MANORANJAN

राणादा अन् पाठकबाई पुन्हा एकत्र झळकणार? अक्षया देवधरच्या ‘त्या’ पोस्टमुळे चर्चा, पाहा व्हिडीओ

Akshaya Deodhar and Hardeek Joshi : ‘तुझ्यात जीव रंगला’ या मालिकेचं नाव जरी घेतलं तरी प्रेक्षकांच्या डोळ्यासमोर राणादा आणि पाठकबाईंची जोडी येते. या मालिकेने जवळपास चार वर्षे प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं. २०१६ मध्ये ही मालिका प्रसारित झाली होती. या मालिकेतून अक्षया देवधर आणि हार्दिक जोशीची फ्रेश जोडी प्रेक्षकांना पाहायला मिळाली होती. कोल्हापूरचा राणादा शाळेतील शिक्षिका अंजली पाठकच्या प्रेमात पडतो. या मालिकेमुळे घराघरांत राणादा आणि पाठकबाईंची जोडी सुपरहिट ठरली होती. प्रेक्षकांनी सुद्धा या मालिकेवर भरभरून प्रेम केलं. या मालिकेने २०२१ मध्ये सर्वांचा निरोप घेतला. मालिका संपून काही महिने उलटल्यावर प्रेक्षकांना एक सुखद धक्का मिळाला. तो म्हणजे राणादा आणि पाठकबाईंच्या ऑनस्क्रीन जोडीने खऱ्या आयुष्यात एकत्र येण्याचा निर्णय घेतला. या जोडप्याने साखरपुड्याचे फोटो सोशल मीडियावर शेअर करत सर्वांना आनंदाची बातमी दिली होती. यानंतर डिसेंबर २०२२ मध्ये हार्दिक-अक्षयाचा विवाहसोहळा थाटामाटात पार पडला होता. हेही वाचा : ना मराठी, ना बॉलीवूड…; प्राजक्ता माळीचा क्रश आहे ‘हा’ दाक्षिणात्य अभिनेता! म्हणाली, “आधी मला…” हार्दिक-अक्षयाची ऑनस्क्रीन जोडी खऱ्या आयुष्यात एकत्र आल्याने सर्वजण आनंद व्यक्त करत होते. विशेषत: या दोघांचेही चाहते प्रचंड खूश झाले. ‘तुझ्यात जीव रंगला’ या मालिकेनंतर हार्दिकने ‘झी मराठी’वरील आणखी एका मालिकेत काम केलं. यानंतर काही महिन्यांनी तो ‘जाऊ बाई गावात’ या शोमध्ये झळकला. पण, या सगळ्या दरम्यान प्रेक्षक अक्षया आणि हार्दिकच्या जोडीला प्रचंड मिस करत आहेत. आता पुन्हा एकदा या दोघांना ऑनस्क्रीन एकत्र पाहण्यासाठी त्यांचे चाहते आतुर झाले आहेत. अशा कमेंट्स सुद्धा दोघांच्या पोस्टवर येत असतात. यंदाच्या ‘झी मराठी’ पुरस्कार सोहळ्याला दोघांनी एकत्र उपस्थिती लावल्यावर हार्दिक-अक्षया पुन्हा एकदा मालिकेत एकत्र काम करणार असल्याच्या चर्चा रंगल्या होत्या. याशिवाय लग्नाच्या दुसऱ्या वाढदिवशी सुद्धा हे दोघं एका शूटसाठी एकत्र होते. याशिवाय आता अक्षयाने इन्स्टाग्राम स्टोरीवर व्हिडीओ शेअर करत दोघंही एकत्र काम करणार असल्याची मोठी हिंट चाहत्यांनी दिली आहे. हेही वाचा : Video : पतीसाठी ‘कन्नड’मध्ये खास मेजेस, मंडपात थाटात एन्ट्री अन्…; रेश्मा शिंदेच्या लग्नात मित्रमंडळींच्या डोळ्यात आनंदाश्रू… अक्षयाने एका स्टुडिओमध्ये डबिंग सुरू असल्याचा व्हिडीओ शेअर केला आहे. यामध्ये स्क्रीनवर हार्दिक-अक्षयाचा शॉट डब करणं सुरू असल्याचं पाहायला मिळतंय. यावरून आता लवकरच ही जोडी पुन्हा एकदा ऑनस्क्रीनवर प्रेक्षकांच्या भेटीला येणार असल्याचं स्पष्ट झालेलं आहे. मात्र, हा प्रोजेक्ट नेमका काय आहे याबद्दल कोणतीही माहिती समोर आलेली नाही. None

About Us

Get our latest news in multiple languages with just one click. We are using highly optimized algorithms to bring you hoax-free news from various sources in India.