MARATHI

'प्रेमाने समजले नाही तर धडा शिकवू', नेहा कक्कर आणि तिच्या नवऱ्याला धमकी

Neha Kakkar and Rohanpreet Singh : आपल्या मनमोहक आवाजाने लाखो चाहत्यांना वेड लावणारी गायिका नेहा कक्कर सोशल मीडियावर प्रचंड चर्चेत असते. नुकतीच नेहा कक्कर आणि तिचा नवऱ्याला रोहनप्रीत सिंह यांना धमकी देण्यात आली आहे. ज्यामध्ये म्हटलं आहे की, नेहा कक्करने तिच्या नवऱ्याला पडद्याआड ठेवावे. असा इशारा निहंग मानसिंग अकाली यांनी सोशल मीडियावर दिला आहे. लोकांसमोर आक्षेपार्ह कृत्य करून तुम्हा काय सांगायचे आहे? निहंग मानसिंग अकाली म्हणतात की सोशल मीडियावर चुकीचा मजकूर असलेल्यांना आधी प्रेमाने समजावून सांगितले जाईल आणि नंतर त्यांना धडा शिकवला जाईल. यासाठी त्याला तुरुंगात जावे लागले तरी चालेल. पण समाजात कोणत्याही प्रकारची घाण पसरू देणार नाही असं ते म्हणाले आहेत. नेहा कक्कर आणि तिच्या नवऱ्याला धमकी? नेहा कक्करबद्दल निहंग मानसिंग अकाली म्हणाले की, आता बॉलिवूड गायिका नेहा कक्करची नंबर आहे. आमचा संदेश त्यांच्यापर्यंत पोहोचवा. नेहा कक्करने तिच्या नवऱ्याला पडद्याआड ठेवाव. तर काही चांगले काम करा आणि तुमचे विचारही चांगले ठेवा. तुम्ही मुलांची काय सेवा करताय? पंजाबमध्ये सध्या अंमली पदार्थ आणि स्वैराचाराच्या नद्या वाहत आहेत. हे करणारा दुसरा कोणी नसून आपलाच सरदार भाई आहे. मात्र, ते खरे सरदार नसून इकडून तिकडे येऊन झालेले सरदार आहेत. वडिलांपासून ज्यांना वारसा लाभला आहे ते त्याचा आदर करतात. सोशल मीडियावर चुकीचा मजकूर पोस्ट करणारे अनेक लोक आमच्या रडारवर आहेत. असं त्यांनी म्हटलं आहे. Kulhad Pizza Couple यांच्या विरोधात निदर्शने काही दिवसांपूर्वी निहंग मानसिंह अकाली यांनी जालंधरमधील कुल्हड़ पिझ्झा कपलच्या रेस्टॉरंटबाहेर निदर्शने केली होती. कुल्हड़ पिझ्झा कपलच्या व्हिडीओचा मुलांवर विपरीत परिणाम झाला होता. सोशल मीडियावरील त्याचे सर्व व्हिडीओ हटवा. जर त्याने असे केले नाही तर त्याने त्याची पगडी परत करावी आणि त्यानंतर कोणताही व्हिडीओ बनवावा. आमची हरकत नाही. यासोबतच निहंग मानसिंह अकाली यांनी 18 ऑक्टोबरपर्यंत त्यांना मदत देत पोलिसांनी योग्य कारवाई न केल्यास आपले रेस्टॉरंट बंद करू, असे सांगितले होते.

PAK
366
(123.3 ov)
VS
ENG
239/6
(53.0 ov)
Full Scorecard →

About Us

Get our latest news in multiple languages with just one click. We are using highly optimized algorithms to bring you hoax-free news from various sources in India.