LIFESTYLE

महिलांनो तुम्हीही मुळ्याची पानं टाकून देता का? थांबा! ‘हे’ ७ फायदे वाचून कळेल किती मोठी चूक करताय

Radish leaves benefits: अनेक लोकांना मुळा खायला आवडत नाही. मुळ्याच्या चवीमुळे आणि उग्र वासामुळे अनेक लोक मुळा खाण्यासाठी कंटाळा करतात. मात्र, मुळा आणि मुळ्याच्या पानांमध्ये अत्यंत गुणकारी गुणधर्म आहेत. मुळा आणि मुळ्याची पाने हे गुणकारी असून त्याचा भरपूर फायदा आहे. तसेच मुळ्याच्या पानांमध्ये फॉलिक अॅसिड सारखे अनेक न्यूट्रिएंट्स असतात. हे उकडून, भाजी बनवून किंवा इतर भाज्या म्हणजेच मटारसोबत मिक्स करुन खाता येऊ शकते. मात्र महिलांनो तुम्हीही मुळ्याची पानं टाकून देता का? थांबा याचे फायदे वाचून कळेल किती मोठी चूक करताय. चला तर याचे आणखी फायदे जाणून घेऊयात. मूळव्याधाच्या समस्येमध्ये मदत करते मुळव्याध असलेल्या लोकांसाठी मुळ्याची पाने वरदान ठरू शकतात, कारण याच्या सेवनाने शरीरातील जळजळ होण्याची समस्या दूर होते. वास्तविक, मुळ्याच्या पानांमध्ये खूप कमी कॅलरी आणि जास्त फायबर असते. व्हिटॅमिन सी आणि बीटा कॅरोटीनने भरपूर मुळ्याचे पान शरीराच्या गरजा पूर्ण करते. रक्तातील साखर कमी करते आजकाल साखरेची समस्या सर्व वयोगटातील लोकांना दिसून येते. जर तुम्हीही रक्तातील साखरेच्या समस्येने त्रस्त असाल तर आजपासूनच मुळ्याच्या पानांचे सेवन सुरू करा. कारण यामध्ये आढळणारे पोषक तत्व शरीरातील पांढऱ्या पेशी वाढवण्याचे काम करतात. यासोबतच मुळ्यात ग्लायसेमिक इंडेक्स कमी असतो, त्यामुळे रक्तातील साखरेची पातळी प्रभावित होत नाही. ते रक्तातील साखरेचे शोषण नियंत्रित करण्यास देखील मदत करतात. रक्त शुद्ध ठेवते शरीरातील रक्त शुद्ध ठेवण्यासाठी तुम्ही मुळ्याच्या पानांचे सेवन करू शकता. त्यामुळे पुरळ, खाज, पिंपल्स इत्यादी त्वचेचे आजार होत नाहीत. कमी रक्तदाबात मदत होते कमी रक्तदाबाचा त्रास असलेल्या लोकांसाठी मुळ्याची पाने खूप फायदेशीर ठरू शकतात. कारण, यामध्ये असलेले सोडियमचे प्रमाण शरीरातील मिठाची कमतरता पूर्ण करते. रोगप्रतिकारक शक्ती सुधारते रोगप्रतिकारक शक्ती मजबूत ठेवण्यासाठी तुम्ही मुळ्याच्या पानांचे सेवन करू शकता. कारण, त्यात लोह आणि फॉस्फरस मुबलक प्रमाणात आढळतात. इतकंच नाही तर ते ॲनिमिया आणि हिमोग्लोबिनची कमतरता दूर करते. पचनसंस्थेसाठी फायदेशीर मुळ्याच्या पानांमध्ये भरपूर फायबर असते, जे पचनसंस्था निरोगी ठेवण्यास मदत करते. बद्धकोष्ठता (Constipation), गॅस आणि अपचन यांसारख्या समस्या दूर करण्यासाठी हे गुणकारी आहे. मुळ्याच्या पानांचे नियमित सेवन केल्याने पोट साफ राहते. हेही वाचा >> तेल की तूप, जेवणात नेमकं काय वापरावं? आरोग्यासाठी काय चांगलं? जाणून घ्या हाडांना बनवते मजबूत मुळ्याच्या पानांमध्ये कॅल्शियम आणि फॉस्फरस मुबलक प्रमाणात असते. जो हाडांना मजबूत बनवतात. यामुळे ऑस्टिओपोरोसिससारख्या समस्या दूर राहण्यास मदत होते. None

About Us

Get our latest news in multiple languages with just one click. We are using highly optimized algorithms to bring you hoax-free news from various sources in India.