LIFESTYLE

लैंगिक संबंधांमुळे खरंच चांगली झोप लागते का? यावर डॉक्टरांचे काय मत आहे? जाणून घेऊ…

sexual health to sleep : तुमच्यापैकी अनेकांना झोपेसंबंधित अनेक समस्या जाणवत असतील. अशा वेळी तुम्ही मेलाटोनिनपासून ते ध्यानापर्यंत अनेक उपाय करूनही पाहिले असतील. पण, हे उपाय करूनही झोपेसंबंधित समस्या कमी होण्याचे नाव घेत नाही. याच समस्येबाबत इंडियन एक्स्प्रेसशी बोलताना रिलेशनशिप काऊन्सिलर व सायकोलॉजिस्ट शिवानी मिसरी साधू यांनी एक वेगळे मत मांडले आहे. लैंगिक उत्तेजनामुळे झोपेच्या चांगल्या गुणवत्तेस प्रोत्साहन मिळू शकते, असे त्यांनी म्हटले आहे. लैंगिक संबंधांदरम्यान शरीरातून एंडोर्फिन आणि ऑक्सिटोसिन हार्मोन्स रिलीज होतात आणि त्यामुळे ताणतणाव कमी होऊ शरीराला आरामदायित्वाचा अनुभव मिळतो. त्यामुळे झोप लवकर येण्यास प्रोत्साहन मिळते. इतकेच नाही, तर शांत व गाढ झोप लागते. याव्यतिरिक्त लैंगिक संबंधांमुळे अनेकदा शारीरिक थकवा जाणवतो आणि त्यामुळेही झोप लागण्यास मदत होते. पुरुष आणि स्त्रिया दोघांनाही लैगिंक संबंधांनंतर झोपेची गुणवत्ता सुधारण्यास फायदा होतो. परंतु, त्याचा प्रभाव व्यक्तिशः भिन्नू असू शकतो. उदाहरणार्थ- काही पुरुषांना लैंगिक संबंधानंतर शारीरिक थकवा जाणवतो आणि त्यामुळे त्यांना लवकर झोप येण्यास मदत होते; तर काहींना अधिक उत्साही वाटू शकते. त्याचप्रमाणे स्त्रियांमध्येही असे दिसून येऊ शकते की, लैंगिक संबंधांमुळे त्यांना अधिक शांत गाढ झोप येते; पण हे अनुभव वैयक्तिक तणाव पातळी आणि परिस्थितीनुसार बदलू शकतात. जोडीदाराबरोबरच्या लैंगिक संबंधांप्रमाणे, हस्तमैथुनामुळे शरीरातून एंडोर्फिन आणि ऑक्सिटोसिन हार्मोन्स रिलीज होतात. त्यामुळे अधिक आरामदायी वाटते आणि तणाव कमी करण्यास मदत होते. या या हार्मोनल रिलीजमुळे मुख्यतः शांत आणि समाधानाची भावना वाढते आणि त्यामुळे शांत झोप लागते. हस्तमैथुनामुळे शारीरिक थकवादेखील जाणवू शकतो आणि त्यामुळे झोपेची गुणवत्ता सुधारते. पण, प्रत्येकाचे वैयक्तिक अनुभव हे वेगळे असतात. अनेकांसाठी हे फायदेशीर असले तरी काहींनी ते तितकेसे प्रवाभी वाटत नाही. त्यामुळे हस्तमैथुनाचा प्रभाव हा वैयक्तिक घटक आणि तणावाच्या पातळीतच्या आधारे भिन्न असू शकतो, असेही शिवानी म्हणाल्या. आठवड्यातून एक दिवस मद्यप्राशन करणाऱ्यांचे यकृत आतून कसे दिसते? पाहा फोटो , डॉक्टर म्हणाले… वारंवार लैंगिक संबंध ठेवल्यामुळे झोपेच्या गुणवत्तेवर किती आणि कसा परिणाम होतो, हे व्यक्तीपरत्वे भिन्न असू शकते. दररोज लैंगिक संबंध ठेवणे काहींसाठी उपयुक्त ठरू शकते, ज्यामुळे आरामदायी वाटते आणि झोपेची गुणवत्ता सुधारू शकते. पण काहींना त्याचे चांगले परिणाम जाणवणार नाहीत. दोघांनी एकमेकांना न समजून घेता, उत्साहाच्या भरात संबंध प्रस्थापित न केल्यास शारीरिक आणि भावनिक थकवा जाणवू शकतो. वर नमूद केल्याप्रमाणे, वैयक्तिक प्रभाव, परिणाम भिन्न असतात आणि त्यामुळे एखाद्या व्यक्तीला जाणवणारे फायदे जसे असतील, त्या प्रमाणात ते दुसऱ्यासाठी तितके फायदेशीर नसू शकतात. कारण- ही गोष्ट अशी आहे, जी दोघांची गरज आणि इच्छा यांवर अवलंबून आहे. पण, लैंगिक संबंध प्रस्थापित करताना सहमती आणि आनंद असणे किंवा वाटणे महत्त्वाचे आहे. None

About Us

Get our latest news in multiple languages with just one click. We are using highly optimized algorithms to bring you hoax-free news from various sources in India.