MANORANJAN

करीना कपूर-शाहिद कपूर बऱ्याच वर्षांनी दिसले एकाच फोटोत; नेटकरी म्हणाले, “जेव्हा तुम्ही तुमच्या एक्सला…”

Kareena Kapoor Shahid Kapoor Photos: बॉलीवूडमधील काही कलाकारांची चर्चा ब्रेकअपनंतर बऱ्याच वर्षांनीही होत असते. असंच एक जोडपं म्हणजे शाहिद कपूर आणि करीना होय. या दोघांच्या अफेअरची खूप चर्चा झाली होती. त्यांनी त्यांचं नातं लपवलं नव्हतं. मात्र त्यांचं ब्रेकअप झालं आणि नंतर ते आयुष्यात पुढे गेले. आता बऱ्याच वर्षांनी करीना व शाहीद एकाच फोटोत दिसले. अनेक बॉलीवूड सेलिब्रिटींची मुलं धीरूभाई अंबानी इंटरनॅशनल स्कूलमध्ये शिकतात. गुरुवारी (१९ डिसेंबरला) धीरूभाई अंबानी इंटरनॅशनल स्कूलमध्ये अॅन्युअल फंक्शनचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला करीना कपूर -सैफ अली खान, शाहिद कपूर -मीरा कपूर, ऐश्वर्या राय -अभिषेक बच्चन आणि अमिताभ बच्चन तसेच किंग खानच्या कुटुंबाने हजेरी लावली होती. हेही वाचा – Video: जितेंद्र ४१ वर्षे जुन्या गाण्यावर थिरकले, तर लेक एकता कपूरचा ‘ऊ लाला’वर जबरदस्त डान्स शाळेतील या कार्यक्रमातील अनेक फोटो व व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. त्यापैकी काही फोटो शाहिद व करीनाचे आहेत, दोघेही एकमेकांच्या जवळ बसलेले दिसले. विरल भयानीने शेअर केलेल्या फोटोंमध्ये करीना पुढे तर शाहिद तिच्या मागे बसलेला दिसत आहे. दोघेही खूप सुंदर दिसत आहेत. बऱ्याच वर्षांनी करीना व शाहिद एकाच फोटोत दिसल्याने त्यांचे चाहते आनंदी झाले आहेत. त्यांच्या फोटोवर चाहते सोशल मीडियावर भरभरून प्रेमाचा वर्षाव करत आहेत. हेही वाचा – ‘या’ ओटीटी प्लॅटफॉर्मवर Pushpa 2 होणार प्रदर्शित, तब्बल ‘इतक्या’ कोटींमध्ये झाला करार A post shared by Viral Bhayani (@viralbhayani) ‘गीत आणि आदित्य’, ‘जब वी मेट’, ‘ते सोबत छान दिसतात’, ‘गीत आणि आदित्य नेहमी आमचे फेव्हरेट राहतील’, ‘जेव्हा तुम्ही तुमच्या एक्सला भेटता,’ अशा कमेंट्स चाहत्यांनी या फोटोंवर केल्या आहेत. १७ वर्षांपूर्वी इम्तियाज अलीच्या ‘जब वी मेट’ या चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान करीना व शाहिदचे ब्रेकअप झाले. या चित्रपटानंतर दोघं पुन्हा २०१६ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘उडता पंजाब’ या चित्रपटात दिसले. मात्र त्यांचे सीन एकमेकांबरोबर नव्हते. आता बऱ्याच वर्षांनी या दोघांचे एकत्र फोटो पाहून ‘जब वी मेट’चे चाहते खूश झाले आहेत. हेही वाचा – नेटफ्लिक्सवर या आठवड्यात सर्वाधिक पाहिल्या गेलेल्या सिनेमांची यादी; १० पैकी ७ भारतीय चित्रपट तुम्ही पाहिलेत का? करीना कपूरने ‘जब वी मेट’बद्दल बोलताना नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत शाहिदचे आभार मानले होते. “गीत आणि आदित्यची पात्रं एकमेकांवर अवलंबून होती. शाहिदने त्याची भूमिका अत्यंत जबरदस्त साकारली आहे, त्यामुळेच माझीही भूमिका मी प्रभावीपणे करू शकले. मी त्याचे आभार मानते, कारण मला वाटत नाही की त्याच्याशिवाय हा चित्रपट पूर्ण होऊ शकला असता,” असं ती म्हणाली होती. None

About Us

Get our latest news in multiple languages with just one click. We are using highly optimized algorithms to bring you hoax-free news from various sources in India.