MANORANJAN

सलमान खानच्या शोमुळे लोकप्रिय झाली; ‘ही’ बॉलीवूड अभिनेत्री आता मराठीत पदार्पण करणार! पहिली झलक आली समोर

Bollywood Actress Marathi Film Debut : एकीकडे मराठी चित्रपट देशविदेशातील चित्रपट महोत्सवांमध्ये बाजी मारत आहेत, तर दुसरीकडे बॉक्स ऑफिसवर सुद्धा अनेक मराठी चित्रपटांनी गेल्या काही दिवसांत चांगली कामगिरी केल्याचं पाहायला मिळालं आहे. मराठी चित्रपटाचं कथानक, वैविध्यपूर्णता या गोष्टी प्रेक्षकांना विशेष भावतात आणि आता याची भुरळ अन्य इंडस्ट्रीमधल्या कलाकारांना सुद्धा पडतेय. सलमान खानच्या शोमधून घराघरांत लोकप्रिय झालेली एक अभिनेत्री आता लवकरच मराठी चित्रपटसृष्टीत पदार्पण करणार आहे. हिंदी ‘बिग बॉस’च्या सातव्या सीझनमध्ये सहभागी झालेली अभिनेत्री एली अवराम ( Bollywood Actress ) आता मराठी चित्रपटात झळकणार आहे. तिने अनेक बॉलीवूड चित्रपटांमध्ये देखील भूमिका साकारल्या आहेत. आता एली ‘इलू इलू’ या चित्रपटाद्वारे मराठी सिनेसृष्टीत पदार्पण करणार आहे. हेही वाचा : दरवाजाच्या आड काय आहे गुपित? ‘सुशीला- सुजीत’ सिनेमाचं पोस्टर चर्चेत, पहिल्यांदाच एकत्र झळकणार ‘ही’ फ्रेश जोडी ‘इलू इलू’ हा सिनेमा ३१ जानेवारीला आपल्या भेटीला येणार आहे. या चित्रपटाचा टिझर नुकत्याच एका सोहळ्यात प्रदर्शित करण्यात आला. यावेळी या चित्रपटातील ‘इलू इलू’ या रोमँटिक गाण्यावर बहारदार परफॉर्मन्स करत एली अवरामने उपस्थितांची मनं जिंकून घेतली. २०१३ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘मिकी व्हायरस’ या चित्रपटाद्वारे एलीने हिंदी कलाविश्वात पदार्पण केलं होतं. तिने आतापर्यंत ‘किस किस को प्यार करूं’, ‘नाम शबाना’, ‘पोस्टर बॅाईज’, ‘बाझार’, ‘मलंग’, ‘कोई जाने ना’, ‘गुडबाय’ या हिंदी चित्रपटांमध्ये काम केलंय. याशिवाय तमिळ आणि कन्नड चित्रपटांमध्येही तिने महत्त्वपूर्ण भूमिका साकारल्या आहेत. ‘इलू इलू’ या मराठी चित्रपटात एली ‘मिस पिंटो’ या मुख्य भूमिकेत झळकणार आहे. आपल्याला अवगत नसलेल्या भाषेतील चित्रपटात मुख्य भूमिका साकारणं हे काहीसं कठीण असतं. यामुळेच या व्यक्तिरेखेसाठी एलीनं प्रचंड मेहनत घेतली आहे. हेही वाचा : “अधिपतीचं मूल अक्षराच्या पोटात वाढतंय…”, भुवनेश्वरीसमोर येणार रिपोर्ट्स, अक्षरा आई होणार! मालिकेत मोठा ट्विस्ट, पाहा प्रोमो मराठीत एन्ट्री करण्याबाबत एली म्हणाली, ‘मला नेहमीच नवनवीन गोष्टी शिकायला आवडतात. स्वीडीश, हिंदी, तामिळ आणि कन्नड चित्रपटांनंतर ‘इलू इलू’च्या निमित्तानं मला मराठी भाषेत काम करण्याची मिळाली. ही भूमिका मी साकारलेल्या आजवरच्या भूमिकांपेक्षा पूर्ण वेगळी आहे. त्यामुळे एका नव्या लूकमध्ये मी प्रेक्षकांसमोर येणार आहे. सुरुवातीला जेव्हा या चित्रपटाची ऑफर आली तेव्हा थोडं दडपण जाणवलं होतं, पण पटकथा आणि भूमिका समजल्यावर मी या संधीसाठी होकार दिला.” A post shared by Elli AvrRam (@elliavrram) एली अवरामसह वीणा जामकर, आरोह वेलणकर, मीरा जगन्नाथ, वनिता खरात, श्रीकांत यादव, कमलाकर सातपुते, आनंद कारेकर, निशांत भावसार, अंकिता लांडे, गौरव कलुस्ते, यश सणस, सोहम काळोखे, आर्या काकडे-जोशी, सिद्धेश लिंगायत हे कलाकार या चित्रपटात झळकणार आहेत. None

About Us

Get our latest news in multiple languages with just one click. We are using highly optimized algorithms to bring you hoax-free news from various sources in India.