MANORANJAN

“आम्हाला बाळ नको होतं”, मुलीच्या जन्मानंतर राधिका आपटेचं वक्तव्य; म्हणाली, “मी गरोदर आहे हे कळाल्यावर…”

बॉलीवूड अभिनेत्री राधिका आपटे नुकतीच आई झाली आहे. तिने एका गोंडस मुलीला जन्म दिला आहे. आता राधिकाने तिचा मातृत्वाचा प्रवास शेअर केला. तिला ती गरोदर आहे, हे समजल्यावर काय वाटलं; त्या भावना तिने सांगितल्या. तसेच तिने व तिच्या पतीने कधीच बाळाचा विचार केला नव्हता, त्यांना बाळ नको होतं, असं ती म्हणाली. राधिकाने २०१२ मध्ये ब्रिटीश व्हायोलिन वादक आणि लोकप्रिय संगीतकार बेनेडिक्ट टेलरशी लग्न केलं. राधिका व तिचा पती बाळासाठी प्रयत्न करत नव्हते, असं तिने सांगितलं. “खरं तर मला ते असं सार्वजनिकरित्या सर्वांना सांगायचं नव्हतं, पण मी सर्वांना सांगितलं. मी चुकून गरोदर राहिले नव्हते, पण आम्ही प्रयत्नही करत नव्हतो. त्यामुळे जेव्हा मी गरोदर आहे, असं कळाल्यावर आम्हाला धक्का बसला. कारण आम्ही त्याबद्दल विचारच केला नव्हता,” असं राधिका म्हणाली. राधिका पुढे म्हणाली, “मला वाटतं की जेव्हा लोकांना हे माहीत असतं की त्यांना बाळ हवंय की नाही, तेव्हा बाकीच्या गोष्टी सोप्या होतात. पण आमच्या बाबतीत आम्हा दोघांनाही मुलं नको होती, पण मूल झाल्यास ते कसं असेल याची एक टक्का उत्सुकता नक्कीच होती. त्यामुळे मी गरोदर राहिल्यावर आम्ही याबाबत पुढे जावं की नाही, असा प्रश्न आम्हाला पडला.” हेही वाचा – मराठमोळी अभिनेत्री राधिका आपटे झाली आई, फोटो शेअर करून दाखवली बाळाची पहिली झलक राधिका म्हणाली, “बाळाच्या जन्माच्या एक आठवडाआधी मी फोटोशूट केलं होतं. खरंच, त्यावेळी मला माझं शरीर स्वीकारणं कठीण जात होतं. माझं वजन इतकं कधीच वाढलं नव्हतं. माझे शरीर सुजलं होतं. अंग दुखत होतं आणि झोप येत नसल्याने माझे विचार बदलले होते. आता मला आई होऊन दोन आठवडेही झाले नाहीत आणि माझ्या शरीरात पुन्हा बरेच बदल झाले आहेत.” आता शरीरातील बदल स्वीकारल्याचं राधिकाने सांगितलं. “आता मी माझे शरीर स्वीकारले आहे. हे सगळे नवीन अनुभव आहेत. मी नवीन गोष्टी शिकत आहे. माझा दृष्टीकोनही बदलला आहे. आता मी या फोटोंकडे सकारात्मक दृष्टीकोनातून पाहते. आता मला या बदलांमध्ये फक्त सौंदर्य दिसत आहे. हे फोटो मला नेहमी लक्षात राहतील,” असं राधिका म्हणाली. A post shared by Radhika (@radhikaofficial) हेही वाचा – तमन्ना भाटिया आहे ‘इतक्या’ कोटींची मालकीण! तिचे मानधन, कार कलेक्शन अन् लव्ह लाइफबद्दल जाणून घ्या राधिकाने मागच्या आठवड्यात एक फोटो शेअर करून लेकीच्या जन्माची माहिती दिली. शेअर केलेल्या फोटोमध्ये ती लॅपटॉपसमोर बसलेली दिसत आहे. तर तिच्या कुशीत तिची लेक आहे. तिने दिलेल्या कॅप्शनुसार तिचं बाळ एका आठवड्याचं झालं आहे. लेकीच्या जन्मानंतर पहिली वर्क मीटिंग अशा आशयाचं कॅप्शन देत राधिकाने फोटो पोस्ट केला आहे. None

About Us

Get our latest news in multiple languages with just one click. We are using highly optimized algorithms to bring you hoax-free news from various sources in India.