LIFESTYLE

निरोगी आरोग्यासाठी सकाळी उठल्यानंतर काय करावं? आरोग्यतज्ज्ञांनी सांगितल्या टिप्स

Healthy Morning: २०२४ हे वर्ष तुम्हालादेखील रात्री उशिरा झोपणे आणि सकाळी उशिरा उठणे, व्यायाम न करणे तसेच सतत मोबाइलवर रील्स पाहणे या सर्व गोष्टींमध्ये गेले असेल. तर या सर्व वाईट सवयी सोडून येणाऱ्या नवीन वर्षाची सुरुवात चांगल्या सवयींपासून करा. ‘इंडियन एक्सप्रेस.कॉम’ने एका आरोग्यतज्ज्ञाकडून सकाळी उठल्यावर कोणत्या चांगल्या सवयींचा अवलंब करावा याबाबत माहिती घेतली आहे. होमियो अमीगोचे संस्थापक आणि सीईओ करण भार्गव यांनी सकाळच्या दिनचर्येत समाविष्ट करण्यासाठी खाली काही सवयी शेअर केल्या आहेत: तुमच्या ठराविक वेळी जागे व्हा : तुमच्या नैसर्गिक सर्केडियन लयांशी ताळमेळ वाढल्याने तुम्हाला विश्रांती आणि सतर्कता जाणवते, फोकस आणि कार्यक्षमता वाढते. शरीर हायड्रेट करा : झोपेतून उठल्यावर पाणी प्यायल्याने तुमचे शरीर रिहायड्रेट होते आणि तुमचे चयापचय सुरू होते. शारीरिक हालचाली करा : सकाळचा व्यायाम रक्ताभिसरण, मनःस्थिती आणि उर्जेची पातळी वाढवतो, तुम्हाला दिवभराच्या कामासाठी ऊर्जा देतो. ध्यानाचा सराव करा : काही मिनिटांच्या ध्यानामुळे तणाव कमी होतो आणि मानसिक स्पष्टता सुधारते. दिवसभराचे नियोजन करा : कामाचे नियोजन दिवसभराच्या कार्यांना प्राधान्य देते आणि यामुळे वेळेचे व्यवस्थापन सुधारते. पौष्टिक नाश्ता करा : संतुलित जेवणामुळे आवश्यक ऊर्जा मिळते आणि एकाग्रता सुधारते. स्क्रीन वेळ मर्यादित करा : मोबाइलवर जास्त वेळ वाया घालवणे टाळा. यामुळे वेळही वाचेल आणि तणावही दूर होईल. हेही वाचा: झोपताना डोक्याखाली उशी घेतल्याने काय परिणाम होतो? तज्ज्ञ काय सांगतात… कृतज्ञता व्यक्त करा : आपण ज्या गोष्टींसाठी कृतज्ञ आहात, त्याबद्दल विचार केल्याने सकारात्मक दृष्टिकोन वाढतो आणि तणाव कमी होतो. सर्वात महत्त्वाचे काम आधी संपवा : तुमचे सर्वात महत्त्वाचे कार्य लवकर संपवा, ज्यामुळे ते चांगल्या प्रकारे पूर्ण होते. भार्गव यांच्या मते, या सवयी तुमच्या सकाळच्या नित्यक्रमात समाविष्ट केल्याने तुमच्या दिवसाची सकारात्मक सुरुवात होऊ शकते. None

About Us

Get our latest news in multiple languages with just one click. We are using highly optimized algorithms to bring you hoax-free news from various sources in India.