LIFESTYLE

घरात उंदरांचा सुळसुळाट वाढत चाललाय? फक्त एका सोप्या उपायाने उंदरांना लावा पळवून

Rat killer powder: अनेकदा घराच्या खिडकीतून किंवा दरवाजातून एखादा उंदीर घरात शिरतो. अशाप्रकारे घरामध्ये एकाहून अधिक उंदरांचा सुळसुळाटही वाढत जातो. या उंदरांमुळे कधीकधी खूप मोठे नुकसान होते. घरातील वस्तूंची नासाडी करण्याबरोबरच ते घरामध्ये घाणही आणतात आणि रोगराई पसरवतात, म्हणून काही सोप्या उपायांनी घरातील उंदरांना कसं पळवून लावायचं हे आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. उंदरांपासून सहज सुटका करा उंदरांना हाकलण्यासाठी अनेक प्रकारच्या गोष्टींचा वापर केला जातो. मात्र, अनेक वेळा खूप प्रयोग करूनही उंदीर घरातून पळून जात नाहीत. अशा परिस्थितीत जर तुम्हालाही त्यांच्यापासून सुटका करण्याची काळजी वाटत असेल तर आम्ही तुम्हाला काही उपाय सांगणार आहोत. याच्या मदतीने तुमच्या घरातील उंदीर कामयचे दूर पळून जातील. उंदरांना पळवण्यासाठी घरीच पावडर बनवा तुमच्या घरात आलेल्या उंदरांना हाकलण्यासाठी तुम्ही मेन्थॉल आणि तुरटीपासून पावडर तयार करू शकता. मेन्थॉल-तुरटीपासून बनवलेल्या या पावडरचा वापर केल्यास उंदीर घरात येणार नाहीत आणि घरात येणारे उंदीर सहज पळून जातील. त्यांना मारण्याची किंवा कोणतीही हानी करण्याची गरज नाही. हेही वाचा: त्वचेच्या समस्येसाठी कडुलिंबाचा काढा आहे फायदेशीर; जाणून घ्या बनवण्याची योग्य पद्धत उंदरांना पळवण्यासाठी मेन्थॉल – तुरटी पावडर बनवायची असेल, तर तुम्ही ती घरी सहज बनवू शकता. यासाठी सर्वप्रथम बाजारातून मेन्थॉल आणि तुरटी समान प्रमाणात खरेदी करा. आता मिक्सरमध्ये टाकून व्यवस्थित बारीक करून घ्या. पावडर बनल्यानंतर तुम्ही काचेच्या भरणीत ठेवू शकता. त्यानंतर ज्या ठिकाणी उंदीर घरात प्रवेश करतात, त्या ठिकाणी मेन्थॉल-तुरटी पावडर टाका. उंदीर मेन्थॉल-तुरटी पावडरचा वास सहन करू शकत नाहीत, त्यामुळे ते घरातून बाहेर पळून जातील. None

About Us

Get our latest news in multiple languages with just one click. We are using highly optimized algorithms to bring you hoax-free news from various sources in India.