या घटनेविषयी लिहिलं आहे. त्यानंतर आमिर हरिवंशराय बच्चन यांची जीवनाचा एक अंश वाचून दाखवतो.

PAK
97/2
(34.5 ov)
VS
ENG
Full Scorecard →

About Us

Get our latest news in multiple languages with just one click. We are using highly optimized algorithms to bring you hoax-free news from various sources in India.