MARATHI

जात लपवण्यासाठी स्वीकारलं 'बच्चन' आडनाव, मग अमिताभ यांचं खरं Surname काय?

Amitabh Bachchan Birthday : हिंदी चित्रपटसृष्टीचे महानायक अमिताभ बच्चन यांचा 11 ऑक्टोबरला वाढदिवस आहे. वयाच्या 82 व्या वर्षी देखील अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) हे अभिनय क्षेत्रात सक्रिय आहेत. आजही अमिताभ यांच्या चित्रपटांना प्रेक्षकांची हाऊसफुल्ल गर्दी होते. गेल्या अनेक दशकांपासून अमिताभ बच्चन आपल्या अभिनयाने प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहेत. अमिताभ यांनी आपल्या व्यावसायिक आणि खासगी आयुष्यात खूप चांगलात समतोल राखला आहे. देशातच नाही तर विदेशातही अमिताभ बच्चन यांचे लाखो चाहेत असून त्यांना प्रेमाने बिग बी (Big B) असंही म्हटलं जातं. पण तुम्हाला माहित आहे का अमिताभ यांचं खरं आडनाव बच्चन नाहीए? अमिताभ बच्चन यांचं खरं आडनाव काय? अमिताभ बच्चन यांचा जन्म उत्तर प्रदेशमध्ये (UP) झाला. ते कायस्थ कुटुंबातील आहेत तर आई शिख समाजातील होत्या. अमिताभ यांचं खरं नाव इंकलाब श्रीवास्तव असं आहे. पण ते नंतर बदलण्यात आलं. अमिताभ यांनी आपलं श्रीवास्तव आडनाव बदलून बच्चन असं केलं. अमिताभ बच्चन यांनी स्वत: याबात एका मुलाखतीत माहिती दिली होती. का बदललं आडनाव? 'कौन बनेगा करोडपती' या ते सूत्रसंचलन करत असलेल्या कार्यक्रात बच्चन हे आडनाव आपले वडील हरिवेश राय बच्चन यांची देन असल्याचं म्हटलं होतं. आपल्या वडिलांना जातीच्या बंधनात अडकायला आवडतं नव्हतं. ते स्वतंत्र्य विचारसरणीचे होते. कवि असल्याने त्यांना बच्चन हे नाव देण्यात आलं होतं. शाळेत प्रवेश घेण्यासाठी गेलो असताना मुख्याध्यापकाने मला आडनाव विचारलं. तितकात वडिलांनी बच्चन आडनाव असल्याचं सांगितलं. तेव्हापासून बच्चन हे नाव कायम राहिलं असं अमिताभ यांनी सांगितलं. बच्चन या आडनावावरुन कोणती जात आहे याचा पत्ता लागत नाही. त्यामुळे वडिलांनी जाणीवपूर्वक बच्चन हे आडनाव कायम ठेवलं, मी भाग्यशाली आहे की माझा जन्म एका अशा कुटुंबात झाला ज्या कुटुंबात जातीपातीचं बंधन नव्हतं, असं अमिताभ बच्चन यांनी सांगितलं. अमिताभ बच्चन यांची चित्रपट कारकिर्द अमिताभ बच्चन यांनी जवळपास गेली पाच दशकं चित्रपटसृष्टीवर अधिराज्य गाजवलं. 1969 मध्ये प्रदर्शित झालेला सात हिंदुस्तानी हा त्यांचा पहिला चित्रपट. 1973 मध्ये प्रकाश मेहरा दिग्दर्शित 'जंजीर' चित्रपट बॉक्स ऑफिसवर तुफान हीट ठरला होता. त्यानंतर अमिताभ बच्चन यांनी मागे वळून बघितलं नाही. अमिताभ यांना त्यांच्या कारकिर्दीत दादासाहेब फाळके पुरस्कार, राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार, फिल्मफेअर पुरस्कार यासह अनेक पुरस्कार मिळाले आहेत.

PAK
556
(149.0 ov)
152/6
(37.0 ov)
VS
ENG
823/7 dec
(150.0 ov)
Full Scorecard →

About Us

Get our latest news in multiple languages with just one click. We are using highly optimized algorithms to bring you hoax-free news from various sources in India.